मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

||तुलसी विवाह ||

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आजपासून सुरू झालेल्या तुलसी विवाहासाठी मी खालील कविता लिहिली आहे... ||तुलसी विवाह || चला चला रे आता होऊया सोहळ्यात रे मग्न वाद्ये वाजवू नाचू गाऊ असे हे तुळशीचे लग्न ||धृ || जालंदर दैत्य मातला सुरगण करिती त्यासवे युद्ध वृंदा भार्या त्याची असे ही पतिव्रता अन् शरीरशुद्ध ||१ || जालंधर रूप घेऊनी श्रीहरी नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी दैत्य संहारी हरी वदे वृंदे होशील तू पृथ्वीवरी तुळशी ||२ || अर्पिती भक्त मज विविध पुष्पे तरी तुळशी आवडे मज सर्वांहूनी कार्तिक मासे लग्न होई आपुले अजून काय हवे तुला याहूनी ||३ || अन्न शुद्ध होई तुझा स्पर्श होता प्राणवायू सदा देसी जीवांसी अंगणी वृंदावनी स्थापिती तुजला करिती तुझिया पूजनासी ||४|| आयुर्वेदामध्ये अग्रस्थान तुझे तुलसी सेवने रोग नष्ट होती देसी आरोग्य 'वैभव' मानवा 'तुलसी विवाह' साजरा करिती ||५|| --शब्दांकित (वैभव दातार ) कार्तिक शुद्ध द्वादशी तुलसी विवाह

वाचने 4659 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पुंबा Wed, 11/01/2017 - 14:24
तुळशीच्या लग्नात कविता लिहिण्यासारखे काही तरी आहे असे कधी वाटले? तुळशीला तुमची कविता आवडली का? तुम्ही तुळशीच्या लग्नाच्या पत्रिका छापता का? तुळशीच्या लग्नासाठी होलसेलमध्ये मंगलाष्टके लिहिता का?(ही ऑफर नाही..)

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/02/2017 - 07:24
+१ आगोबाोशी सहमत. आगोबा अश्या नवकवींच्या बाबतीत अट्यंट खरे खरे प्रतिसाद देतो! . . . हुर्र्र्र्र्र्र्र्र... उठा.. नवकवींना प्रतिसाद देत सुटा! =))

वैभवदातार Wed, 11/01/2017 - 16:50
आदरणीय पुंबा तुळशीला तुमची कविता आवडली का? -- तुम्ही तुळशीला विचारा तुम्ही तुळशीच्या लग्नाच्या पत्रिका छापता का? -- माझा छापखाना नाही तुळशीच्या लग्नासाठी होलसेलमध्ये मंगलाष्टके लिहिता का?(ही ऑफर नाही..) -- मी होलसेलमध्ये काही लिहीत नाही

In reply to by वैभवदातार

चौथा कोनाडा Sat, 11/04/2017 - 13:17
सडेतोड प्रतिवाद ! हा सदेतोडपणा आवडला गेला आहे ! मिपाकरांच्या खट्याळ प्रतिसादांना जास्त मनावर घेवू नका, मिपाकर असेच टप्पलमारू आहेत. मनामध्ये निगेटिव्हपणा येऊ देऊ नकात. तुमची कविता गीताकडे झुकते, एकदा तुमचा पोएटिक अनलिसिस करून घ्या की तुम्ही कवि आहात का गीतकार आहात. तुमच्यातल्या प्रतिभेला नाटक, सिनेमा अशी क्षेत्रे नक्की न्याय देतील याची खात्री बाळगा. हे वरचं लतोंमोघा वाटत असेल तर क्षमस्व !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाखु Sat, 11/04/2017 - 14:25
पुढील त्रैमासिक "दीन"विशेष सांगून टाका ना ✋ सरशी सक्रीय सदस्य अखिल मिपा नवकवी प्रोत्साहन, संवर्धन, पुनर्वसन, संगोपन व वृध्दींगत काव्यकाजवे दिपोत्सव समिती महासंघ

हरवलेला Sun, 11/05/2017 - 11:12
तुमचे कवितेचे विषय अगदी वेगळे असतात. मराठी भाषेत तुळशी विवाह वर लिहिलेली हि पहिलीच कविता असावी. मागच्या दहा हजार वर्षात असं लिखाण झालेलं नाही. कविता खूप आवडली. कवितेत तुम्ही तुळशी विवाहाचा इतिहास सांगितला आणि तुळशीचे महत्वही सांगितले. "कार्तिक मासे लग्न होई आपुले अजून काय हवे तुला याहूनी" या ओळी विशेष आवडल्या.