कन्हैया कुमार आणि उमर खालिद : एक निवांत चर्चा
शीर्षक वाचून बऱ्याच लोकांच्या मनात लगेच प्रश्न आला असेल "देशविरोधी/देशद्रोही लोकांबरोबर निवांत चर्चा?"
आपल्याकडे हल्ली सोशल मीडियावर आणि काही ठरलेल्या चॅनेल्स वर स्वतःला सोयीस्कर अशा लोकांच्या प्रतिमा उभारल्या जात आहेत.
देशप्रेम, स्वदेशी या गोष्टी काही लोकांच्या सोयीनुसार ठरत आहेत आणि काही लोक तर स्वतःच्या अख्या कंपन्या कथित देशप्रेमावर चालवू लागल्या आहेत!
मग अशा वातावरणात निष्पक्ष चर्चा कशा होणार आणि लोकांचे खरे विचार समोर कसे येणार...
पण याच सोशल मीडियावर काही बऱ्यापैकी कन्टेन्ट पण असते कधीतरी सापडते!
असाच एक व्हिडीओ पहिला आणि तो शेअर करावासा वाटला. यात काही गहन चर्चा वगैरे नाहीये.
एका तरुण मुलाने दुसऱ्या २ मुलांशी मारलेल्या निवांत गप्पा... या प्रकारात हा व्हिडीओ आहे!
(यात काही अडल्ट जोक पण आहेत त्यामुळे सांभाळून बघा! )
हि चर्चा पाहिल्यावर जाणवलं कधीकधी आपल्यासमोर उगीचच एक बागुलबुवा उभारला जातो, जो प्रत्यक्षात कुठेच नसतो पण त्याची भीती मात्र वाटते!
लहानपणी मुलांकडून जेवण संपवून घ्यायला, अभ्यास करून घ्यायला इत्यादी अनेक कामांसाठी त्याचा वापर व्हायचा.
आता देखील तसेच बागुलबुवा निर्माण केले जातात, पण त्यांचा उद्देश सत्ता मिळवणे, लोकांचे आपल्याला हवे तसे विभाजन करणे, त्यांच्याकडून आपली काम करून घेणे असे असतात.
लहान मुलांना जोपर्यंत माहित नसत कि बागुलबुवा नाहीये आणि तो आपल्याला काही करणार नाही तोपर्यंत ते सगळं ऐकतात पण जेव्हा त्यांना कळू लागत कि हे मोठे लोक सरळ सरळ आपल्याला फसवत आहेत तेव्हा ती त्या गोष्टी ऐकणं बंद करू लागतात! परिस्थिती ताब्यात राहत नाही.
हेच काही राजकीय पक्षांना नको असते, जोपर्यंत देशातल्या लोकांना कळत नाही कि "अरे हा देशविरोधी नाही" "तो देशद्रोही नाही" तोपर्यंत लोकांना त्या लोकांचा बागुलबुवा दाखवायचा आणि आपल्या बाजूला करून घ्यायचं! काही चॅनेल वाले साथ द्यायला असतातच. एक नसलेला शत्रू सगळ्या देशाला निर्माण करून द्यायचा. आणि मग आम्हीच फक्त देशप्रेमी हे सिद्ध करायचे. दुसऱ्या पक्षाचे विचार दाबून टाकायचे! जेणेकरून बागुलबुवा "जिवंत" राहावा.
तसेच हे दोन बागुलबुवा! उमर खालिद आणि कन्हैया कुमार.
पण हा व्हिडीओ बघितल्यावर जाणवले कि अरे, हे पण आपल्यासारखेच आहेत. त्यांचे स्वतःचे काही विचार आहेत आणि त्या दृष्टीने ते समाज बघतात आणि बोलतात. यांच्यापासून माझ्या देशाला काय धोका आहे? आपल्याला यांची भीती का दाखवली जात आहे? माहिती नाही...
काही वाक्य खरंच आवडली कन्हैया कुमारची, एक स्पेशल वाक्य २७:३३ मिनिटांवर आहे.
ट्रोल्स वर तर सहीच बोलले आहेत दोघेपण!
जर आपण व्हिडीओ पाहिलात तर यांच्याबद्दल आपल्या आधीच्या आणि नंतरच्या विचारात काही फरक पडला का हे नमूद करू शकता.
तरुणांनी तरी, हा व्हिडीओ नक्की पहा!
विशेष सूचना: मी देशद्रोही वगैरे नाही(असे मला तरी वाटतंय) मी यांना व्यक्तिशः ओळखत नाही!
