कायदेशीर सल्ला हवा आहे !
माझ्या एका स्नेह्याच्या बाबतीत खालील घटना घडली आहे , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !
घटना नीट समजून घेण्यासाठी आपण त्या गृहस्थास "मंगेश" असे नाव देऊ .
१) मंगेश हा पुणे मधल्या एका बऱ्यापैकी तंत्रद्यान ( Software ) कंपनी मध्ये साधारण २ वर्षापूर्वी नोकरी करत होता.
२) सदरची कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे.
३) साधारण २ वर्षापूर्वी काही कारणामुळे कंपनी नियमितपणे पगार देऊ शकत नव्हती , व्यवस्थापनाने लवकरच परिस्थिती पूर्वपदाला येईन असी आश्वासने अनेक वेळा दिली . परंतु साधारण ४/५ महिन्यांचा पगार थकल्यावर मात्र बऱ्यापैकी लोकांचा संयम संपला आणि साधारण महिन्याच्या अंतराने २०/२५ लोकांनी सदरची नोकरी सोडली . त्यात आपले स्नेही मंगेशराव पण होते.
४) हें २०/२५ लोक रीतसर नोटीस देऊन आणि नोटीसकाळ पूर्ण करून नोकरी सोडून गेले होते.
५) जेव्हा ह्यांनी नोकरी सोडली तेव्हा प्रत्येकाचा ४/५ महिन्याचा पगार आणि इतर वार्षिक बोनस , ग्राचुयती वगैरे रक्कम मिळणे बाकी होते.
६) व्यवस्थापनाने त्यांना सदरची रक्कम लवकरात लवकरात देऊ असे तोंडी आश्वासन दिले आणि काही लोकांना ( खूप मागणी केल्यानंतर ) एक लेटर दिले ज्यात सगळ्या रकमांचा उल्लेख आहे .
७) आता हि घटना होऊन साधारण २ वर्षे होते आली , मधल्या काळात सदर कंपनी केवळ वेगवेगळी कारणे सांगून पुढच्या महिन्यात , येत्या २ महिन्यात , पुढील १५ दिवसात देतो असे सांगून वेळ मारून नेत होती .
८) अजूनही सदर कंपनीने कसलेही ठोस आश्वासन दिलेले नाही आणि हल्ली असे कानावर येत आहे की त्या कंपनी ची आर्थिक स्थिती अजून ढासळली आहे....
९) आत्ता ह्या २०/२५ ( मंगेश सहित ) लोकांनी कायद्याचा मार्ग अवलंबवण्याचे ठरवले आहे .
१०) आता काही प्रश्न :
अ) ह्या २०/२५ लोकांना लेबर लो ( law ) चा फायदा मिळू शकतो का ? म्हणजे त्यांची केस लेबर कोर्टात चालेल की सिविल कोर्टात ?
ब) ह्यांची कसलीही संघटना नाही . ( IT मधल्या लोकांना करता येत नाही असे म्हणतात , खरे की आहे ? )
क) प्रत्येकाची साधारण अडकलेली रक्कम ३,००,००० ते १२,००,००० ह्या रेंज मध्ये आहे .
ड) एका वकील महाशयांचा सल्ला घेतला असता त्यांनी असे सांगितले की साधारण अडकलेल्या रकमेच्या २०% एवढा खर्च येऊ शकतो . ह्यात कागदपत्रांचा खर्च, वकिलाची फी , कोर्टाची फी ( किती असते आणि कशी ठरते हें कोणी सांगू शकले तर बरे होईन ), stamp duty , टेबला खालून द्यावे लागणारे पैसे इत्यादी गोष्टी सर्व आल्या !
इ) आत्ता २०% खर्च हा सगळ्यांना खूप जास्त वाटतो आहे !
११) कोणी मिसळपाव वर वकील असल्यास कृपया सल्ला द्या
१) सदर चे अडकलेले पैसे कसे मिळवतात येतील ?
२) योग्य कायेदेशीर प्रोसेस काय आहे ?
३) नक्की खर्च किती येईन ?
४) पुणे मधले चांगले लेबर वकिलांचा नंबर सांगितला तर उत्तम
१२) कृपया सदरचा धाग्यावर , अवांतर चर्चा होऊ देऊ नका, त्या २०/२५ नोकरदार आणि साधारण कधीही कोर्टाची पायरी न चढलेल्या लोकांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे !
धन्यवाद , आपल्या सल्ल्या च्या प्रतीक्षेत !
वाचने
15347
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मुख्य मुद्दा आहे वेळ किती लागणार !
त्यांना लेबर लॉ लागू होणार
In reply to त्यांना लेबर लॉ लागू होणार by यकु
धन्यवाद यक्कू ,
In reply to त्यांना लेबर लॉ लागू होणार by यकु
लेबर लॉ
In reply to लेबर लॉ by प्रमोद्_पुणे
ह्या विषयावर कोणी मार्गदर्शन
In reply to ह्या विषयावर कोणी मार्गदर्शन by धुमकेतू
कामगार कायदा (लेबर लॉ) हा
In reply to कामगार कायदा (लेबर लॉ) हा by पाषाणभेद
तालियाँ!!!!
In reply to कामगार कायदा (लेबर लॉ) हा by पाषाणभेद
भिड रे सच्या !! जरा अजुन
In reply to कामगार कायदा (लेबर लॉ) हा by पाषाणभेद
भारीच हां पाभे! ग्रेट.
सरळ
In reply to सरळ by कपिलमुनी
कपिलमुनी , हा मार्ग कसा सुरु
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by कपिलमुनी
जबर्या
काही सकारात्मक शक्यता
In reply to काही सकारात्मक शक्यता by सर्वसाक्षी
>>>>> वाइंड अप नोटीस -
वकीलाने टक्केवारीमधे खर्च
धिंगाणा
कपिलमुनी शी सहमत
अवघड आहे, तुम्ही म्हणताय
In reply to अवघड आहे, तुम्ही म्हणताय by ५० फक्त
तुम्ही म्हणताय कंपनी पब्लिक
सर्वात आधी , ज्यांच्या
स्विकारा.....
धन्यवाद मित्रानो ,
एका पेक्षा जास्त पध्दतीने प्रयत्न करावा.
वकील हे अत्यंत हलकट आणि नीच
दफोराच एकदम जबरदस्त लढा दिलात
कायदेशीर सल्ला हवा आहे , घटस्फोटा करिता
माझा पण असाच प्रकार आहे