प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स
प्राध्यापक रिचर्ड थेलर
क्लासिकल इकॉनॉमिक्स
मानवी समाजाची रचना कशी असावी, मनुष्यप्राणी विचार करताना नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हा विषय मानवी स्वभाव आणि मानवी समाजाशी निगडीत असल्यामुळे मानवी संस्कृतीची सुरवात झाली आणि माणूस समाजात राहायला लागला तिथपासूनच सुरू झाला. अगदी प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांनीही विचार मांडले आहेत त्यातले अनेक अर्थशास्त्राशीच निगडीत आहेत असे म्हणायला हरकत नसावी. पण मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक जगाची सुरवात यांच्या संधीकाळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला असे म्हणतात. तो पाया रचला अॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्वज्ञाने. त्याने १७७६ मध्ये लिहिलेले An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations (थोडक्यात The Wealth of Nations) या पुस्तकातून तो पाया रचला गेला असे समजले जाते. हे पुस्तक म्हणजे एका अर्थी स्मिथने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये दिलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. या पुस्तकात अॅडम स्मिथने ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल त्या पध्दतीचा पुरस्कार केला होता. त्या पुस्तकातील पुढील वाक्य बरेच प्रसिध्द आहे:
"Every individual... neither intends to promote the public interest, nor knows how much he is promoting it... he intends only his own security; and by directing that industry in such a manner as its produce may be of the greatest value, he intends only his own gain, and he is in this, as in many other cases, led by an invisible hand to promote an end which was no part of his intention."
या वाक्याचा असा अर्थ लावला जातो की माणूस हा मुळात स्वार्थी आहे असे अॅडम स्मिथला म्हणायचे आहे. प्रत्यक्षात अॅडम स्मिथला अभिप्रेत असलेला "own interest" चा अर्थ नक्की कोणता हे त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकापूर्वी १७ वर्षे लिहिलेल्या "The Theory of Moral Sentiments" या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात स्मिथ म्हणतो की प्रत्येक माणसात एक 'इनर सेल्फ' (ज्याला सद्सदविवेकबुध्दी म्हणता येईल) असतो आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर या 'इनर सेल्फ' चे लक्ष असते. हा इनर सेल्फ एखाद्या निष्पक्ष पंचाप्रमाणे असतो. बहुतांश वेळी या इनर सेल्फला न आवडणारी कृती टाळण्याकडे माणसाचा कल असतो. तसेच माणसाची 'पॅशन्स' आणि हा निष्पक्ष इनर सेल्फ यांच्यात झगडा चालू असतो. कधी कधी पॅशन्सचा विजय होतो आणि इनर सेल्फ पराभूत होतो. तरीही आपल्याच कृतीकडे त्या इनर सेल्फचे लक्ष असते हे अॅडम स्मिथने अधोरेखित केले आहे. तेव्हा या इनर सेल्फला मान्य होईल अशी कृती म्हणजे "own interest" असा अर्थ अॅडम स्मिथला अभिप्रेत होता असे काही लोक म्हणतात.तरीही अॅडम स्मिथ म्हटले की तो अदृश्य हात आणि स्वार्थी माणूस हे चित्र उभे राहिलेच.
स्मिथने हे पुस्तक लिहायच्या ३८ वर्षे आधी म्हणजे १७३८ मध्ये गणितज्ञ डॅनिएल बरनॉली याने ज्या प्रकारच्या खेळांमध्ये नक्की निकाल काय लागणार हे माहित नसते (उदाहरणार्थ रॉलेट व्हिल, फासे इत्यादी) अशा खेळांमध्ये नक्की कोणत्या आधारावर माणसे निर्णय घेतात याविषयीची एक थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये 'युटीलिटी' (एका अर्थी समाधान) या एका संकल्पनेचा उल्लेख केला. विस्तारभयास्तव याविषयी अधिक लिहित नाही. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याकडील पैशातून आपण समजा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आपल्याला वाटल्यास आपण नुसती संत्रीच किंवा नुसती मोसंबीच किंवा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आता माणसे नक्की किती संत्री आणि किती मोसंबी विकत घेणार हे ठरवायचे कसे? तर त्यासाठी त्याने 'युटिलिटी' या संकल्पनेचा उल्लेख केला. संत्रे खाल्यावर समजा 'क्ष' एकक समाधान मिळते आणि मोसंबे खाल्ल्यावर 'य' एकक समाधान मिळते. (यातही जितकी जास्त संत्री/मोसंबी खाऊ त्याप्रमाणे जास्तीच्या खाल्लेल्य संत्र्या/मोसंब्यांची युटिलिटी कमी असते). तर माणूस अशा पध्दतीने संत्री आणि मोसंबी निवडेल ज्यातून त्याला मिळणारी एकूण युटिलिटी सर्वात जास्त असेल.
या संकल्पनेचा अर्थशास्त्रासाठी पुढे विलिअम स्टॅनले जेवोन्सने विस्तार केला. त्यानंतर आल्फ्रेड मार्शलने १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात या संकल्पनेला आधार धरून आणखी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आल्फ्रेड मार्शलचे हे पुस्तक त्यानंतर किमान २०-२५ वर्षे अर्थशास्त्रावरील प्रमाण मानले जात होते आणि विद्यापीठांमध्येही ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात असे.
वरकरणी दिसायला हे साधेसरळ गणित वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी साधी नाही. एक तर हे 'मॅक्झिमम युटीलीटी' चे गणित सोडवायचे तर संत्री आणि मोसंबी खाऊन नक्की किती युटिलिटी मिळेल हे त्या माणसाला माहित पाहिजे. आता एखाद्या गोष्टीपासून नक्की किती युटीलिटी मिळते या प्रश्नाचे उत्तर आकड्यात कसे देणार? आणि प्रत्यक्षात निर्णय घेताना संत्री आणि मोसंबी असा साधासरळ हिशेब नसतो तर इतरही अनेक घटक असतात. ते सगळे घटक माहित हवेत. आणि त्यातून विलक्षण गुंतागुंतीची युटिलिटीची गणिते करून माणूस निर्णय घेतो असे या सगळ्या मॉडेलचे सार होते. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी प्रत्येक माणूस 'रॅशनल' आहे हे गृहितक धरावेच लागेल. अन्यथा हे मॉडेल कोलमडेल. या रॅशनल माणसाची लक्षणे कोणती? तर ती व्हॉन न्यूमान आणि मॉर्गन्स्टिन या दोन प्राध्यापकांनी १९४७ मध्ये लिहिलेल्या एका पेपरमध्ये सापडतील. हा पेपर बर्यापैकी गुंतागुंतीचा आहे. तो पेपर वाचताना माझे तरी डोके आऊट झाले होते.
तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापैकी कोणीही ही युटिलिटीची गणिते करून निर्णय घेत नाही त्यामुळे हे मॉडेल मनुष्यस्वभावाचे अचूक निर्देशक नाही हे तर नक्कीच. तरीही हे मॉडेल आणि त्या मॉडेलवर आधारीत इतर मॉडेल्स अर्थशास्त्रात अनेक वर्षे बर्यापैकी लोकप्रिय होती, अजूनही आहेत. ज्याला निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा आधार या मॉडेलमध्ये आहे.
हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोना
आता मिपाकर मला विचारायच्या बेतात असतील की प्राध्यापक रिचर्ड थेलरचे काम नक्की कोणते हे लिहायचे सोडून भलतेच कुठले चर्हाट लावले आहे. पण हे सगळे लिहिले नाही तर त्यांचे काम नक्की कोणते होते हे समजणार नाही त्यामुळे हे सगळे रामायण लिहिणे गरजेचे आहे.
