चंद्रासारखी गोल भाकरी आणि हरभर्याच्या पाल्याची भाजी
(ही जाळी फुलके करायलाही फार उपयोगी आहे. घाईत फुलके करताना मी एका कॉइलवर तवा आणि एकावर ही जाळी ठेऊन भराभर फुलके करायचे, कारण तवा उचलून बाजूला केला की पुन्हा गरम व्हायला वेळ लागतो.)
तवा काढून हॉटप्लेटवर ही जाळी ठेवा आणि त्यावर भाकरी भाजून घ्या.
गरम गरम भाकरीवर तूप लावा आणि खायला तयार!
एवढ्यातच भाकरीबरोबर मी हरभर्याच्या वाळलेल्या पाल्याची भाजी केली होती त्याचीही पाकृ देते.
हरभर्याचा पाला खुडणे आणि वाळवणे हे काम फार वेळखाऊ आहे. शिवाय ही वाळवलेली भाजी बाजारात दिसत नाही. शक्यतो ज्यांचे शेत आहे, त्यांच्याकडेच हरभरा होऊन गेला की नंतर तो पाला वाळवण्याचे काम होते. मग ते नातेवाइकांना, स्नेह्यांना ती वाळलेली भाजी वाटतात. आजकाल तेही फारजण करत नाहीत, त्यामुळे जे करतात त्यांच्याकडे या पाल्यासाठी भरपूर मागणी असते. भारतवारी केली की आत्या, मावशी असे कुणीतरी खास राखून ठेवलेली भाजी आम्हाला सुपुर्द करतात. खास करुन नगर, सोलापूर जिल्ह्यांतल्या नातेवाइकांकडे ही भाजी शक्यतो दरवर्षी होते. मग भारतातून परत येताना आठवणीने मटकीची डाळ आणि मुगाचे सांडगेही बरोबर आणायचे. इथे परतल्यावर बरोबर आणलेला खाऊ संपला की एखाद्या सुट्टीच्या दिवशी या पाल्याच्या भाजीचा बेत जमतो.
यासाठी आधी अर्धी-पाऊण वाटी मटकीची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायची. अर्धी वाटी सांडगे घेऊन बत्त्याने जरासे कुटायचे - फार बारीक करायचे नाहीत.
ही भाजी चिंच किंवा दही घालून करतात. आमच्याकडे खाणारी दोन डोकी होती तेव्हाही मी या दोन्ही पद्धतीने करायचे, कारण एकाचं दह्याशी वाकडं आणि एकाला दह्याचीच सवय. "नेहमी बायकांनीच का अॅडजस्ट करायचं?" वगैरे टाइपचे लेख फार उशिरा आले. माझी आजी बाकी सर्वांसाठी साखरेचं आणि फक्त स्वतःसाठी गुळाचं असं दोन पद्धतीचं पुरण दर सणाला करायची. त्यामुळे तिचा आदर्श ठेऊन मी स्वतःच्या आवडीचं बिनधास्त बनवते.
पहिल्या पद्धतीसाठी थोडीशी चिंच भिजत घालायची किंवा आयता चिंचेचा कोळ वापरायचा. दुसर्या पद्धतीसाठी दही घोटून घ्या किंवा ताक असेल तरी चालेल.
आवडत असल्यास लसूण ठेचून घ्या. थोडं बेसनपीठ घ्या आणि कढीसाठी करतो तसे थोडे थोडे पाणी घालून एकत्र करुन घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका.
मुठी, दोन मुठी भाजी घ्या. ही भाजी जरा विशिष्ट चवीची आणि वासाची असते, त्यामुळे खूप पालाही घेऊ नका. ही भाजी अशी दिसते.