व्हिडीओची लिंक.
वाचने
15184
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
सविस्तर चघळून झालेल्या विभूतींनी नवीन कोणते दिवे लावले ?
In reply to सविस्तर चघळून झालेल्या विभूतींनी नवीन कोणते दिवे लावले ? by माहितगार
तुमच्या प्रतिसादाची टोटल लागली नाही!
खालील धाग्यातील मुलाखतीतूनही
हे आपल्यासारखे .... ?
In reply to हे आपल्यासारखे .... ? by गामा पैलवान
आपल्यासारखाच वागणारा,
असंच असतं भाऊ
In reply to असंच असतं भाऊ by आदिजोशी
हेच काही राजकीय पक्षांना नको
In reply to हेच काही राजकीय पक्षांना नको by तेजस आठवले
सगळेच राजकीय पक्ष हेच करत
In reply to सगळेच राजकीय पक्ष हेच करत by शब्दबम्बाळ
हो
In reply to हो by इरसाल
:D तसेही असू शकत म्हणा!
In reply to सगळेच राजकीय पक्ष हेच करत by शब्दबम्बाळ
शब्दबंबाळ यांच्या तर्कातील निसटत्या बाजू
In reply to शब्दबंबाळ यांच्या तर्कातील निसटत्या बाजू by माहितगार
खूपच तकलादू प्रतिवाद!
In reply to खूपच तकलादू प्रतिवाद! by शब्दबम्बाळ
आठवलेंनी वापरलेल्या असभ्य
In reply to आठवलेंनी वापरलेल्या असभ्य by माहितगार
आधीच प्रतिसाद बरा होता असे
In reply to आधीच प्रतिसाद बरा होता असे by शब्दबम्बाळ
शब्दबम्बाळ जी..!!
In reply to शब्दबम्बाळ जी..!! by विशुमित
असहमती साठी क्षमस्व
In reply to आधीच प्रतिसाद बरा होता असे by शब्दबम्बाळ
समजा एक माणूस पूर्ण टॅक्स
In reply to आधीच प्रतिसाद बरा होता असे by शब्दबम्बाळ
होयच मुळी
In reply to सगळेच राजकीय पक्ष हेच करत by शब्दबम्बाळ
माझ्या मते माझे वाक्य पातळी
कन्हैया आता,
कन्हैया आता,
कन्हैया आता,
In reply to कन्हैया आता, by भंकस बाबा
तुमचा प्रतिसाद चांगलाच मुरलाय
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
जग गेलं गाढवाच्या गाडीत
In reply to जग गेलं गाढवाच्या गाडीत by गामा पैलवान
गापै
In reply to गापै by जेम्स वांड
आजिबात चूक नाही.
In reply to आजिबात चूक नाही. by गामा पैलवान
साधारणतः मराठीत
शिभाप
ओसामा बिन लादेन च्या मुलाखती
शीर्षक वाचून बऱ्याच लोकांच्या
कन्हैया कुमार आणि त्याच्या
In reply to कन्हैया कुमार आणि त्याच्या by श्रीगुरुजी
जबरदस्त गुरुजी
In reply to कन्हैया कुमार आणि त्याच्या by श्रीगुरुजी
तुम्हाला बहुधा सगळ्या
In reply to तुम्हाला बहुधा सगळ्या by शब्दबम्बाळ
मी तिथे असण्याचा संबंध नाही.