तेव्हा माणूस नक्की कसा विचार करतो म्हणजेच माणसाचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र याची सांगड घालायची गरज काही अभ्यासकांना वाटू लागली. यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले. १९६० च्या दशकात पिट्सबर्गच्या कार्नेगी टेक विद्यापीठात (सध्याचे कार्नेगी मेलॉन) हर्बर्ट सायमन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि अॅन आर्बरच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये जॉर्ज कॅटोना या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे काम सुरू केले. अर्थात १९६० च्या दशकात 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हा शब्दप्रयोग वापरला गेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तो शब्दप्रयोग सर्वप्रथम केला जॉर्ज कॅटोनांनी १९८० मध्ये. १९६० च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने भारावलेले फ्रॅन्को मोडिग्लिआनीसारखे प्राध्यापक होतेच तर भविष्यात ज्याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हटले गेले त्याने भारावलेले हर्बर्ट सायमन सारखेही प्राध्यापक होते. या दोन्ही प्राध्यापकांना भविष्यात अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि हे दोघेही एकाच वेळी एकाच विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यावेळी कार्नेगी टेकमध्ये ज्यांना शिकायला मिळाले असेल त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.
हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोनांच्या प्रयत्नांना त्यामानाने मर्यादित यश आले. त्याचे कारण त्यांच्या कामात काही कमी होती का? तर तसे नक्कीच नाही. माझ्या मते त्याचे कारण म्हणजे काळाचा महिमा. दुसर्या महायुद्धाच्या काळात आपली युध्दसामग्री, दारूगोळा इत्यादींचा सर्वात जास्त परिणामकारक वापर व्हावा यासाठी अनेक आघाडीच्या प्राध्यापकांची मदत अमेरिकन लष्कराने घेतली होती. मी माझा मिपा आय.डी ज्यांच्या नावावरून घेतला आहे ते मिल्टन फ्रिडमन सर्वात परिणामकारक ठरण्यासाठी दारूगोळ्यातील बॉम्बचा आकार नक्की किती असावा हे ठरवायच्या मॉडेलिंगमध्ये सहभागी होते. म्हणजे मोठा गोळा असेल तर अधिक भागावर तो परिणाम घडवेल पण त्यामानाने त्याची परिणामकारकता 'डिफ्युज्ड' असेल आणि लहान गोळा असेल तर तो कमी भागावर परिणाम घडवेल पण अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' असेल. अशाप्रकारे अनेक गोष्टींसाठी गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि गरज ही शोधांची जननी असते या न्यायाने ऑपरेशनल रिसर्च, संख्याशास्त्र यातील अनेक नव्यानव्या गोष्टींचा उगम त्यातून झाला. त्यातूनच तो काळ आकडे, समीकरणे यांचा होता. त्या काहीशा रूक्ष वाटणार्या वातावरणात बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स तितकेसे परिणामकारक ठरले नाही.
बिहेविअरल इकॉनॉमिक्सची लोकप्रियता: डॅनिएल कॅनेमन आणि अॅमोस Tversky यांचे योगदान
पण १९७० च्या दशकात प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्डचे अॅमॉस Tversky या दोन मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या महत्वाच्या गाभ्यालाच (माणसे रॅशनल असतात) धक्का लावला. माणसे खरोखरच रॅशनल नसतात हे 'गट फिलिंग' कोणाला नसेल असे वाटत नाही. पण संशोधनाच्या जगतात नुसते 'गट फिलिंग' कामाचे नाही. तर आपले म्हणणे एका मॉडेलच्या स्वरूपात मांडता आले पाहिजे. कॅनेमन आणि Tversky यांनी अनेक प्रयोग केले, आकडेवारी गोळा केली आणि आपले मॉडेल मांडले. त्यांनी हे खूपच महत्वाचे काम केले. या सर्व प्रयोगांविषयी प्राध्यापक कॅनेमन यांनी Thinking, Fast and Slow या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. जर एखादे पुस्तक वाचून आंतर्बाह्य हादरून जाणे म्हणजे काय हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. आपण फार रॅशनल आहोत असा आपल्या सगळ्यांचाच (विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचा) समज असतो तो किती मोठा गैरसमज आहे याचा अनुभव ते पुस्तक वाचताना अगदी पदोपदी येतो.
ज्या गृहितकावर पूर्ण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा डोलारा अवलंबून होता त्यालाच धक्का लावणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. या महत्वाच्या कामाबद्दल प्राध्यापक डॅनिअल कॅनेमनना २००२ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. प्राध्यापक अॅमॉस Tversky यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते म्हणून त्यांना नोबेल मिळू शकले नाही.
रिचर्ड थेलर आणि बिहेव्हिअरल फायनान्स
प्राध्यापक डॅनिअल कॅनेमन यांचे कार्य अफलातून होते यात तीळमात्र शंका नाही. पण ते मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचे काम जास्त मानसशास्त्राच्या अंगाकडे झुकणारे होते. निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरवायचे काम त्यांनी केले. पण त्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या तत्वांचा अर्थशास्त्रात अधिक उपयोग कसा करता येईल याविषयी काम केले रिचर्ड थेलर यांनी.
अमेरिकेत विद्यापीठांमध्ये 'फ्रेशवॉटर स्कूल' आणि 'सॉल्टवॉटर स्कूल' हा प्रकार आहे.फ्रेशवॉटर स्कूल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो, कार्नेगी मेलॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर यासारखी गोड्या पाण्याच्या ग्रेट लेक्सजवळ वसलेली विद्यापीठे तर सॉल्टवॉटर म्हणजे हार्वर्ड, प्रिन्सटन, कोलंबिया, बर्केले, यु.सी.एल.ए इत्यादी समुद्राजवळ वसलेली विद्यापीठे. फ्रेशवॉटर स्कूलमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्स, फ्री मार्केट आणि एकंदरीत उजव्या विचारांचे तर सॉल्टवॉटर स्कूलमध्ये समाजवादी, डाव्या विचारांचे प्राबल्य. आता हा फरक बराच कमी झाला तरी आहे पण प्राध्यापक थेलर पी.एच.डी झाले तेव्हा (१९७५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या फ्रेशवॉटर विद्यापीठातून) फ्रेशवॉटरमधून पी.एच.डी झाल्यास सॉल्टवॉटरमध्ये (आणि व्हाईस-व्हर्सा) प्राध्यापक म्हणून घेतले जायचे प्रमाण बरेच नगण्य होते. त्यातून थेलर पी.एच.डी झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून लागले (जिथे रघुराम राजन सध्या प्राध्यापक आहेत).
युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोचा उल्लेख मुद्दामून करत आहे. कारण याच विद्यापीठात मिल्टन फ्रिडमन हे उत्युंग व्यक्तीमत्व एकेकाळी अर्थशास्त्राचे (बूथ स्कूलमध्ये नव्हे) प्राध्यापक म्हणून होते.) तसेच ज्यांना 'फादर ऑफ मॉडर्न फायनान्स' म्हटले जाते ते प्राध्यापक युजीन फामा हे पण बूथ स्कूलमध्येच प्राध्यापक होते. मिल्टन फ्रिडमन यांनी १९५० च्या दशकात फायनान्शिअल मार्केटमधील किंमती कशा ठरविल्या जातात याविषयी सुरवातीचे काम केले. त्यावेळी फ्रिडमनने म्हटले की सर्व फायनान्शिअल सेक्युरीटी (शेअर/बॉन्ड इत्यादी) त्यांच्या योग्य त्या किंमतीला (म्हणजे भविष्यात येणार्या सर्व कॅश-फ्लो ला डिसकाऊंट करून आलेल्या प्रेझेन्ट व्हॅल्यूला) विकल्या जातात. जर का काही काळ ही किंमत त्यापेक्षा वेगळी असेल तर 'आर्बिट्रेजर' त्याचा फायदा उठवतात आणि सर्व फायनान्शिअल सेक्युरीटींची किंमत त्यांच्या 'फंडामेन्टल किंमतीला' विकली जातील अशी परिस्थिती निर्माण करतात. १९७० मध्ये प्राध्यापक युजिन फामा (२०१३ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांनी त्यात आणखी भर टाकून 'एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस' मांडले.
