मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वदनि पेग घेता ....

चामुंडराय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सध्याच्या नवप्रथे प्रमाणे ..... © चामुंडराय, मिसळपाव. (कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये. अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये. विसू: Drink responsibly, Drive sober) . . वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥

वाचने 3615 वाचनखूण प्रतिक्रिया 11

एस Sun, 08/20/2017 - 04:10
खी खी खी खी! वारुणी उतरे आत। करी घशा जळजळ।। घेता अति - अतिकॉन्फिडन्से। मग होई मळमळ।। फिकर नका करू। जनहास्यक्षोभकारुण्याची।। वारुणी देई वृद्धा। किक तारुण्याची।। प्रतिभेस येई बहर। रिचविता नीट।। उचकी देत सुरादास। पडे येऊनि झीट।। जय जय वृद्ध संन्यासी समर्थ!

धर्मराजमुटके Sun, 08/20/2017 - 12:50
कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
हे न करता रचना वाचली आहे त्याबद्द्ल माफ करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चामुंडराय Tue, 08/22/2017 - 04:09
हे हे ... प्रतिसादाची सुरवात पहिल्या पेगला पूर्ण शुद्धीत असताना केली आहे आणि शेवट मात्र शेवटच्या पेगला वकार युनूस होउन लोळत असताना केला कि काय असे वाटते आहे :)

चामुंडराय Sat, 08/26/2017 - 22:21
एस - वाव्वा सुरेख, धन्यवाद एक्का सर आणखी कडवी वाढवा आणि एक जिल्बी येऊ देत. टवाळ कार्टा, उल्तानं, सौरा, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - सगळ्यांचे आभार्स पगला गजोधर - भविष्यात संधी मिळाली तर जरूर बसू श्री चामुंडराये पेग भरवियले । श्री पगलाराये सुत्ताले गटकवियले । श्री पक्षी-तीर्थ कट्टा करवियले I आमंत्रित सकल मिपा अभिजन I धर्मराजमुटके - हरकत नाही फक्त "रचना" आवडली का ते कळवा. ज्ञानोबाचे पैजार - बुढे बाबा का डायहार्ड फैन... म्हणजे आपण दोघे एकाच पंथातले कि - जय हो बुढे बाबा मिपाडेरा पंथ. जय जय पिवूबिअर स्मिर्नोफ्