मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.. .अक्षय अविरत निर्मळ

विटेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
या भल्या पहाटे थोडे मी तुझेच गाणे गावे अन गात्रा मधले कोडे अलगद सुटून जावे ती वीण मखमली मनाची अन श्वास समर्पित व्हावा त्या जगनियंत्यासाठी हा देहच निमित्त व्हावा विरघळून जावे अलगद मी पण माझे नुरावे त्या अक्षय सुखामध्ये मी अवचित भान हरावे ते नकोच लौकिक जगणे अन श्वासही संकोचावा तू माझा अन मी तुझाच हा भोगच अक्षय व्हावा मी भरून पावलो अवघा ही तुझीच मिठी अवखळ मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ - बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता

वाचने 1894 वाचनखूण प्रतिक्रिया 11

नीलमोहर गुरुवार, 08/03/2017 - 23:11
'मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ' सुंदर..

विटेकर Tue, 08/08/2017 - 15:29
सर्वांचे मनःपूर्वक आभार ! मी पहिल्यान्दा कविता लिहिण्याचा प्रयत्न केला , पूर्वी विडम्बने पुष्कळ केली .. पाहतो पुढे कसे जमते ते !