प्राध्यापक रिचर्ड थेलर यांनी सुरवातीला एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस वर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (किंबहुना बिहेव्हिअरल फायनान्स) च्या अंगाने काम केले. या हायपोथिसिससाठीही माणसे रॅशनल असतात हे गृहितक होते. थेलर आणि इतर प्राध्यापकांच्या कामातून फायनान्शिअल मार्केटमध्ये सर्व भाग घेणारे रॅशनल असू शकत नाहीत हे दाखवून दिले.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमध्ये राहून मिल्टन फ्रिडमन आणि युजीन फामा यांच्यासारख्या stalwarts चे काम पूर्णपणे बरोबर नव्हते हे दाखवून देणे ही खूप मोठी गोष्ट होती.
नज
इंग्लिशमध्ये नज (nudge) या शब्दाचा अर्थ आहे: "prod (someone) gently with one's elbow in order to attract attention.". रिचर्ड थेलर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कॅस सनस्टीन यांनी अधिक चांगल्या पॉलिसी मेकिंग साठी 'नज' चा वापर कसा करता येईल याविषयी नज हे पुस्तक लिहिले आहे.
अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे. हे उदाहरणे देऊनच अधिक स्पष्ट करता येईल.
१. शाळेतील विद्यार्थ्यांना 'तुम्ही जंक फूड' न खाता फळे आणि सॅलड खा असे कितीही सांगितले तरी ते त्यांना पाहिजे तेच पिझ्झा बर्गर इत्यादी खाणार. म्हणून शाळेच्या कॅफेट एरिआमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल या उंचीवर पुढे फळे, सॅलड इत्यादी सकस खाणे ठेवायचे आणि जंक फूड मागे ठेवायचे.
२. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये रिटायरमेन्ट फंडांमध्ये इच्छा असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा असा पर्याय असतो. त्यातून होते असे की सबस्क्राईब करायचे असेल तर त्यासाठी नव्या नोकरीच्या ठिकाणी जॉईनिंग फॉरमॅलिटी करताना मुद्दामून एक टिक करावा लागायचा. आपल्याला वाटेल की एका टिकमध्ये काय मोठेसे. पण प्रत्यक्षात तसे नसते. लोक बहुतांश वेळा जो काही 'डिफॉल्ट ऑप्शन' असेल तोच चालू ठेवतात. मग कल्पना अशी की डिफॉल्टच 'ऑप्ट-इन' ठेवला तर? म्हणजे कर एखाद्याला रि टायरमेन्ट फंडात पैसे गुंतवायचे नसतील तर त्याने/तिने बाहेर पडायच्या ऑप्शनवर टिक करावे. तसे न केल्यास 'बाय डिफॉल्ट' तो कर्मचारी आपोआप रिटायरमेन्ट फंडात गणला जाणार!!
म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.
नज या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा लेख आधीच प्रचंड मोठा झाला आहे म्हणून विस्तारभयास्तव ती टाळतो. एकूणच काय की कोणावरही कसलीही सक्ती न करता त्या माणसाच्या हिताचा निर्णय घ्यायला तो आपण होऊन उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे 'नज'. इंग्लंडच्या सरकारने पब्लिक पॉलिसीमध्ये नज कसे अंमलात आणता येतील यासाठी रिचर्ड थेलर यांचा सल्लाही घेतला होता.
इफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस आणि नज याव्यतिरिक्त प्राध्यापक थेलर यांचे इतरही काम आहे. पण त्याविषयी लिहायचे झाले तर आणखी एक लेख लागेल. तेव्हा ते टाळतो. या लेखातून बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर थोडेफार लिहायला मिळाले याचे समाधान वाटते.
लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसमधील प्राध्यापक दिलीप सोमण यांनी शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून पी.एच.डी केली आणि त्यांच्या डिफेन्स कमिटीमध्ये प्राध्यापक रिचर्ड थेलरही होते. आज रिचर्ड थेलरना नोबेल पारितोषिक मिळालेच आहे. त्यानंतर त्यांच्या दिलीप सोमण या विद्यार्थ्याकडूनही असेच काम व्हावे आणि आणखी १५-२० वर्षांनंतर त्यांच्यावरही असाच लेख लिहायची संधी मिळावी ही इच्छा.
रिचर्ड थेलरना नोबेल मिळाल्यानंतर खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे. त्यांच्यावर आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर एखादा छोटेखानी लेख आजच मिपावर लिहावा असे त्यांना नोबेल मिळाल्याची बातमी दुपारी वाचल्यापासून फार वाटत होते. (हा लेख छोटेखानी न राहता मोठेखानी झाला आहे ही गोष्ट वेगळी :) ) तसे करता आले याचे समाधान आहे. In reply to लेख आवडला. by मार्मिक गोडसे
In reply to लेख छान, लेखकाचे संशोधन कष्ट by पगला गजोधर
In reply to या ट्विटमुळं, भारतात by पगला गजोधर
In reply to म्हणजेच याचा अर्थ असा की by मामाजी
In reply to नै वो मामुजान... by पगला गजोधर
In reply to पग साहेब,आमचा फोकस, by मामाजी
म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.हे अत्यंत उत्तम उदाहरण आधी वाचलेलं एका रिसर्च पेपर मधून, तुमच्या लेखामुळे तो पेपर परत आज शोधून सगळा वाचून काढला (२ पानी आहे सोप्या भाषेत) Do Defaults Save Lives? याच्या मध्ये युरोपियन देशांचा डेटा दिलाय, तसेच रेफेरेंन्सस मध्ये रिचर्ड थेलर, कॅस सनस्टीन, डॅनिएल काहनेमान आणि अॅमॉस Tversky या दादा लोकांची नावे सुद्धा आहेत :)
अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे.ह्या गोष्टी आजकाल जागोजागी पाहायला मिळतात, कधी कधी तर एखाद्याला खूप सारे ऑपशन्स देऊन गोंधळात टाकून आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला लावणे सुद्धा याचाच एक प्रकार आहे असे वाटते.
In reply to उत्तम लेख इथेच न थांबता याची by अमितदादा
कधी कधी तर एखाद्याला खूप सारे ऑपशन्स देऊन गोंधळात टाकून आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला लावणे सुद्धा याचाच एक प्रकार आहे असे वाटते.नाही. खूप सारे ऑप्शन दिले तर समोरचा माणूस अजून गोंधळून जातो. नजमध्ये खूपसारे ऑप्शन देणे अपेक्षित नाही तर जे काही ऑप्शन आहेत त्यांची एका अर्थी पुनर्रचना करणे अपेक्षित आहे. म्हणजेच समोरच्याने जो ऑप्शन स्विकारावा असे आपल्याला वाटते तो ऑप्शन अधिक ठळकपणे किंवा समोरच्याच्या लगेच लक्षात येईल अशाप्रकारे ठेवायचा ज्यामुळे आपोआपच समोरचा माणूस तोच ऑप्शन स्विकारायला उद्युक्त होईल. खूप सारे ऑप्शन दिले तर माणूस गोंधळून जातो यावर The Paradox of Choice: Why More Is Less हे प्राध्यापक बॅरी श्वार्झ यांचे पुस्तक वाचनीय आहे. अधिक ऑप्शन असू नयेत असा त्याचा अर्थ नसला तरी खूपसारे ऑप्शन दिले तर माणूस बर्याचदा गोंधळून जातो आणि निर्णय घ्यायला उशीर लावतो हा मुद्दा आहे. प्राध्यापक बॅरी श्वार्झ यांचा या विषयावरील टेड टॉक खाली देत आहे:
In reply to प्राध्यापक बॅरी श्वार्झ by मिल्टन
खूप सारे ऑप्शन दिले तर समोरचा माणूस अजून गोंधळून जातो.हो हे मला हि मान्य आहे ते मी लिहिलेलं आहे, माझ म्हणण असे होते कि जेंव्हा तो गोंधळतो तेंव्हा निर्णयाची जबाबदारी पुढच्यावर सोपवतो उदारणार्थ> डॉक्टर, विमा agent, आणि मग ते त्यांना फायदेशीर निर्णय घेतात, माझे मूळ वाक्य हाच अर्थ काढते, त्यचा आणि nudge चा संबंध आहे का हा प्रश्न मनात होता ज्याच उत्तर मिळाल. जेंव्हा निर्णयाची जबाबदारी स्वतवर असते तेन्व्हा मात्र तो उशीर करतो हे तुमच आणि चित्रफिती मधलं म्हणण पूर्ण मान्य. तुमच्या प्रतिसादबद्दल आणि चित्रफितीबद्दल धन्यवाद. चित्रफित अर्धी पहिली रोचक आहे, सगळे मुद्दे पटले, डॉक्टरचा हि.