In reply to आजीची आठवण आली राव... ती by पिलीयन रायडर
In reply to ग्रेट पाकृ व फोटू. भाकरीचे by रेवती
In reply to धन्यवाद :) by रुपी
In reply to अरे वा! काय खुलवून लिहिलेय! by एस
In reply to धन्यवाद. :) by रुपी
In reply to भाकरीचा चंद्र (नारायण सुर्वे) by नंदन
In reply to पाककृती सुंदर आणि प्रतिसाद फर by पिंगू
(ही जाळी फुलके करायलाही फार उपयोगी आहे. घाईत फुलके करताना मी एका कॉइलवर तवा आणि एकावर ही जाळी ठेऊन भराभर फुलके करायचे, कारण तवा उचलून बाजूला केला की पुन्हा गरम व्हायला वेळ लागतो.)
यासाठी "कल्ला" नामक तवा वापरून बघा. मला चुकून एकदा मध्यप्रदेशात मिळाला. कढईला ठरावीक अंतरावर होल पाडून जर ती गॅसवर उलटी ठेवली तर कशी दिसेल.. तसा हा तवा असतो. याच्या डिझाईनमुळे फुलक्याला एकाच वेळी उष्णता आणि धग दोन्ही लागते.In reply to (ही जाळी फुलके करायलाही फार by मोदक
In reply to (ही जाळी फुलके करायलाही फार by मोदक
In reply to भाकरी .....आणि प्रकार by II श्रीमंत पेशवे II
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या धन्यांची भाकरी करतातहुं, खरं की काय? त्या दुसऱ्या धाग्याबद्दल म्हणत असाल तर खरं आहे. ज्वारी / ज्वारीचे बी कामोत्तेजक ? बाजरीबद्दल संपूर्ण सहमत.
In reply to भाकरी .....आणि प्रकार by II श्रीमंत पेशवे II
In reply to किती मस्त लिहिलं आहे. मी अजून by त्रिवेणी
In reply to अमेझिंग हो अगदी. by अप्पा जोगळेकर
In reply to भारी !! by सस्नेह
In reply to हरभर्याच्या पाल्याची भाजी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हरभर्याच्या पाल्याची भाजी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद, by नीलमोहर
फक्त पीठ गरम पाण्याने मळणे लक्षात राहिले नव्हते
तांदळाच्या पीठात गरम पाणी टाकण्याऐवजी, पाण्याला एक उकळी आणून त्यात पिठ टाकावे व ते टाकता टाकताना कालथ्याचा डाव हातात धरून हँडलने ढवळत एकजीव करत राहावे. या प्रकारे केलेल्या भाकरीची चव* सर्वोत्तम होते.
* या पद्धतीने डेक्ट्रान्स (कार्बोहायड्रेट्सचे अणू विघटीत होताना तयार होणारे साखरेपेक्षा खूप मोठे अणू असलेले पॉलिसॅकॅराईड्स) तयार होतात, त्यांची काहीशी गोडसर चव असते. त्यामुळे ही खास चव येते. हे अनेक दशके ती जव जीभेवर रेंगाळल्यानंतर, शिक्षणाने सांगीतले. :)In reply to भाकरीच मस्त by एकविरा
जिच्या भाकरीला पापुद्रा सुटतो ती खरी सुगरण असे म्हणतात .
+१००In reply to हे झकास! by पैसा
In reply to हे झकास! by पैसा
In reply to हे काय ग तै, प्रत्येक भाकरीची by त्रिवेणी
In reply to हे काय ग तै, प्रत्येक भाकरीची by त्रिवेणी
मग चंद्रावर कधी जायच आम्ही.
चंद्रयानात भाकर्या बडवण्यासाठी स्पेशल व्यवस्था हवी यासाठी त्या बाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलने करायच्या आयडियाची कल्पना कशी आहे ? ;) :)In reply to मला भाकऱ्या मऊ-बिऊ अजिबात by एस
In reply to तांदळाची उकडीची, पापुद्रा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला भाकऱ्या मऊ-बिऊ अजिबात by एस
In reply to श्रीमंत आहेस by सप्तरंगी
In reply to हा हा =) by रुपी
आजीची आठवण आली राव... ती