मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीय इतिहासातले विज्ञान - प्रश्न-उत्तरे (सर्व समावेशक धागा)

अत्रे · · काथ्याकूट
गेले काही दिवस मिपावर या विषयावर चर्चा होत आहे. विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा! पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत ! डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts ) पण वरच्या चर्चातुन फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही - याचे कारण प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना आपण नीट काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असली तर एक सिरियसनेस पाहिजे आणि कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. उगाच हवेत प्रश्न विचारून आणि हातवारे करून उत्तरे देण्यात काही हशील नाही. या विषयासंबंधी प्रश्न असणारे लोक या धाग्यावर मुद्देसूद प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना घ्यायची काळजी - १. एका प्रतिसादात एकच प्रश्न विचारावा. भरमसाठ प्रश्नाची जंत्री नको. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारावेत, सब्जेक्टिव्ह (ज्याची नेमकी उत्तरे देता येणार नाहीत) असे प्रश्न विचारू नयेत. Subjective information or writing is based on personal opinions, interpretations, points of view, emotions and judgment. Objective information or analysis is fact-based, measurable and observable. २. उत्तरे देताना संदर्भासहित लिहावे. कोणतेही ब्रॉड स्टेटमेंट करू नये, जेवढे माहितीये तेवढेच सांगावे. टीप - इतिहास या विषयात रस असणाऱ्यांना खालच्या वेबसाईट आवडतील. https://www.reddit.com/r/AskHistorians/ https://history.stackexchange.com/ https://skeptics.stackexchange.com/

वाचन 14612 प्रतिक्रिया 0