In reply to उत्तम by नंदन
In reply to मला जे म्हणायचे होते by रामदास
In reply to धन्यवाद मिल्टन. येल चे by गंम्बा
In reply to रॉबर्ट शिलर by मिल्टन
जर का असा नफा सतत मिळवता आला तरच ही थिअरी खोटी आहे असे म्हणता येईल. रॉबर्ट शिलरनी ही थिअरी कोणत्या परिस्थितीत खोटी ठरू शकते हे दाखवून दिले.पुन्हा धन्यवाद मिल्टन. हे वरचे जास्त उलगडुन सांगाल का? म्हणजे कोणत्या परिस्थितीत हि थिअरी खोटी ठरते? इर्रॅशनल बिहेवियर असेल तर का?
In reply to जर का असा नफा सतत मिळवता आला by गंम्बा
म्हणजे कोणत्या परिस्थितीत हि थिअरी खोटी ठरते? इर्रॅशनल बिहेवियर असेल तर का?निओक्लासिकल मॉडेलप्रमाणे शेअरची किंमत त्या शेअरमधून भविष्यात येणार्या सर्व डिव्हिडन्डची प्रेझेन्ट व्हॅल्यू इतकी असते. पण रॉबर्ट शिलर यांच्या मते शेअर बाजारातील किंमतींचे चढउतार (व्होलॅटिलिटी) इतके असतात की शेअरची किंमत आणि डिव्हिडन्डची प्रेझेन्ट व्हॅल्यू यातील नाते कोलमडते. यावर १९८१ मध्ये त्यांनी दोन पेपर लिहिले होते. ते वाचायचा प्रयत्न केला पण ते वाचताना तामिळ भाषेतले वर्तमानपत्र वाचत आहे असे वाटायला लागले इतक्या प्रमाणात ते गणित आणि विशेषतः इकॉनॉमेट्रिक्सने भरलेले होते. अर्थात त्यातले मला काहीही कळले नाही. मध्यंतरी प्राध्यापक अॅन्ड्राई श्लायफर यांचे Inefficient Markets: An Introduction to Behavioral Finance (Clarendon Lectures in Economics) हे पुस्तक एकाने वाचायला दिले होते ते वाचले. त्यात उल्लेख होता की रॉबर्ट शिलरचे हे काम अगदीच महत्वाचे होते. ते नक्की कसे आणि त्याचे महत्व काय हे मला समजले नाही. तसेच हे पुस्तक वाचताना आमच्या एका प्राध्यापकांनी वर्गात बोलताना सांगितलेली एक गोष्ट आठवली. रॉबर्ट शिलरनी Irrational Exuberance हे पुस्तक लिहिले आहे आणि त्यात गुंतवणुकदारांनी मार्केट स्वस्त असताना जर दीर्घ काळासाठी (१० वर्षांपेक्षा जास्त) गुंतवणुक केली तर त्यांना मिळालेला परतावा एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिसप्रमाणे अगदी 'रॅन्डम' नसेल असे दाखवून दिले आहे असे त्यावेळी कळले होते. मी अजून ते पुस्तक वाचलेले नाही पण आधीच्या प्रतिसादाच्या निमित्ताने तो वर्ग आठवला आणि आंतरजालावर थोडीफार खोदाखोद केली असता रॉबर्ट शिलरनी खरोखरच तसे म्हटले आहे याची खात्री करून घेतली. आणि त्यासाठी त्या १९८१ मधील दोन पेपरचा संदर्भ आहे. इकॉनॉमेट्रिक्स येत नसल्याची मर्यादा अगदी पदोपदी जाणवते. कारण त्या माहितीशिवाय कोणत्याही पेपरमध्ये लेखकाचा दृष्टीकोन आणि त्याने नक्की काय कारणमिमांसा दिली आहे हेच मुळात समजत नाही. वाचायचा प्रयत्न करायचा आणि नाही समजले की नुसते अनुमान वाचायचे असे अनेकदा करायला लागते. त्यातच कोणत्याही आघाडीच्या जर्नलमधील पेपरमध्ये न केलेला किंवा दिशाभूल करणारा दावा अनुमानात (कन्क्लुजन) मध्ये असणार नाही या खात्रीवर विसंबून राहावे लागते :(
म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचाही नेहेमीच होत नसावे! क्रेडिट कार्ड्ची रक्कम भरताना सहसा तीन पर्याय दिले जातात - १) किमान रक्कम २) एकूण रक्कम ३) अन्य रक्कम आता जरा प्रत्येकाने तपासून पहावे की आपली बँक डिफॉल्ट पर्याय काय देते ती!!
In reply to डिफॉल्ट पर्याय by सुनील
In reply to अजुन एक चालूपणा म्हणजे, by गंम्बा
In reply to डिफॉल्ट पर्याय by सुनील
ही नेहेमीच होत नसावे!नक्कीच. नज थिअरीप्रमाणे समोरच्या माणसाच्या हिताचा डिफॉल्ट ऑप्शन ठेवावा असे सुचविले आहे. सध्या तसे होत नाही हे उघडच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बँका म्हणजे नफा मिळविणारा व्यवसाय झाला. अशा ठिकाणी नज वापरताना एक conflict of interest येईल. मॅनेजमेन्टने समोरच्याच्या हिताचा निर्णय घ्यायचा म्हणजे नक्की कोणाच्या हिताचा निर्णय घ्यायचा? बँकेच्या हिताचा की ग्राहकाच्या हिताचा? जर नफा मिळविणे हा उद्देश असेल तर ग्राहकाच्या हिताचा निर्णय घेतला जायची शक्यता तितकी कमी होते. तेव्हा नज चा वापर नफा मिळवायच्या व्यवसायात नव्हे तर पब्लिक पॉलिसीसाठी केला जाणे अभिप्रेत आहे. नज ही संकल्पना मांडली जाण्यापूर्वी व्यवसाय आपला नफा वाढविण्याच्या दिशेने आपल्या ग्राहकांना नज करत होते का? नक्कीच. एक उदाहरण द्यायचे तर वॉलमार्ट स्टोअर्सची रचना अशा पध्दतीने केलेली असते की दूध, ब्रेड, अंडी इत्यादी काहीही झाले तरी लोक खरेदी करणारच अशा गोष्टी प्रवेशद्वारापासून एकदम लांब दुसर्या टोकाला ठेवलेल्या असतात. त्यातून होते असे की किमानपक्षी तेवढी खरेदी करायची असली तरी ग्राहकाला इतर सगळे सेक्शन ओलांडून सगळ्यात शेवटी जाणे आले. आणि मग काहीतरी दिसून ते विकत घ्यावेसे वाटणे आले आणि प्रत्यक्ष विकत घेतले जाणे आले. तसेच लहान मुलांना आकर्षित करणार्या गोष्टी त्यांच्या नजरेस पडतील अशा उंचीला ठेवलेल्या असतात. म्हणजे एखादी गोष्ट दिसून मुलांचा हट्ट (जरी अमेरिकेत हा प्रकार बराच कमी असला तरी) करणे आणि म्हणून ती वस्तू विकत घेतली जाणे या गोष्टी आल्या. तसेच बिलिंग काऊंटरच्या जवळ पटकन तोंडात टाकण्यासारख्या स्वस्तातल्या गोष्टी (च्युईंग गम वगैरे) ठेवलेल्या असतात. त्यातूनच बिलिंग काऊंटरच्या लाईनमध्ये असताना पटकन कसलीतरी खरेदी होणे आले. एका अर्थी वॉलमार्टही ग्राहकांना आपला खप (आणि म्हणून नफा) वाढावा या दिशेने नज करत आलेच आहे.
