मला भेटलेले रुग्ण - ९
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/40777
पेशंटसोबत मुलगी आणि जावई आलेले होते ...... तपासणी झाल्यावर रिपोर्ट्स सांगितले.... औषध कशी घ्यायची, पेशंट प्रशिक्षण कार्यक्रमला येण्याची तारीख दिली .... आणि अजून काही विचारायचं आहे का असं म्हटल्याबरोबर पेशंट नी तक्रार केली कि मुलं लक्ष देत नाहीत तब्येतीकडे , बराच त्रास सहन करावा लागतो ह्या वयात ..... त्यांना कळायला पाहिजे ..... मी विचारलं कि सोबत कोण आहेत आलेले , तेव्हा पेशंट बोलला जावई आणि मुलगी आहेत ... मी म्हटलं कि मुलगी घेते आहे ना काळजी मग का त्रागा करून घेत आहेत , त्यावर पेशंट बोलला कि ३ मुलं आणि हि एक मुलगी आहे ... मुलं नाही विचारात पण जावई विचारतो हो ( डोळ्यात पाणी आलं होतं ) म्हणून वाईट वाटतं हो डॉक्टर ..... अहो मुलगा नाही तो जावई आणि आपला नाही मानलं ती मुलगीच करत आहेत ना तुमचा आणि ३ मुलं नाही करत म्हणून दुःखी होत आहेत तुम्ही .... खरं तर नशीबवान आहात तुम्ही कि मुलगी आहे तुम्हाला जी लग्नानंतरही तुमची काळजी घेते आहे ..... तेव्हा कुठे पेशंट ला थोडासा पटल्यासारखं वाटलं ....
--------------------------------------------------------------◼-------------------------------------------------------------------------------
पेशंटची मुलगी आणि पेशंट अश्या दोघीजणी आल्या होत्या ....... विचारलं कश्या आहेत आजी , दमा कमी आहे ना औषधं संपली का ? ...... त्यावर आजी म्हणाल्या कि मागच्या वेळी तुम्ही नाही भेटलात मोठे सर भेटले ..... पेशंटची मुलगी म्हणाली सर अहो तास काही त्रास नाहीये आईला पण तुम्हाला एकदा भेटलं कि तिला बरं वाटतं , त्यावर मी म्हणालो अहो आजी मी बघितलं काय मोठ्या सरांनी सारखंच ना ? त्यावर त्यांनी मान डोलावून नाही असा म्हटलं ;)) .... त्यांच्या मुलींनी सांगितलं तुमच्यावर फार विश्वास आहे हो आईचा फक्त तेवढ्यासाठी सोलापूर वरून येते आई .... हे असा ऐकलं ना कि काहीच बोलायला सुचत नाही ...... का कोण जाणे पण असे पेशंट भेटले ना कि स्वतःबद्दल खूपच छान असं काहीसं फीलिंग येतं ........ पुढचे अनेक क्षण मस्त जातात :))
-------------------------------------------------------------◼---------------------------------------------------------------------------------
डॉक्टर साहब अभी बहुत अच्छा लग रहा है। और आपने दूध फिरसे पिने की सलाह दी है ना उससे उनका वजन भी २ किलो बढ़ गया ...... राजस्थानी पेशंट होता आणि कोणीतरी दम लागतो म्हणून दूध बंद करायला सांगितलं आणि तब्येत अजून खराब झाली ... राजस्थानी,गुजराथी आणि हरयाणवी लोक दूध आणि दह्याशिवाय राहूच शकत नाहीत त्यामुळे त्यांना हे पथ्य पालन फारच क्लेशदायक असतं ...... पेशंट चा मुलगा आणि पेशंट आनंदी दिसत होते , मी म्हणालो "मैने तो जो सही है उतना करने को कहा। आपने वो किया और आपको अच्छा लग रहा है। " त्यावर पेशंट चा मुलगा बोलला कि "सर आपका नाम बहुत सुना था और हमारे फॅमिली डाक्टर साहब ने भी आपका नाम सुझाया था। " मी म्हणालो " अरे नहीं मेरा नहीं बड़े डाक्टर साहब है न उनका नाम बोला था , उनके अपॉइंटमेंट फूल थे इसलिए आपको मुझे दिखाने के लिए भेजा गया था"..... पेशंट चा मुलगा पुढे बोलला " लेकिन हमें तो सोना मिल गया ना सरजी "......... हि कंमेंट इतकी आल्हाददायक होती बास्स विचारू नका _/\_...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
12722
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा, मस्त
In reply to वा, मस्त by sagarpdy
+११११..........
In reply to +११११.......... by अरिंजय
+2222
In reply to वा, मस्त by sagarpdy
असेच म्हणतो आणि खाली बसतो...
मस्त हो डॉक्टर साहेब ..
In reply to मस्त हो डॉक्टर साहेब .. by भ ट क्या खे ड वा ला
+1
वा, डॉक्टर वा ..
अहाहा
In reply to अहाहा by अत्रन्गि पाउस
..
नेहमीप्रमाणे मस्त.
छान झालाय...
छान
तुमचे लिखाण वाचले कि मला आमचे