अनोळखी...(गझल)

स्वानंद मारुलकर जे न देखे रवी...
देऊ नको मला तू नावे अनोळखी का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी? मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे मागून सावली का धावे अनोळखी? गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी वैशाख तापलेला वणवा उरी जळे ओठात गीत ओले यावे अनोळखी - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com
वर्गीकरण
लेखनविषय:

5 टिप्पण्या 1,804 दृश्ये

Comments

सत्यजित... नवीन

>>>गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी>>>सुंदर शेर!