In reply to पब्लिक पॉलिसीसाठी by मिल्टन
In reply to पब्लिक पॉलिसीसाठी by मिल्टन
रिचर्ड थेलर यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर वरिल ट्विट करुन सर्वात आधी समर्थन केलं होतं. पण नंतर जेंव्हा त्यांना कळले की १००० ची नोट बंद करुन, २००० ची नवीन नोटा पुन्हा आणलेय त्यावर खालील ट्विट करुन त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.This is a policy I have long supported. First step toward cashless and good start on reducing corruption. https://t.co/KFBLIJSrLr
— Richard H Thaler (@R_Thaler) November 8, 2016
really? Damn.
— Richard H Thaler (@R_Thaler) November 8, 2016
In reply to This is a policy I have long by प्रसाद_१९८२
In reply to कॅशलेस by मिल्टन
In reply to रोखीचे व्यवहार कमी झाले तर by सुबोध खरे
रोखीचे व्यवहार कमी झाले तर भ्रष्टाचार कमी होईल असे म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार शोधून काढणे जास्त सोपे जाईल.हो बरोबर. पण रोखीचे व्यवहार कमी झाले तर कदाचित भ्रष्टाचार करायचे नवे मार्ग (कदाचित आपल्यासारख्या लोकांना कल्पनाही करता येणार नाही असेही) निर्माण होऊ शकतील अशी भिती वाटते. कदाचित हे माझे विशफुल थिंकिंग असेल. तसे प्रत्यक्षात झाले नाही तर अती-उत्तम. पण तसे व्हायची शक्यता अगदी ०% आहे का? तर याचे उत्तर निसंदिग्धपणे नाही असे मला तरी देता येत नाहीये. मी (मी म्हणजे जे काही वाचले आहे आणि मला काही अनुभव आले आहेत त्यावरून) हे का म्हणत आहे? ते ८ नोव्हेंबरला कळेल. :)
In reply to कॅशलेस by मिल्टन
In reply to कॅशलेस by मिल्टन
In reply to आपण भारतीय लोक "जुगाड" किंवा by सुबोध खरे
डिजिटायझेशन करा अथवा नाही "आपण लोक" भ्रष्टाचार करणार नाही हे अशक्यच आहे.माझा मुद्दा इन जनरल आहे, म्हणजे केवळ भारतीय लोकांसाठी नाही तर कुठल्याही समाजातील लोकांसाठी निगडीत आहे. आता फार लिहित नाही. तो लेख जरा मला वेळ काढून व्यवस्थित लिहायचा आहे. त्यामुळे लवकरच सुरवात करायला हवी :) मराठी कथालेखकः ८ नोव्हेंबरला तो लेख प्रसिध्द करायचा मानस आहे.
In reply to लेख by मिल्टन
In reply to रोखीचे व्यवहार कमी झाले तर by सुबोध खरे
In reply to लेख चांगला आहे. परंतु ज्या by श्रीगुरुजी
थेलर यांच्याऐवजी किंवा त्यांच्याबरोबरीने रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता आनंद झाला असता.रघुराम राजन यांचे नाव क्लॅरीव्हेट अॅनॅलिटिक्सच्या त्या यादीत आल्याचा भारतीय मिडियामध्ये गवगवा बराच जास्त झाला. पण त्यांना या वर्षी नोबेल मिळायची शक्यता त्यामानाने बरीच कमी होती असे मला वाटते. एकतर या यादीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जगदीश भगवती आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अविनाश दिक्षित या दोन भारतीय मुळाच्या प्राध्यापकांचे नाव पूर्वीपासूनच होते. त्याचा कधी गवगवा झाल्याचे ऐकिवात नाही. एकूणच रघुराम राजन हे मिडिया-फ्रेंडली असल्यामुळे आणि त्यामानाने भारतीयांसाठी ताज्या आठवणीत असल्यामुळे त्यांच्या नावाचा बराच जास्त गवगवा झाला असावा. दरवर्षी जगातील आघाडीच्या अर्थतज्ञांची परिषद वायोमिंग राज्यात जॅकसन होल या ठिकाणी भरते. २००५ सालची परिषद तत्कालीन फेडचे गवर्नर अॅलन ग्रीनस्पॅन यांची शेवटची परिषद होती. त्या परिषदेत इतर सर्वांनी ग्रीनस्पॅन यांच्या निर्णयांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत कसे सुवर्णयुग आले आहे याचे गोडवे गायले होते. पण रघुराम राजन यांनी मात्र Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून भयंकर मोठे आर्थिक संकट येणार आहे असा इशारा दिला. त्यावेळी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेतले नाही पण त्यानंतर ३ वर्षातच राजन यांचेच म्हणणे बरोबर होते हे सिध्द झाले. या सगळ्या गोष्टी कितीही खर्या असल्या तरी नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी अगदी पाथब्रेकिंग काम त्यांनी नक्की कोणते केले आहे याविषयी कल्पना नाही. आर्थिक संकट येणार आहे याची चाहूल इतरांपेक्षा आधी देणे हे नोबेलसाठी पुरेसे आहे का? ज्याप्रकारे डॅनिएल कॅनेमन यांनी मुळातल्या निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरा दिला आणि एका अर्थी नव्या रिसर्चसाठी मार्ग उघडून दिला ते जसे पाथब्रेकिंग काम होते त्या तोडीचे नक्की कोणते काम राजन यांनी केले आहे याची मला तरी कल्पना नाही. त्यांनी शंभरेक रिसर्च पेपर लिहिले आहेतच. पण आघाडीच्या प्राध्यापकांनी अगदी ३००-४०० पेपर्स प्रकाशित करणे ही पण त्यामानाने नेहमी बघायला मिळणारी गोष्ट आहे. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे युजिन फामांनी महत्वाचे काम केले होते १९७० च्या दशकात. त्यांना नोबेल दिले गेले २०१३ मध्ये. रॉबर्ट शिलर यांचाही कालावधी साधारण त्याच दरम्यानचा. त्यांनाही २०१३ मध्येच नोबेल दिले गेले. डॅनिएल कॅनेमन १९७० च्या दशकापासून संबंधित काम करत होते. त्यांना नोबेल मिळाले २००२ मध्ये. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की नोबेल देताना नुसते केलेले काम जबरदस्त आहे एवढेच न बघता ते काम काळाच्या कसोटीवर उतरलेले आहे हे पण बघतात. रघुराम राजन २५ वर्षांपासून प्राध्यापक आहेत. त्यांनी कितीही काम केलेले असले तरी त्यांना अजून पुरेसा कालावधी मिळालेला नाही असे दिसते. अजून काही वर्षांनी ही अडचण दूर होईल. त्यामानाने सध्या जगदीश भगवती आणि अविनाश दिक्षित कितीतरी जास्त पुढे आहेत. त्याचे कारण ते गेल्या ४०-५० वर्षांपासून अॅकॅडेमिक्स मध्ये आहेत. अर्थात हे यापूर्वी वापरलेले ठोकताळे वापरून बांधलेले अंदाज आहेत. जर नोबेल कमिटी नुसत्या हवेतले बोलणे आणि मोठ्यामोठ्या गप्पांच्या आधारे बराक ओबामांना पहिल्या कारिकिर्दीत ७-८ महिन्यातच नोबेल जाहिर करू शकत असेल तर त्यांनी स्वतःचेच ठोकताळे बदलले आहेत असे म्हणायलाही जागा आहे.
In reply to थेलर यांच्या कामाचे महत्व by मिल्टन
In reply to थेलर यांच्या कामाचे महत्व by मिल्टन
माणूस रॅशनल नाही हे बर्याच अंशी मान्य करायला तरी काहीच हरकत नसावी.
