मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चुकले...

अजब · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

वाचने 4364 वाचनखूण प्रतिक्रिया 7

अभ्या.. Sun, 12/03/2017 - 11:32
रंग उडाला इकडुन तिकडे, अंदाजच चुकले निखळुन पडला वरून कुंचला, भानही हुकले आस लावली ओठांना ह्या, शब्दांना मुकले मिट्ट रात्रीच्या उजळ प्रकाशी, आभाळही झुकले निष्प्राण वाटेवरच्या डोळ्यातले रक्तही सुकले कुठून पाहता मिट्ट रात्रीचे तारेही लुकलुकले घनदाट निळ्यातील चुकार लेमनी, हळूच शुकशुकले इतके कुणास अपुले म्हटले, वसंताचे चुकले... . लव्हिंग व्हिन्सेंट

नाखु Sun, 12/03/2017 - 11:59
चक्क प्रेम कविता? भारीच केलीय, अगदी अलवार आनंदीत नाखु