but also to ensure that his thoughts and energy are channelised in a constructive manner." While giving monetary concession for furnishing the bond for release, the high court said Kanhaiya has to "furnish an undertaking to the effect thathe will not participate actively or passively in any activity which may be termed as anti-national." जामिनावर सोडणे म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे. त्याच्यावरील देशद्रोहाचा गुन्हाही कायम आहे.ज्या दिवशी न्यायालय हे सांगेल कि खरोखर याने देशद्रोह केला आहे मी तरी तेव्हाच मान्य करेन. तुम्हाला सगळीकडे त्याच्या नावाने आरडाओरड करण्याचे स्वातंत्र्य देखील आहेच.तीन वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवून सुद्धा अफझल गुरूला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्याच्या फाशीनिमित्त सुतक पाळणारे भारतात आहेत. तीन वेगवेगळ्या न्यायालयात गुन्हे सिद्ध होऊन सुद्धा मुंबईवर २६/११ झालेला हल्ला कसाबने केला नसून ते रा. स्व. संघाचे कारस्थान आहे असे छातीठोकपणे सांगणारे "विचारवंत" भारतात आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरविले तरी त्याला निर्दोष मानणारे तो न्यायालयाचा निर्णय मानणार नाहीत हे नक्की.आणि भाजपला इतकेच देशप्रेम आहे तर त्या "अफझल गुरूला दिलेली फाशी हि कायद्याची थट्टा आहे" वगैरे मानणाऱ्या PDP बरोबर "सत्तासोबत" करताना जराही लाज वाटत नाही?का देशप्रेमाचे सगळे नियम बाकीच्या लोकांसाठी, आम्ही करू तीच देशभक्ती असं काही आहे?त्यात लाज वगैरे वाटण्याचा प्रश्नच नाही. भाजप काश्मिरमधील दुसर्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेला आहे. पीडीपी बरोबर युती करणे हा एक प्रयोग आहे. त्या निमित्ताने भाजपला काश्मिरमधील राजकीय निर्णयांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली व ती संधी स्वीकारून भाजपने पीडीपीचे काही देशद्रोही निर्णय हाणून पाडले. उदाहरणार्थ पीडीपीने दगडफेक्या मसर्रत आलमला तुरूंगातून सोडले होते. परंतु भाजपच्या दबावामुळे त्याला पुन्हा एकदा तुरूंगात टाकावे लागले. पीडीपीच्या विरोधाला न जुमानता भाजपचे अॅफ्स्पा मागे न घेता सैन्याला बर्यापैकी मोकळा हात दिल्याने सैन्याने मोठ्या प्रमाणात अतिरेकी मारले व दगडफेक्यांवर पॅलेट गन्स चालविल्या. भाजपऐवजी पीडीपीबरोबर सत्तेत कॉंग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्स असती तर हे निर्णय झाले असते का याविषयी शंका आहे. किंबहुना भाजप सत्तेत सहभागी असल्याने पीडीपीच्या काही निर्णयांवर नियंत्रण आले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भाजपचा काश्मिरमधील निर्णयात थेट सहभाग आहे ही चांगली गोष्ट आहे. भाजपने काश्मिरला स्वायत्तता देणार्या ३५ अ कलमाविरूद्ध सुद्धा न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. जे कलम काँग्रेसने आणले व जे रद्द करण्याचा काँग्रेसने कधीही प्रयत्न केला नाही ते धाडस भाजप करू पाहत आहे. बाकी अफझल गुरूला दिलेली फाशी ही कायद्याची थट्टा आहे असे फक्त पीडीपीच नव्हे तर इतर काही जणही बोलतात. त्यात काँग्रेसवाले आहेत, सूझन अरूंधती रॉयसारख्या निधर्मांध आहेत व इतरही अनेक जण आहेत. तांत्रिकदृष्ट्या असे मत व्यक्त करणे हा दखलपात्र गुन्हा नाही. अशा प्रत्येकावर कारवाई करणे व्यावहारीकदृष्ट्या व कायदेशीरदृष्ट्या शक्य नसते. तसे करून काही फायदाही नसतो. न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयावर अनेक बाजूंनी अनेक जण बोलतात. याकूब मेमनच्या फाशीच्या वेळीही अनेक जण अनेक तोंडांनी बोलत होते. तथाकथित २०० विचारवंतांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्याला फाशी न देण्याची मागणी केली होती. त्यातल्या कोणावरही कायदेशीर कारवाई शक्य नव्हती.का देशप्रेमाचे सगळे नियम बाकीच्या लोकांसाठी, आम्ही करू तीच देशभक्ती असं काही आहे?असे कोणीच म्हणत नाही.In reply to मी तिथे असण्याचा संबंध नाही. by श्रीगुरुजी
कृतीचे समर्थन करणे गरजेचे आहे काय ?
In reply to कृतीचे समर्थन करणे गरजेचे आहे काय ? by माहितगार
ओह माय गोडसे!!!! :-)
In reply to ओह माय गोडसे!!!! :-) by तर्राट जोकर
तिखटाला तिखट इथे गोडाचा सध्या
In reply to ओह माय गोडसे!!!! :-) by तर्राट जोकर
त जो जी ..!!
प्रजाजनहो,
कन्हैयालाल माxxxx ahe.
In reply to कन्हैयालाल माxxxx ahe. by Ram ram
कन्हैयालाल माxxxx ahe.
ते
दाउदशी
In reply to दाउदशी by माईसाहेब कुरसूंदीकर
नानासाहेब,
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
कमळा
In reply to कमळा by माईसाहेब कुरसूंदीकर
काय सांगतोस! मग 'हे' आता