Skip to main content

पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही

लेखक दमामि यांनी गुरुवार, 28/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय? पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय "मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन्  युक्तीचे सहा धडे कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले चहा पाजवा पुणेकरांना  सौराअभ्याने चिडविले दूध कुणाचे ,कपिलेचे की...?  कळ काढिती मुनीवर्य धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहाणे गजोधर. ओतून द्या हो ..नासून गेले... 'एसे' कोणी सांगितसे सांगा काय  दुधाचे केलं अभिदेशांना वाटतसे. इतक्या सगळ्या सल्ल्यांनंतर श्रीखंड बनले फर्मास ढवळत बसले इथे दमामि डोक्यामधल्या दह्यास.
लेखनविषय:

वाचने 9230
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

:)

"मार्मिक"धाग्यावर अशी कविता केली असती तर ती किती कडव्यांची झाली असती या विचाराने दिमाग का प्रथम दही हुवा व कालान्तराने त्या दह्याचा चक्का झाला!

ह्याह्याह्या... मस्त.. बादवे घुसळता दही, उडवीतत्यात भाजकी जिरे पूड , कोथंबीरीचे शिंतोडे... निचरे उष्मा, पोसे थंडावा, हिरवळ भासे चहूकडे.... . . . आदाब अर्ज है

=))

=)) =)) 'द' मामींचे पुनरागमनार्थ स्वागत !

In reply to by सस्नेह

'द' मामींचे पुनरागमनार्थ स्वागत !
दमामी परत आले, म्हणजे फॉरेन ट्रिप वर गेलेले ४-५ मिपा आयड्या भारतात परत आल्या वाटतं...

क्या बात है, व्वा! फाटलेल्या दूधाचे रसगुल्ले करून ते कारणी लावावं तद्वत झालं हे :-P

In reply to by टवाळ कार्टा

काहीजण स्वतःच्याच रचनेवर, स्वतःच खो खो खेळताना पाहून, मला एक मिपाकर म्हणून शरम वै वै

In reply to by अभ्या..

दमामि हा मिपावरच्या काही काकू मंडळींचा सामुहिक आयडी आहे असं माईसाहेबांनी नानासाहेबांना सांगताना ग्रेटथिंकरने ऐकलं असं टफि लुनावाल्या ब्रह्मेंना सांगत असल्याचं अकु एका कट्ट्याला बोलले.

In reply to by सूड

असं कसं, असं कसं.... आजूबाजू जर गोपिया, तर् मधे असेल .....कान्हा कान्हा कान्हा .. सगळ्या त्यांस छेडीती... म्हणोन टक्कुमक्कु.... शोना शोना शोना....

In reply to by टवाळ कार्टा

=))

=)