चंद्रमण्यांचे पाझर
काव्यरस
आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर
पायतळी आज माझ्या
अब्ज-रंगी पखरण
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान
आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
कोडे गहन कधीचे
विनासायास सुटेल
वाचने
2325
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान.
छान.
सुंदर..!!
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर..अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.अत्रुप्त आत्मा, पुंबा, पद्मावति
सुरेख!
यशोधरा,
छान.
दिलीप बिरुटे