सुरती लोचो/चाट

Primary tabs

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
16 Jul 2017 - 2:44 pm

नमस्कार मंडळी,

मागे सुरती लोचो ची पाकृ टाकली आणि सर्वरचाच लोच्या झाला की राव!!! तेव्हापासून पाकृ टाकायला जरा बिचकतच होतो. पण आता सुरवात म्हणून हिच पाकृ परत टंकत आहे ती गोड मानून घ्यावी. लवकरच नविन पाकृहि पेश करीन.

सुरती लोचो.... गुजराथ चे फास्ट फूड, स्ट्रीट फुड. बेसन हा मुख्य घटक. तसं बघायला गेलं तर हा ढोकळ्याचाच भाउबंद पण ढोकळ्याचे जसे साचेबद्ध तुकडे असतात तसं ह्या लोच्याचं नसतं. त्यामूळे कधीमधी जर ढोकळा बिघडलाच तर बिनधास्त खालील पद्धतीने / नविन रुपात घरच्यांना खायला द्या.

मुळ पाकृत फक्त भीजवलेल्या डाळींच मिश्रण असतं पण ह्यात विविध भाज्या घालून लोचो अधीक हेल्दी, फ्लेवरफुल आणि कलरफुल करु शकतो. लहान मुलांसाठी / मोठ्यांसाठि एक उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ. कमीत कमी तेलाच्या वापरामूळे पथ्याच्या लोकांनाही अतीशय उपयुक्त.

चला तर मग...सज्ज व्हा....माझ्याबरोबर लोच्या घालायला!!!

locho 1

साहित्यः
१. चण्याची डा़ळ १ वाटी (४-५ तास भिजत घालावी)
२. ३/४ वाटी उडिद डाळ (४-५ तास वेगळी भिजत घालावी)
३. १/२ वाटी पोहे (१० मि. आधी भिजत घालावे जाडे असतील तर अन्यथा वाटणाआधी पातळ पोहे हलकेसे भीजवून घ्यावे )
४. आवडतील त्या भाज्या बारीक चिरुन १.५ वाटी (मी गाजर, बीट, वाफवलेले मक्याचे दाणे, रंगीत सीमला मिरच्या घेतल्या आहेत)
५. हिंग - पाव चमचा, हळद - पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, धणे / जीरे पूड - १.५ चमचा, हिरव्या मिरच्या - तिखटाप्रमाणे कमी/जास्त, आलं पेस्ट - १/२ चमचा
६. इनो फ्रुट सॉल्ट किंवा बेकींग सोडा १ टी.स्पु.
७. काळी मीरी पावडर / लाल तिखट - १/२ चमचा प्रत्येकी
८. तेल - १.५ पळी

सर्वीग साठि:
८. फेटलेलं गोड दही
९. (भेळेची) गोड / हिरवी चटणी, नायलॉन (झीरो नं) शेव, डाळींब दाणे, बारीक चीरलेली कोथींबीर

locho 6locho 7

कॄती :

१. चणाडाळ, उडिद डाळ, पोहे कमीत कमी पाणी घालून सरसरीत वाटुन घ्यावे.

locho 2

२. वाटलेल्या मिश्रणात चिरलेल्या भाज्या, हिंग, हळद, मीठ, धणे +जीरे पूड, आले, मिरच्या, तेल सगळे एकत्र करावे. एकिकडे वाफवायची तयारी करावी.

३. वाफेच्या भांड्यातिल पाणी उकळले कि ज्या भांड्यात उकडायचे आहे त्याला तेलाचा हात लावावा. लोचा वाफवायला ठेवणार त्या वेळेस त्याच्या मधे इनो फ्रुट सॉल्ट किंवा बेकींग सोडा घालावा. हलक्या हाताने एकत्र करावे. मिश्रण भांड्यात घालुन वरुन काळि मिरी पूड / तिखट भुरभुरावं व मिश्रण वाफवावे. १०-१५ मि. मिश्रणात सुरी खुपसून पहावी. क्लीन बाहेर आली तर गॅस बंद करावा.

locho 3locho 4

४. तयार लोच्याच्या वड्या पाडु नयेत. डावेने लपका तोडावा.

