नवकवीस्तोत्र
काव्यरस
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।
दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।
पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।
कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।
सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका ।
असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।
वाचने
15624
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
लै भ्भारी!
=))
=)))))
खी खी खी =))
;)
ज्याला पाहिजे फक्त कौतुक | मर्कट लीलेस लाईक |
शब्द रचतो जो एकावर एक | तो निंदेचाच धनी||
आठवा सावित्रीबाई फुले | ज्यांनी झेलले शेणाचे गोळे
आता जग वाहते फुले | पुतळ्यावरती जयांच्या ||
बोल बोबडे बालकाचे | त्यावर हसणे इतरांचे |
म्हणौनी तयांना बालकाचे | दगड मारणे का बरोबर ||
दगड मारण्या जी शिकवते | ती माता नव्हे वैरीण असते |
लांब रहाणेच बरेच असते | अशा दैत्यी पासौनी ||
जो हतोत्साही होउन जातो | तो खरा कवी कधीच नसतो|
जो या सर्वांना पुरुन उरतो | कवी ऐसा वंदावा ||
जो असतो शब्दांचा ईश्वर | त्यास जगाची नसते फिकीर |
शब्दांच्या दुनियेचा जो मिहीर | तोच कवी जाणावा ||
ऐसा कविश्र्वर वंदावा | यथोचीत आदर त्याला द्यावा |
देव्हार्यात त्याला बैसवावा |इश्वराच्या शेजारी ||
पैजारबुवा,
In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार
गुरुदेव . . . . . !
In reply to दंडवत ! by माम्लेदारचा पन्खा
तुम्हा दोघांनाही दंडवत! कविता आणि विडंबन दोन्ही रापचिक!
In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार
खरोखरच प्रतिभावान आहात पैजार बुवा. नमस्कार घ्या. पंखा साहेबांचे पण मूळ काव्य भारीच.
In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार
ह्या काव्यासाठी एक मस्तानी दिली तुम्हाला पैजारबुवा.
In reply to ह्या काव्यासाठी एक मस्तानी by सूड
कोणती? ;) :)
In reply to कोणती? ;) :) by हतोळकरांचा प्रसाद
कोणती हा प्रश्र्णच येत नाही कारण सूड बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल नाहीत आणि आम्हीही बाजीराव नाही आहोत हे आम्हा दोघांनाही पक्के माहित आहे.
प्रश्र्ण फक्त इतकाच असू शकतो की सुजाताची? कोंढाळकरची? का गुजरची? पण हा प्रश्र्ण विचारायचा मला अधिकार पोचत नाही. त्यामुळे मस्तानी हवी असेल तर सूड जिथे बोलवेल तिकडे मला जावे लागेल.
पैजारबुवा,
In reply to कोणती हा प्रश्र्णच येत नाही by ज्ञानोबाचे पैजार
अहो कोणती म्हणजे मँगो मस्तानी कि सीताफळ मस्तानी कि गुलकंद मस्तानी असे! :D :D .
In reply to कोणती हा प्रश्र्णच येत नाही by ज्ञानोबाचे पैजार
गुजरचीच सर्वोत्तम.
सुजाता/कोंढाळकरवाले मस्तानीच्या नावाखाली पातळ श्रीखंड देतात.
In reply to गुजरचीच सर्वोत्तम. by प्रचेतस
पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे कशी ते तुमच्याच शब्दात वर्णन करा ना गडे।
(ठर्राव सूचक कंज्यूस, अनुमोदन आत्मुस )
In reply to पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे by कंजूस
म्हणजे लस्सी आणि ताक ह्यात जसा फरक असतो तशी. मस्तानी पिता यायला हवी, चमच्याने खाता नव्हे.(त्यातले आईसक्रीम सोडून)
In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार
सुपर्ब कविता पैजारबुवा !!
क्या बात है !! दंडवत __/\__
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।या कडव्याकरिता शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्या!!!
In reply to आपण गाडिले कुठे झेंडे । by एस
एस मलाही हेच कडवे अप्रतिम वाटले. भारीच......!!!!!
हाहाह्हा... तुमचे आणी पैजारबुवांचेदेखील काव्ये फर्मास झाली आहेत..
हहपुवा..
=))
=)))))
दोन्ही काव्ये जबरा जमली आहेत.
मस्त जुगलबंदी !!
पैजारबुवा रॉक्स !
=)) =)) =))
मापंची कविता मुळात सुंदर । तीवरी ज्ञापैंचा कळस टोकदार ।
आमच्याकडून घ्याव्या वारंवार । टाळ्या आणि हशा ॥
=)))))
मूळ काव्य आणि त्यावर पैजारबुवांचा कळस, दोन्ही भारीच.
:))
:))
मापंची मुळ कविता आणि पैजार बुवांची कविता दोन्हीही आवडल्या.
दोन्ही कविता झकास :)
=))
पण पैजारबुवा आमच्याकडून नमस्कार घ्या .
गोविंदराव आणि नानोबांचे पैजार
फार भारी.
In reply to गोविंदराव आणि नानोबांचे पैजार by कंजूस
हे गोविंध्राव कोण म्हणे? ;)
पण मापं झबरदस्त लिव्हलाय आणि आमचं माऊलीचं तर काय इचारायचं. शिस्तीत टोला सीमापार.
In reply to हे गोविंध्राव कोण म्हणे? ;) by अभ्या..
मापं हो!
आता सेल्फिकरांवर बोधामृतवाणी हून जाऊ द्या।
=)) =))
पै माऊली आपले विडंबन काय पण टोला हाणलाय कोपरापासुन दंडवत घ्यावा माऊली ..
दोन्ही कविता आवडल्या गेल्या आहेत
दोन्ही रचना उत्तम! आवडेश!!
लै भ्भारी!