मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनातल्या मनात मी...

सत्यजित... · · जे न देखे रवी...
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे! कुठून ऊब एवढी मिळायची मला तरी? तुझे फुलासमान शब्द ओठ पांघरायचे! पहाट कोवळ्या उन्हात अंग वाळवायची जशी सुरेल भैरवीच भूप आळवायचे! असून ठाव नेमकी कुठे असेल डायरी पुन्हा पुन्हा उगाच मी कपाट आवरायचे! अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे... —सत्यजित

वाचने 2647 वाचनखूण प्रतिक्रिया 4

एस 06/11/2017 - 23:27
गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
वाह! अगदी 'तुझ्याच अंगणी स्वरांचा...' ची आठवण आली. खूपच छान!