यावर जरासे...
आधुनिक शास्त्रिय संशोधनासारखे कडक नियमांनी बांधलेले काही विशिष्ट विषय सोडले तर, सर्वसाधारण व्यवहारांत माणूस रॅशनल कधीच नव्हता. सर्वप्रथम, एखाद्या गोष्टीबद्दल रॅशनल निर्णय घ्यायला त्यासंबंधीची सर्व तथ्ये आणि आकडे उपलब्ध असायला हवे, जे सर्वसामान्यपणे उपलब्ध असणे शक्य नाही *. त्यानंतर, त्यांचा कार्यकारण संबंध लावायला योग्य ती व योग्य तेवढी बौद्धीक संपत्ती असायला हवी, जी सगळ्या सर्वसामान्य लोकांत असत नाही.
वादाकरिता एखाद्या आदर्श व्यवस्थेत हे सगळे शक्य झाले आहे असे समजूया. तरीही...
१. इतक्या सर्व प्रक्रियेतून जायला लागणारी चिकाटी सर्वसामान्य माणसात नसते आणि / किंवा तो सहजपणे गोंधळून जातो;
आणि
२. एवढे करून मिळणार्या खरोखरच्या रॅशनल निर्णयाचे फलीत सुखकारक असेलच असेही नाही ! अर्थात, ते सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरणे / उतरवणे ही कठीण गोष्ट असते.
सर्वसाधारणपणे, माणूसाची मूळ प्रवृत्ती, तत्कालिक परिस्थिती जमेल तसे "सेल्फप्रिझर्वेशन (स्व-जतन)" करणे आणि ते जमल्यानंतर "सेल्फ ग्लोरिफिकेशन (स्व-गौरव)" साधण्याकडे, केंद्रित असते. ते करण्याची प्रक्रिया आणि मिळणारे फलित, दोन्ही शक्य तेवढे सुखकारक व्हावे ही त्याची धडपड असते. शिवाय, हे करताना समान परिस्थितीतही प्रत्येक माणूस तोच निर्णय घेईल असे नाही कारण, प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा, फलिताच्या अपेक्षा आणि ते मिळविण्यासाठी 'प्रयत्न करण्याची, वेळ द्यायची व धोका पत्करण्याची' क्षमता वेगवेगळी असते.
वरचे सगळे पाहता, सर्वसाधारण माणसाचे वागणे-बोलणे-निर्णय हे, त्याला उपलब्ध असलेली तथ्ये व आकड्यांपेक्षा जास्त; त्याच्या अपेक्षा, वैयक्तिक "भीती आणि लोभ (fear and greed) व (असलेच तर) भूतकालातील तत्सम अनुभव यांच्यावर शक्य असलेल्या फलिताच्या कल्पनेवर अवलंबून असतात. भूतकालातील तत्सम अनुभव नसले तर त्यात चिंतेची (अज्ञाताची भीती) भर पडते. या प्रकारे घेतलेले निर्णय रॅशनल (तर्कप्रामाण्याधिष्ठीत) कसे असू शकतील ?
मानवंशशास्त्राच्या दृष्टीने हे तसे वाईटही नाही... माणूस मुळात जर स्वजतन करण्यात अयशस्वी झाला नसता तर (माणूसच नाही म्हटल्यावर) आता अभिमान वाटणार्या त्याच्या इतर गमज्यासुद्धा आस्तित्वात आल्या नसत्या... हे कितीही बरे-वाईट वाटले तरी, निर्विवाद सत्य आहे !
सर्वच जीवन (आणि म्हणून इकॉनॉमीही) बहुतांश याच तत्वांवर चालते. याच, स्व-जतन आणि स्व-गौरव तत्वांवर माणूस दोन लाख वर्षे टिकून राहिला आहे आणि (संस्कृती, अर्थ, शास्त्र, इत्यादींच्या दृष्टीने) समृद्ध झाला आहे.
================
* : नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात, आणि तेवढ्याच भांडवलावर कारवाई करावी लागते. नाहीतर, तुमचा प्रतिस्पर्धी तशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांवर आधारीत कारवाई करून तुमच्यावर कुरघोडी करण्याची दाट शक्यता असते. सर्व खरी तथ्ये आणि आकडे, फक्त भूतकालात झालेल्या (पक्षी : संपलेल्या) गोष्टींबद्दलच उपलब्ध होतात ! :)
***************
नज ही थिअरीही टाकाऊ नक्कीच नाही. कधी आणि कोणत्या परिस्थितीत नज वापरावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून राहिल.
'नजिंग' हे तर माणुस 'विचारी' प्राणी झाला तेव्हापासून व्यवहारात आहे. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी ही एक कळीची गोष्ट आहे... इतर बहुतेक फरक तिचे परिणाम आहेत. 'नजिंग हे संकल्पना बनवण्याच्या (गोष्ट सांगण्याची उर्फ स्टोरी टेलिंग) क्षमतेचा एक भाग आहे. देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत). माणसांनी माणसांना या जीवनातली सुरक्षा, समृद्धी, सामाजिक, आर्थिक, इत्यादी फायदा आणि पारमार्थिक फायद्याच्या गोष्टी (संकल्पना) गळी उतरवून माणसांचे प्रचंड मोठे समुदाय बनविण्यासाठी 'नज' केले... येथेही "फियर आणि ग्रीड" यांचा उपयोगच कामी येतो. इतर प्राण्यांना हे शक्य झाले नाही / होत नाही. 'नज' करताना आपल्या हेतूला सकारात्मक असलेल्या गोष्टीला जास्त महत्व देणे आणि नकारात्मक गोष्टीला कमी महत्व देणे /लपवून ठेवणे; हे काही रॅशनल म्हणता येणार नाही, पण, ते अनेक कारणे सांगून/न सांगून माणसांच्या व्यवहारात सतत दिसते. :)
'नज'चे नेहमीच्या व्यवहारातले एक उत्तम उदाहरण म्हणजे सुपरमार्केटमध्ये बिल चुकते करण्याच्या जागांच्या (कॅशियर पॉइंट्स) जवळपास दिसणारी चॉकलेट्स (पिल्लू मंडळीना शेवटचा नज, उर्फ, 'मम्मा/पप्पा, हे हवंच्च मला' क्षण, उर्फ, ती वस्तू सरळ उचलून पैसे चुकते होईपर्यंत हातात घट्ट धरून ठेवणे); दाढीची आयुधे (पुरुषांचा 'आयला, हे संपलंय/संपत आलंय की' क्षण); आणि टिकल्या व तत्सम नेहमीच्या वापरातल्या प्रसाधन वस्तू ('अय्या, कित्ती छान आहे' क्षण)... :)
सुपरमार्केटमध्ये कोणती वस्तू कोठे ठेवावी यावर "एमबीए (रिटेल)" मध्ये अख्खे मोड्युल असते, ते याच (कस्टमर) बिहेवियरल एकॉनॉमिक्सचे ऑफशूट आहे. जाहिरातबाजीतला (आम्ही हे विकतो यापेक्षा, "काय म्हणता, हे तुमच्याकडे नाही ?!", असा संदेश देणारा (पक्षी : ग्राहकाच्या मनात असा कमतरतेचा संदेह उत्पन्न करणारा) उपयोग तर नेहमीचा झाला आहे.
***************
व्यवस्थापनशास्त्राचे मानवी स्वभावावर आधारित दोन मूलभूत नियम आहेत; ते मानवी जीवनात सर्वत्र लागू होतात :
१. "(दुसर्यांचे) मन बदला, (त्यांचे) शरीर अनुसरण करेल (चेंज द माईंड, बॉडी विल फॉलो)."
२. "त्यात माझा काय फायदा ? (व्हॉट इज इन इट फॉर मी ?)" याचे सकारात्मक उत्तर देऊ शकलात तर लोकांची समजूत घालायला इतर कोणत्याही पुराव्याची जरूर पडत नाही.
