मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौसुत उंडा

अविनाशकुलकर्णी · · पाककृती
पोळ्या मौसुत व पदर सुटलेल्या हव्या असल्यास कणीक चांगली मळावी लागते..व ते काम नाहि तरी कष्टाचेच असते किलो भर कणीक ५/७ मीनीटात उत्तम पणे मऊ कशी मळावी याचे एक टेकनिक नेट वर टंगळमंगळ करताना सापडले.. एक किलो वा हव्या वजनाचे कणकीचे पीठ घ्या तेल मीठ पाणी टाकून मळा उंड्याला बोटाने चित्रात दाखवल्या प्रमाणे भोके पाडा व कणीक किती घट्ट भिजवली आहे याचा अंदाज घेत भोकावर पाणी शिंपडा मी चमच्या ने २-३ थेंब पाणी प्रत्येक भोकात टाकतो उंडा पलटा व दुस-या बाजुला बोटा नी भोके पाडुन थेंब २-३ थेंब पाणी टाका.. उंडा ५-६ मिनिटे झाकून ठेवा नंतर बाहेर काढा व २-३ मिनिटे मळा.. मौसुत उंडा तयार... .. ..........

वाचने 8542 वाचनखूण प्रतिक्रिया 7

जेम्स वांड Tue, 10/03/2017 - 17:01
इतक्या निगुतीने बोटाने भोके वगैरे पाडून, भोकात मोजून तीन थेंब पाणी सोडून माणसाने पोळ्या लाटाव्या कधी अन खाव्या कधी..... रिटायरमेंट नंतर सुद्धा असले चोचले जमतील का नाही शंकाच आहे, सबब आपला पास....