५. सर्वीग प्लेट मधे लोच्याचा तुकडा, त्यावर दही, दोन्ही चटण्या, शेव, डाळींबाचे दाणे आणि कोथींबीर घालुन द्यावे.

टीपा:

१. चाट प्रकार नको असेल तर दोन्ही चटण्या वगळ्याव्या. लोचो नुसताच दहि आणि शेव घालून द्यावा.

२. लोचो खरे तर दह्या विना खातात. पण मग खाताना घश्याला कदाचीत कोरडा लागेल त्या मुळे दही किंवा चटण्या घालाव्यात.

३. चणाडाळ ऐवजी मूग डाळ, मूग-मसुर डाळ, त्या बरोबर कॉर्न आणि बारीक चीरलेला पालक किंवा मेथी घालून कॉर्न -पालक / कॉर्न-मेथी लोचोहि करता येईल.

४. चणाडाळीने होणारा गॅस टाळण्यासाठि १/२ चमचा ओवा कुटुन मिश्रणात घालू शकता.

locho 5

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2017 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! मिपाच्या जान्यामान्या बल्लवाचार्यांचे खूप दिवसांनी, नेहमीप्रमाणेच डोळे आणि जीभेला आनंद देणार्‍या पाकृसह आगमन झाले ! सुस्वागतम् !!

पैलवान's picture

16 Jul 2017 - 3:55 pm | पैलवान

वेलकम ब्याक!!

जेम्स वांड's picture

16 Jul 2017 - 4:03 pm | जेम्स वांड

फोटो दिसत नाहीयेत सरजी, बाकी हा लोचा वाचून एकदम 'सरस' वाटला.

फोटू व कृती आवडली. जालावर याची चित्रफित पाहिली. त्यातही डावाने लोचो तोडून त्यावर बरेच प्रकार घातले होते.

नूतन सावंत's picture

16 Jul 2017 - 5:04 pm | नूतन सावंत

हा लोच झालास दिसतोय.

सविता००१'s picture

16 Jul 2017 - 6:00 pm | सविता००१

मस्तच. किती सुंदर दिसतोय.

पियुशा's picture

16 Jul 2017 - 7:45 pm | पियुशा

झक्कास !

स्नेहांकिता's picture

16 Jul 2017 - 8:50 pm | स्नेहांकिता

डोळ्यांनी जिभेचा लोचा केला !!
दीपक भाऊंचे रसदार पुनरागमन :)

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Jul 2017 - 8:52 pm | माम्लेदारचा पन्खा

कुवेतमध्ये संन्यासी लोकांची सोय चांगली दिसते आहे . . . . त्याशिवाय तुम्ही इतका प्रदीर्घ संन्यास घेणार नाही . . . .

लोच्याला आणि तुम्हाला येलकम !

निशाचर's picture

16 Jul 2017 - 9:45 pm | निशाचर

पाकृ आवडली. फक्त फोटोंचा लोच्या झालाय.

पद्मावति's picture

16 Jul 2017 - 10:27 pm | पद्मावति

वाह!

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2017 - 11:20 pm | स्वाती दिनेश

पाकृ छान दिसतेय, करून बघेन.
फटू दिसत नाहीयेत.
स्वाती

मस्त आहे पाकृ. नक्की करुन बघणार.

सूड's picture

17 Jul 2017 - 6:45 pm | सूड

भारीच!!

इशा१२३'s picture

18 Jul 2017 - 12:45 pm | इशा१२३

छान दिसतेय पाकृ!

दिपक.कुवेत's picture

18 Jul 2017 - 1:25 pm | दिपक.कुवेत

असाच लोभ असु द्या.....

एस's picture

18 Jul 2017 - 2:39 pm | एस

चटकदार!

मितान's picture

19 Jul 2017 - 12:28 pm | मितान

मस्त ! करून बघेन !

चांदणे संदीप's picture

19 Jul 2017 - 1:06 pm | चांदणे संदीप

पण आम्हाला काय दिसेना!

Sandy

अक्षया's picture

25 Jul 2017 - 5:57 pm | अक्षया

छान पाकॄ....... ...