मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसं !

फिझा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माणसं ! महाग झालेली पुस्तकं परवडत नाहीत हल्ली पण स्वस्त झालेली माणसं वाचायला मिळतात ! अन सगळीकडे उपलब्ध पण असतात ! कधी कधी पटकन वाचून होतात माणसं कधी समजतच नाहीत, कळतंच नाहीत माणसं ! छोटी माणसं , मोठी माणसं जाड माणसं , बारीक माणसं ! खरी माणसं , खोटी माणसं , सगळ्या साईजची ,सगळ्या विषयांची माणसं ! काही अबोल, अव्यक्त, मनकवडी माणसं काही बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं आपणंच विशेषणे दिलेली माणसं स्वतःला विशेषणे लावून घेतलेली माणसं ! काही आपली , काही परकी माणसं दूर जाऊनही जवळ असलेली माणसं ! खोल खोल मनामधली, मनकवडी माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं ! खोल खोल मनामधली, प्रेमाची माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं ! तुझं , माझं , ज्याचं त्याचं करणारी माणसं मातीतून आलेली मातीतंच हरवणारी माणसं पाठीवर थाप, हातावर टाळी देणारी माणसं थरथरत्या हातानेही घट्ट धरून ठेवणारी माणसं स्वतःला देव मानणारी माणसं , तर कधी माणसांमधे देव शोधणारी माणसं ! खूप खूप प्रकारची नसलेली आणि असलेली माणसं , वाचून उरलेली काही ….. तर काही संपलेली पण अजूनही वाचावीत अशी ....... माणसं ! -----------------------फिझा

वाचने 1806 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पद्मावति 14/09/2017 - 16:02
खुप सुंदर! खोल खोल मनामधली, प्रेमाची माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं ! __/\__