अहेवपण ...
लेखनविषय:
काव्यरस
कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास
उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो
नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ
पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?
© विशाल कुलकर्णी
वाचने
4804
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अतिशय सुरेख!
In reply to अतिशय सुरेख! by पद्मावति
+1
In reply to +1 by प्राची अश्विनी
+१ . येकच नंबर.
छान लिहिले आहेस विशाल...
In reply to छान लिहिले आहेस विशाल... by ज्ञानोबाचे पैजार
अजुन काय हवं माझ्यासारख्या
आह!
सुंदर.
मस्त
In reply to मस्त by नाखु
धन्यवाद देवानु !
सुरेख लिहिलंय !
अतिशय तरल कविता. यानिमित्ताने
In reply to अतिशय तरल कविता. यानिमित्ताने by एस
बरोबर. मलाही ती आठवत होती पण
सुंदर
_/\_ विशालदा अप्रतिम आहे
मनःपूर्वक आभार मंडळी !