बाप हा ताप नसतो, पोरा
लेखनविषय:
बाप हा ताप नसतो, पोरा
आईचा पदर पकडून चाललास
खूप खूप मोठा झालास
विसरलास लेका बापाला
आता उगा करतोयस तोरा II
घास जरी आईने दिला
तरी घासत तो बापच होता
त्या तुमच्या पोटासाठी
इतरांसमोर वाकत होता
त्याच्या वाकण्याने तुला
कणा दिला
मान मरातब मिळाला
अन तू लेका सर्व विसरला II
दुध नाही पाजले
पोटात नाही वाढवले
पण ते दिवस मोजणारा तोच होता
तुझ्या आगमनाने आनंदाश्रू गाळणाराहि तोच होता
तुला रडताना बघून
तळमळणारा पण तोच होता II
आरं त्यो जर रडला असता
तर तू कसा रं वाढला असता
तुमहाला वाढताना बघून
तो मात्र जगासमोर कायम वाकत होता
तो ताप नव्हता
तो तुझा बाप होता , फक्त तुझा बाप होता II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
वाचने
2103
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा वा वा दादा ... डोळ्यात पाणी आणलस बघ ...
^ ^
~ ~
• •
००
००
००
००
घास जरी आईने दिला तरी घासत तो बापच होताया ओळींना स्टँडिंग ओव्हेशन!! टाळ्या!! ;) Sandy
In reply to कितीही आवर घालावा म्हटलं तरी.... by चांदणे संदीप
घास जरी आईने दिला तरी
( भांडी) घासत तो बापच असतो ..
असं म्हणायचय बहुतेक सियाप्पा दादाला :D
ए, जब्बरदस्तच.
एकच लंबर लिहिलंय.
सियाप्प्पा पण भारी
In reply to ए, जब्बरदस्तच. by अभ्या..
"टोटल सियाप्पा" नावाचा मागे एक पिक्चर आला होता, तो ह्यांच्यावरच होता कि काय?
सिद्धेश्वर विलास पाटणकर Cहे C काये?
अहो सौरा ताई , मला कॉपीराईट ची साइन हवी होती . वर्तुळातला C कशाला घ्या , मुक्तच राहिलेलं बरं, म्हणून आपलं फक्त C सिलेक्ट केलं ... काय वेगळं बिगलं वाटलं कि काय आपल्याला ? नक्की अभिप्रेत काय होत तुम्हाला ? सौरा ताई .... चातुर्मास चालू आहे बाई , अस वेगळं मनात आणायचं नाही ...
हे जेनी ताय , आधी रडत का होतीस बाय ?
तुमहाला वाढताना बघून
तो मात्र जगासमोर कायम वाकत होता
या ओळींना जबरदस्त अर्थ आहे सँडी भाय ... घ्याल तो अर्थ ... स्टँडिंग ओव्हेशन द्यायचं तर ह्या आणि अशा अर्थपूर्ण ओळींना ... काय म्हणता
In reply to तुमहाला वाढताना बघून by सिद्धेश्वर विल…
घेतला बर्का मी मला घ्यायचा तो 'अर्थ'
फक्त इथे जोरात बोललो तर होईल 'अनर्थ'....!!
च्यामारी.... जमलं की!!! :D :D
Sandy
बप हा ताप नसतो पण 'बाप हा शेवटी बापच असतो व आई ती आईच असते'.
वा वा वा दादा ... डोळ्यात