||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||
लेखनविषय:
काव्यरस
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे
समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।।
दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू।
चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||
उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |
गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।।
यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक
शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||
हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे ।
समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।।
अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।।
विदग्धतेची लगबग । येरू म्हणतो करावी ||
वाचने
8511
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
लैच हुच्च झालय स्त्रोत्र
पैजारबुवा,
:) मस्तंच.
वा!!!
वा वा!!
ह्या ह्या ह्या ह्या... जब्बार हानलय!
_/\_
लैच =))
भन्नाट
नीचभ्रू नाखु
यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक
शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||
हा.... हा .... अग्दी पर्फे़ट !
टाळ्या, टाळ्या, टाळ्या !
चाबूक ..... तोडलंस .. मित्रा !
हुच्चभ्रूंची "ऐसी" लक्षणे
मस्त!
कोणी नवा प्रसवी कथा-कविता, हुच्चभ्रूंना दिसे दवणीयता
नुसते म्हणा सार्त्र-काफ्का, कंपूप्रवेश सत्वर
:प
कविता जब्राच!!
मला खूप आवडले. "कमेंटती", "इग्नोरावे" हे शब्दप्रयोग मस्त आहेत. आणि लक्षणे तर चपखलच आहेत :)
स्तोत्र मस्त आहे.
हुच्चभ्रूंचे बैठकीत
जाऊन बैसे जो
विनाकारण
तोची एक मूर्ख।
=))
आमचेकडून कवितेला 'रोचक' अशी श्रेणी देणेत येत आहें.
- यत्रकुत्रापि भ्रूः असि
एस. ;-)
जबरदस्त !!
भीषण सुंदोर
व्वा, काय ती काव्य प्रतिभा. लय भारी :)
अनंताचे कैसे विडम्बने | अनंताचे कैसे लिहिणे |
स्तोत्राची जिल्बी पाडणे | हुच्च् असे ।।
या निमित्ताने आमचीपण झैरात
प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू ।
अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।
http://www.misalpav.com/node/40845
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
भारीच =)
धन्यवाद.
मस्तच!
लै म्हणजे लैच झकास
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
हुच्चभ्रूंचे अंतर्बाह्य दर्शन घडवलेत हो.
साले आमि फुकटच न्यूनगंड बाळगून जगायचो.
लै भारी !!! =)) =)) =))
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
जबराट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]=)) =))
मस्त लिहिलेत बुवा!
पाणी पितांना न वाचावे ऐसे काही!! ;-)
धन्यवाद!
दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू।
चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। खासच . एक नं. मजा आलीहा.. हा.. लय भारी!
धन्यवाद.
अगागा...