माणूस सारासार विवेकापेक्षा (तर्कप्रामाण्यापेक्षा) जास्त हितसंबंधांवर अवलंबून वागतो, याची चपखल उदाहरणे पावलो-पावली दिसतात, हे काय फार मोठे गुपित आहे काय ? ;) :)
In reply to रॅशनॅलिटी (तर्कप्रामाण्य) आणि 'नज' संकल्पना by डॉ सुहास म्हात्रे
नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात,असे "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" हेच आपण निर्णय कसे घेतो याचे योग्य मॉडेल आहे. माझ्या माहितीतील कोणीही सगळी युटिलिटीची आकडेमोड करून मग सर्वात जास्त युटिलिटी मिळेल तो निर्णय घेत नाहीत. आणि माझी खात्री आहे की मिपावरील कोणीही अशा गोष्टी करणार्या कोणाला ओळखत असेल. याच "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" ला हर्बर्ट सायमन यांनी 'सॅटिसफायसिंग" असे म्हटले. म्हणजे घेतलेला एखादा निर्णय अगदी सर्वोत्तम नसला तरी समाधानकारक असला तरी बहुतांश लोकांना चालण्यासारखे असते. याचे सर्वात चपखल उदाहरण म्हणजे एखाद्याला घर विकायचे असेल आणि जास्तीतजास्त १ कोटी येतील अशी अपेक्षा असेल आणि एक ग्राहक १ कोटी ५ लाख द्यायला तयार झाला तर ते घर विकण्याकडेच मालकाचा कल असेल. आता आणखी किंमत देणारा कोणी गिर्हाईक मिळणार नाही का? मिळेलही कदाचित. रॅशनॅलिटीच्या आकडेमोडीत एक गृहितक आहे की सगळे पर्याय आपल्यापुढे एखाद्या पत्त्याचा डाव उघडावा त्याप्रमाणे एकाच वेळी आहेत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसते. सगळे गिर्हाईक एकाच वेळी येणार नाहीत (हा काही लिलाव नाही). त्यामुळे एकाला घर विकायचे नाकारले तर दुसरा गिर्हाईक विचारात घेतला जाणार. अशा प्रसंगी कोणी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार झाले तर त्यालाच घर विकण्याकडे कल असतो. (घर विकायच्या प्रक्रीयेत आपल्याला नक्की किती पैसे मिळू शकतील ही अपेक्षा बदलली-- म्हणजे १ कोटीवरून १ कोटी १० लाख झाली तर त्यापेक्षा जास्त पैसे देऊ इच्छिणार्या गिर्हाईकाला घर विकले जाईल).
देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत).रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत. बहुतांश वेळा "नज" झालेल्या माणसाला आपण "नज" झाले आहोत हे लक्षातही येत नाही.
In reply to धन्यवाद डॉक्टरसाहेब by मिल्टन
रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत.
मी वर 'नज' बाबत केवळ रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या वित्तव्यवस्थेतील सकारात्मक उपयोगात बद्दल लिहित नव्हतो. तर 'नज' आदीम कालापासून मानवी जीवनातल्या सर्व अंगांना स्पर्श करून आहे, असे मला म्हणायचे आहे.
नजिंग ही, आदिम कालापासून सर्वसाधारण माणसाच्या जीवनात एक सर्वसाधारणपणे वापरली जाणारी पद्धत आहे... आणि त्यात इतरांनी आपले म्हणणे मानावे यासाठी "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" या मानवाच्या मूळ प्रवृत्तींचा उघड-छुपा उपयोग केला जातो. ही दुधारी तलवार आहे... ती कधी इतरांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी वापरली जाते (उपकारक), तर इतर वेळेस स्वार्थ साधण्यासाठी. हे जेवढे गुप्त ठेवता येईल तितका तिचा परिणामकारकपणा जास्त. यासंबंधिचे एक विनोदी (पण सत्य) वचन असे, "Expert motivator is the one, who will ask you to go to hell, in such a way that, you start looking forward to the journey !"
***************
"बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" : हे बनवतानाही 'माणूस / संस्था' यांच्या "मिशन-व्हिजन" यांच्या संबंधात सद्य परिस्थितीत असणारे "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" हे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असतेच. थोडक्यात, "भीती आणि लोभ" यांच्याविना मानवी निर्णय केवळ सैद्धांतिक जगातच (theoretical world) शक्य आहे. :)
In reply to रॅशनॅलिटी (तर्कप्रामाण्य) आणि 'नज' संकल्पना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फिअर आणि ग्रीड... by चौकटराजा
In reply to थेलर यांच्या कामाचे महत्व by मिल्टन
In reply to वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल by गंम्बा
वैयक्तीक रित्या माणुस रॅशनल नसतो, पण समुहानी आणि एका मोठ्या कालावधी मधे माणुस* रॅशनल असतो.हो बरोबर. याची फायनान्शिअल मार्केटसंदर्भातील कारणमिमांसा अशी की जे कोणी irrational लोक असतात ते रॅन्डमली ट्रेड करतात. त्यामुळे काही शेअर विकत घेतील तर काही तोच शेअर विकतील. त्यामुळे या दोन बाजू एकमेकांना कॅन्सल करतात आणि समुह म्हणून रॅशनॅलिटी शिल्लक राहते. एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस पूर्ण गंडलेले नाही आणि त्याच्या यशस्वीतेचे जेवढे काही पुरावे मिळाले आहेत त्यामागे हे कारण असावे असे मला वाटते. याला अपवाद म्हणजे 'मेंढरांसारखे वागायची' (हर्ड बिहेव्हिअर) प्रवृत्ती काही परिस्थितीत निर्माण होते हे आहे का? उदाहरणार्थ २००७-०८ चे आर्थिक संकट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावे. सुरवातीला काही इन्व्हेस्टर्स (अर्थातच संस्था, व्यक्ती नव्हे) सी.डी.ओ घेत आहेत म्हणून ते इतरांनी घेणे, त्यात नक्की जोखीम काय याकडे लक्ष न देणे, आणि सगळा बुडबुडा फुटायची वेळ आल्यावर आपले पैसे बुडतील या भितीने नॉर्दन रॉक या इंग्लंडमधील बँकेवर रन होणे या सगळ्या गोष्टी त्याचे उदाहरण आहेत आणि अर्थातच हे रॅशनल वागण्याचे लक्षण नक्कीच नाही. यातून झाले असे की बिअर स्टर्न किंवा लेहमन ब्रदर्स कोसळायच्या आधी काही महिने अशा घातक सी.डी.ओ मध्ये गुंतवणुक नसलेली नॉर्दन रॉक बँक विनाकारण बुडली हा दैवदुर्विलास.
In reply to एक मुद्दा by मिल्टन
In reply to माणूस rational की irrational.. by दीपक११७७
माणूस rational च की irrational च आहे हे एकाच वाक्यात सर्रास पणे शिक्का मारुन ठरवणेच अश्यक्य आहे,हो बरोबर. पण मुद्दा हा की निओक्लासिकल मॉडेलमध्ये गृहित धरले आहे तितक्या प्रमाणावर माणूस रॅशनल नक्कीच नाही.
In reply to तार्किक माणूस by गामा पैलवान
त्याचं काय आहे की तार्किकता ही एक अत्यंत फसवी संज्ञा आहे. ही मुळातून निरर्थक असते. हिला अर्थ प्राप्त करून देणारं रसामृत आहे ते माणसाचं उद्दिष्ट. अमुक एक कृती वा पर्याय तार्किक आहे की नाही हे तपासण्यासाठी पार्श्वभूमीवर उद्दिष्टाचा पट हवाच.पटलं.. पण मग उद्दिष्ट साध्य झालं तरंच कृती तार्किक?
