उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?
लेखनविषय:
काव्यरस
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . .
त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . .
त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .
उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . .
आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . .
पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .
उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . .
संपादकाला काही येईना . . येईना . . .
गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .
उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . .
तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .
आतातरी जरा शुध्दीत बोल . . . . शुध्दीत बोल . . . .
उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .
वाचने
25893
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
मस्त जमलय : )))
अप्रतिम .. फार सुन्दर ..वाचनिय ..
जबरदस्त!
खिक्क..
जबराट.
काव्य वगैरे माझा प्रांत नाही म्हणून मिपावरील कविता वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही. या कवितेच्या शीर्षकावरून कविता नक्की कोणावर असणार याचा अंदाज आला आणि थोडी घाबरतच कविता बघितली. आणि ती प्रचंड आवडली :)
मस्त कविता! उद्धू खरोखरच बुद्दू आहे यात शंका नाही. तो महाराष्ट्राचा पप्पू/केजरीवाल आहे.
ह्ही ही.
क्लास्स!;)
कविता आवडली.
परंतु भाजपा केंद्रातच ठिक आहे. भाजपाचे राजकारण गुजरात धार्जिणे आहे त्यामुळे महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपा झाले तर अवघड आहे.
त्यामुळे नाईलाजाने का होईना पण उ.ठा शिवाय पर्याय नाही.
उद्धूचे वागणे खरंच संभ्रमात टाकते.
पण तरीही हि कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली तर कहर माजेल. :P
=)) =))
हा हा हा. मस्तंच!
उधू ची भाषा भारी .. भारी
शास्ताखान ,वाघनखे ,तलवारी .. तलवारी
मुंबईत तुंबल्या गटारी. . गटारी
विकासाच्या नावाने बोंबाबोंब .. बोंबाबोंब
उद्धू .. तू माझ्याशी गोड बोल . गोड बोल
In reply to ही ही ही by सुज्ञ
हे पण मस्त !!! भारी ..
In reply to ही ही ही by सुज्ञ
मस्त जमलंय!
https://youtu.be/U5npFH8v8a4
In reply to https://youtu.be/U5npFH8v8a4 by मार्मिक गोडसे
आयला हा प्रकार नव्हता माहित. आता उगम कळाला वरील कवितेचा. कविता भारिच.
In reply to https://youtu.be/U5npFH8v8a4 by मार्मिक गोडसे
जबरदस्त! पाहून आणि एकछश खूप मजा आली.
:-))))
भन्न्नाट जमलंय !
इस्को बोल्ते, करंट ट्रेण्डको कॅच करना !
आता मिपावर असल्या विडंबन गाण्याची स्पर्धा घ्यावी ! कंपूंनी त्याचे व्हिडो करुन पाठवावेत ! मिपाकट्टा मंग जबर्दस्त रंगेल :-)
इ-सकाळवर या बातमीत प्रतिक्रियेमध्ये टाकलीये ही कविता कुणीतरी.
तिथे माप तुमचा मिपा सकट उल्लेख सुध्दा झालाय.
सांभाळून
In reply to तिथे माप तुमचा मिपा सकट by प्रमोद देर्देकर
हा आपल्या कुवतीपलिकडचा प्रश्न आहे . . त्याला मी काय करणार ?
मिपा . . . सांभाळून !
In reply to कोणी काय करावे by माम्लेदारचा पन्खा
या कवितेत मला तरी काही इश्यू दिसत नाही. ही कविता एक साधी वात्रटिका आहे. यापेक्षा जास्त विनोदी विडंबने रोज माध्यमातू प्रसिद्ध होतात ज्यात पुढार्यांची मनसोक्त खिल्ली उडविलेली असते (उदा. 'सकाळ'मधील ढिंग टांग). या कवितेत बदनामीकारक, अश्लील, बीभत्स असे काहीही नाही.
तुम्ही अमित शहा किंवा मोदींवर एक कविता करा ना . माझ्या नावाने प्रसिद्ध करतो . मस्त हसण्यासारखी .
एकच नंबर! मूळ आरजे मलिष्काचे गाणेही भारी आहे. खरेच बृहन्मुंबई महापालिकेला लाज वाटली पाहिजे. दर वर्षी तीच नालेसफाईची नाटके, तेच रस्त्यांवरचे खड्डे आणि तोच गेंड्याच्या कातडीहून निर्ढावलेपणा.
जबरदस्त आवडली
पैजारबुवा,
काव्य म्हणून मस्तच रे मापं.
विषय अन संबोधने म्हणशील तर थर्डक्लास मनोवृत्ती.
In reply to काव्य म्हणून मस्तच रे मापं. by अभ्या..
आखिर कहना क्या चाहते हो भई ??
शिवसेनावाले आता त्या आरजे मलिष्काच्या मागे हात धुवून लागले आहेत असे दिसतेय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिच्या घरी म्हणे डेंग्यूच्या अळ्या सापडल्या! आत्ताच बऱ्या सापडल्या?
दुसय्रांची व्यंगचित्रे काढतात त्यांना स्वत:ची व्यंगचित्रे का आवडत नाहीत?
चक्क भडकतात.
विरोधी मतही खपत नाही. जहांगिरच्या फोटो प्रदर्शनात पाहिलं आहे .
जबरा.......!
-दिलीप बिरुटे
मस्त जमलय : )))