फुंदके.... (खांदेशी भाषेत भेंडके) आणि मानमोडे
फुंदके....
साहित्य:
१. तुरीची डाळ ३ वाटी
२. हरभरा डाळ अर्धी वाटी
३. एक चमचा हळद
४. लाल तिखट चवीनुसार
५. एक चमचा धणे पावडर
६. लसूण- आलं पेस्ट दोन चमचे
७. उभे चिरलेला कांदे २
८. चवीपुरते मीठ
कृती :
तुर व हरभरा डाळ घेऊन ती 4-5 तास भिजत ठेवा. नंतर डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका. हे कोरडेच मिश्रण मिक्सर मधुन रवाळ वाटून घ्या. जास्त पेस्ट बनऊ नका.
मिश्रणात एक चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, दोन चमचे लसूण- आलं पेस्ट, चवीपुरते मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित कालवून घ्यावे.
मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. पातेल्यावर स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावुन ठेवावी. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करुन चाळणीत झाकुन वाफवण्यास ठेवावे. १० ते १२ मिनीटे चांगली वाफ येवू द्यावी. झाकण काढुन वाफलेले गोळे काढुन ठेवावेत.
मानमोडे
साहित्य:
१. कणीक २ वाटी
२. चिरलेला गुळ अर्धी वाटी
३. चवीपुरते मीठ
४. चिमुटभर सोडा
कृती:
चिरलेला गुळ, मीठ, सोडा गरम पाण्यात टाकून व्यवस्थित कालवून घ्यावे. त्यामधे कणीक टाकुन घट्ट गोळा मळुन घ्यावा. कणकेचे छोटे (पुरीएवढे) गोळे करुन पुरीसारखे जाडसर लाटावे व एका बाजुने तेल लावुन त्याची घडी करावी. तयार पुरीच्या घड्या चाळणीत झाकुन वाफवण्यास ठेवावे. १० ते १२ मिनीटे चांगली वाफ येवू द्यावी. झाकण काढुन वाफलेल्या पुर्या काढुन ठेवाव्यात.
वाढण्याची पद्धत:
ताटात फुंदके घेवुन चुरुन तेल टाकावे आणि मानमोड्या सोबत वाढावे. सोबत गरम गरम ताकाची किंवा आमसुलाची कढी... यापुढे विचार तुमचाच "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे...."
वाचने
4624
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
श्रीहरी श्रीहरी
नाव
वेगळच नाव आहे.
In reply to वेगळच नाव आहे. by समिधा
+१
फोटो
रेसिपी छान आहेत
मानमोडेला कानोले अस देखिल म्हनतात.
आम्ही