In reply to तार्किक माणूस by गामा पैलवान
खरे तर सिंहगडाची चढाईचा प्लॅन आणि विशाळगडावरुन सुटकेचा प्लॅन ही तर्कबुद्धीचीच ( लॉजिकल विचारांची ) उदाहरणे आहेत.प्रस्तुत उदाहरणांतली तुम्ही म्हणता ती तर्कबुद्धी एका धडाडीच्या उद्दिष्टाभोवती लपेटलेली आहे. अन्यथा हिला काहीच अर्थ नव्हता. उद्दिष्ट ठरवणे ही एक तार्किक प्रक्रिया असेलंच याचीही खात्री नाही. या धाग्यात अर्थशास्त्राची चर्चा चालू आहे. या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे. मात्र सरसकटरीत्या हे उद्दिष्ट असेलंच याची खात्री नाही. नेमक्या याच कारणासाठी मी आधुनिक अर्थशास्त्रास अर्धशास्त्र म्हणतो. Economics is half science. आ.न., -गा.पै. वि.सू. : half म्हणजे टाकाऊ नव्हे.
In reply to अर्थशास्त्राच्या पार्श्वभूमीवर तर्क व उद्दिष्ट यांचं स्थान by गामा पैलवान
या शास्त्राच्या गृहितकानुसार प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट स्वत:चा पैसा वाढवणे आहे.हे तुम्ही नक्की कुठे वाचलेत हे समजू शकेल का?
In reply to ? by मिल्टन
In reply to दुसरं काय आहे? by गामा पैलवान
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?हे तुमचे गृहितक झाले. पैशामुळे समाधान मिळत असले तरी पैशामुळेच समाधान मिळते असे नाही. आणि अगदी क्लासिकल इकॉनॉमिक्सही केवळ युटिलिटी असाच शब्दप्रयोग करते. ती युटिलिटी (समाधान) पैसा किंवा अमुक एका गोष्टीतूनच यायला पाहिजे असे गृहितक अजिबात नाही. एकाच गोष्टीमधून दोघांना मिळणारी युटिलिटी वेगळी असू शकेल. तुम्ही बहुदा 'बजेट लाईन' आणि 'युटीलीटी लाईन' मध्ये गल्लत करत आहात. क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या गृहितकांप्रमाणे आपल्याकडे जितके पैसे आहेत (आपले बजेट) त्यात जास्तीत जास्त युटिलिटी म्हणजे समाधान देणारा पर्याय लोक निवडतात. पण मुळातली युटिलिटी नक्की कशातून येईल हे त्या माणसावर सोडलेले असते. वरकरणी या मांडणीत चुकीचे असे काहीच नाही. फक्त युटिलिटी मोजता न येणे, सगळी माहिती नसणे, युटिलीटीची सगळी आकडेमोड (जर अशी आकडेमोड करता आलीच तर) सगळ्यांनाच करता येईल असे नाही वगैरे वगैरे आक्षेप निघाले. कारण या सगळ्या गोष्टी करता यायला माणूस कोणीतरी सुपरनॅचरल हवा (ज्याला काही लेखकांनी 'इकॉन' म्हटले आहे). पण माणूस हा 'इकॉन' नसतो तर सामान्य 'ह्युमन बिईंग' असतो म्हणून हे सगळे युटिलिटीचे मॉडेल आपण नक्की निर्णय कसे घेतो त्याचे योग्य मॉडेल नाही हा आक्षेप आहे आणि त्यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले.
In reply to नाही by मिल्टन
In reply to अर्थशास्त्राचा उपयोग काय? by गामा पैलवान
In reply to निर्णयशास्त्र by मिल्टन
In reply to अर्थशास्त्राचा उपयोग काय? by गामा पैलवान
In reply to दुसरं काय आहे? by गामा पैलवान
पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?
पैसा आणि समाधान यांचा तडक (डायरेक्टली प्रपोर्शनल) संबंध (असलाच तर) अत्यंत कमी वेळा असतो.
मानवी जीवनात पैशाचे एकदिशा नकारात्मक महत्व नक्की आहे... पुरेसा पैसा नसला तर दु:ख/असमाधान बहुदा असतेच, मात्र, भरपूर पैसा असला तर सुख/समाधान असतेच असे नाही... या दुसर्या मनःस्थितीचे कारण माणसाची मुलभूत मानसिकता आहे, जिच्यामुळे जसजसा पैसा वाढत जातो तसतसे त्याच्या सुख-समाधानाच्या अपेक्षा क्षितिजाप्रमाणे विस्तारत (दूरदूर जात) राहतात. :) In reply to पैसा हे समाधान नसेल तर दुसरं by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिल्टन, by गामा पैलवान
हे सगळं अर्थशास्त्रापेक्षा सारीपाटशास्त्र (= गेम थियरी) वाटतं. त्याचा संबंध अर्थशास्त्राशी जोडणं कितपत व्यवहार्य असेल अशी शंका आहे.गेम थिअरी हा अर्थशास्त्राचाच भाग आहे. एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र. यात गेम थिअरी हा एका विशिष्ट परिस्थितीतील निर्णयप्रक्रियेची थिअरी आहे. ती विशिष्ट परिस्थिती म्हणजे आपण एखादी कृती करत असू त्यावरून समोरचा माणूस त्याची कृती करेल आणि आपल्या दोघांच्याही कृतीचा एकमेकांवर परिणाम होईल पण आपल्या कृतीला समोरचा काय उत्तर देणार हे आपल्याला माहित नसते तेव्हा. उदाहरणार्थ समजा ५ मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. आपल्या कंपनीला खर्च जास्त होतो म्हणून तोटा व्हायची वेळ आली म्हणून जर दर वाढवायचे आहेत असे समजू. पण यावर इतर कंपन्या नक्की कशा प्रतिक्रिया देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. जर इतर कंपन्यांना पण दर वाढवायची ही योग्य वेळ वाटली तर ठिक. पण इतर कंपन्यांनी दर वाढवले नाहीत तर? त्यातून होईल असे की आपण आपले ग्राहकही गमावून बसू कारण आपले दर इतर कंपन्यांपेक्षा जास्त असतील आणि त्यातून आपल्या अडचणी वाढतील. इतर कंपन्या काय करतील हे आज सांगता येणार नाही. म्हणजे आपल्या कृतीचा समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीचा आपल्यावर परिणाम होणार आहे पण समोरचा नक्की काय करणार आहे याची कल्पना आपल्याला नाही अशा परिस्थितीत नक्की कसा निर्णय घ्यावा याचा अभ्यास 'गेम थिअरी' मध्ये केला जातो. आपण वाण्याच्या दुकानात सामान घ्यायला गेलो तर तिथे गेम थिअरी लागू होणार नाही. कारण आपल्याकडे आहे त्या किंमतीला वस्तू विकत घेणे किंवा न घेणे हे दोनच पर्याय असतील. आपल्या कृतीमुळे समोरच्यावर आणि समोरच्याच्या कृतीमुळे आपल्यावर परिणाम होणार असली भानगड तिथे नाही. हा विषय पण प्रचंड इंटरेस्टींग असेल हे नक्कीच. गेम थिअरी या विषयातले प्राध्यापक अविनाश दिक्षित हे 'दादा' आहेत.
In reply to पैसा हे समाधान नसेल तर दुसरं by डॉ सुहास म्हात्रे

एकूणच अर्थशास्त्र म्हणजे निर्णयशास्त्र आहे-- वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत/घेतले जातात याचे शास्त्र.ही फार ढोबळ व्याख्या झाली. अर्थात त्यामुळे काही बिघडत नाही. पण त्यामुळे या शास्त्राची व्याप्ती बरीच वाढते. निर्णय तर प्रत्येक जण सतत घेतंच असतो. मग इकॉनॉमिक्सला नोबेल कशासाठी? जरी सामान्य माणसाला याची सीमा ठाऊक नसली तरी नोबेल पारितोषिक समितीस नक्कीच ठाऊक असावी. अन्यथा नोबेल देणं अवघड होऊन बसायचं. तर नोबेल निवड समितीने अर्थशास्त्राची व्याप्ती कशी ठरवली असेल याचं कुतूहल आहे. आ.न., -गा.पै.
लेख आवडला.