प्रतिभेचे देणे
काव्यरस
ती ठिणगी होऊन येते
अन वणवा होऊन छळते
ती लकेर लवचिक होते
अन गाण्यातून रुणझुणते
ती कधी निखारा होते
विझुनी मग होते राख
उमलविते त्यातून फूल
मग तिचीच फुंकर एक
ती उल्केसम कोसळते
उखडून दिशांचे कोन
धगधगत्या चित्रखुणांची
ती लिहिते भाषा नविन
जे तरल नि अक्षर ते ते,
जे अथांग, अदम्य ते ते,
जे दूर असूनही भिडते,
जे जटिल तरी जाणवते,
ते तिचेच देणे असते….
…..किती घ्यावे? तरीही उरते !
वाचने
2349
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
जबरदस्त!
In reply to जबरदस्त! by चांदणे संदीप
Sandy,
आवडली...
In reply to आवडली... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
खरंच सुरेख.
In reply to खरंच सुरेख. by पद्मावति
पद्मावति,
आवडलं
वा!
सूड, यशोधरा
छान.
जागु,