भाषासु मुख्या मधुरा
लेखनप्रकार
भाषासु मुख्या मधुरा
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती !
तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !!
शाळेत असतांनाच संस्कृतची गोडी लागली. तसे गुण मिळवण्यापुरते व्याकरण शिकलो, नाही असे नाही; पण ते तेवढेच. खरी गोडी निर्माण झाली ती सुभाषितांमुळे. शाळेत असतांना ३००-४०० सुभाषिते सहज पाठ होती. सुट्टीत कोकणात गेल्यावर भेंड्यांच्या खेळात तेथील मंडळींनी एक मखलाशी केली. संस्कृत श्लोक फक्त रामरक्षेतील, (सगळ्यांना पाठ असलेली, आमचे जादा पाठांतर बाद!) ते हि नो दिवसा गता:!
तर काय सांगत होतो, "मेघनादरिपु" धाग्यात म्हटले तसे आज एक निराळ्या प्रकारचे कोडे बघू. मराठीत एक clue देतो व आपण संस्कृत सुभाषित आठवते का बघावयाचे. उदा.
" दारिद्र्य व सिद्धी यांचा संबंध काय ?" सुभाषित आहे
हे दारिद्र्य.! नमस्तुभ्यं सिद्धोsहं त्वत्प्रसादत:.!
पश्याम्यहं जगत्सर्वम् न मां पश्यति कश्चन: !!
एखादा दरिद्री याचक दिसला तर आपण त्याच्याकडे बघून न दिसल्यासारखे करत पुढे जातो. याच्यावर भाष्य करत कवी म्हणतो. " हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. मी तर तुझ्यामुळे "अदृष्य" होंण्याची सिद्धी मिळवली आहे.( तिरस्करिणी विद्या) मी सर्व जग बघतो पण मी मात्र कोणाला दिसत नाही "
आज जरा सोपी सुरवात करू.
(१) या एका श्लोकात एका नामाच्या सर्व "विभक्ती" आल्या आहेत.
(२) कॉलेजातील (त्या काळची एक सुंदर मुलगी) बरेच वर्षांनी दिसल्यावर पुल म्हणाले "अगा उज्जैनी " भर्तृहरीचा कोणता श्लोक त्यांना आठवला बरे ?
(३) भर्तृहरीच्या मनात कोणती सात शल्ये टोचत असतात ?
भर्तृहरीचे श्लोक देण्याचे कारण शाळेत तो जरा जास्तच लोकप्रिय होता. व वामन पंडिताची मराठी शतकत्रयी सर्वांना माहीत होती. शिवाय वरील दोनही श्लोक तसे कालातित म्हणावयास हरकत नाही.
उत्तरे लगेच देण्यास हरकत नाही. माझी (नेहमीसारखीच) एक विनंती.आपणही तुम्हाला आठवणारी सुभाषिते अशीच विचारा ना ! बघू तरी किती लोकांना सुभाषितांची आवड आहे.
(आणि हो, मी जर खरच " कालबाह्य " झालो असेन ( तसे बरेच शक्य आहे !) तर आपण संस्कृत सोडून देऊ व जुन्या मराठी कवितांकडे वळू.)
शरद
वाचने
9999
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
मस्त धागा!
शशी दिवसधूसरो गलितयौवना
In reply to शशी दिवसधूसरो गलितयौवना by एस
बराबर
In reply to बराबर by शरद
अर्थ तसा सोपा आहे :
वा, मस्त धागा! वाचते आहे.
आणखी एक दोन
In reply to आणखी एक दोन by राही
दुरुस्ती
सकल संपूर्ण
In reply to सकल संपूर्ण by शरद
अर्थ
In reply to अर्थ by राही
वास्तविक हे दोन्ही शब्द
In reply to वास्तविक हे दोन्ही शब्द by सूड
एकच गट
In reply to एकच गट by राही
अधिक माहीतीसाठी धन्यवाद. जमलं
In reply to सकल संपूर्ण by शरद
धागा आवडला.
मस्त, वाचतोय.
धाग्याची कल्पना खूप आवडली.
In reply to धाग्याची कल्पना खूप आवडली. by सपे-पुणे-३०
अरे वा.. छान.
In reply to अरे वा.. छान. by रुपी
२०००० च हवं.
यस्य कस्य तरोर्मूलं येन
अंगठीचे बोट निनावी का?
वैद्या पेक्षा यम बरा
काही सुभाषिते मिळाली. तुमची
पुल म्हणाले "अगा उज्जैनी "
ते संबोधन "अगा उज्जैनी " आहे का "हाय गे उज्जैनी " आहे ?
श्लोकातली क्षुद्रत्रुटी
एक आवडते सुभाषित :अतिपरिचयात
In reply to एक आवडते सुभाषित :अतिपरिचयात by हेमंतकुमार
अतिपरिचयात अवज्ञा
कूपे प्रयागवासी
स्वदेशेषु धनम विद्या ।
भावार्थ: