साक्षात्कार
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले
तेव्हा दिसलं
इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी
रिमझिमतं आभाळ तर
कधीचं ओथंबून वाकलंय
वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं
तेव्हा दिसलं
मी सहज फेकलेल्या विटेवर
माझं श्रेय-प्रेय तर
कधीचं उभं ठाकलंय
अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत
तेव्हा दिसलं
माझ्या रोमरोमात तर
पहाटेचं तेज
कधीचं फाकलंय
वाचने
2818
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सुंदर!!
वाह!
गुड. तुमच्या कवितांच्या फॉर्ममधले वेगळेपण छान असते.
In reply to गुड. तुमच्या कवितांच्या by एस
सहमत. सुंदर प्रतिमा !
धन्यवाद!
माझ्या रोमरोमात तर
पहाटेचं तेज
कधीचं फाकलंय
हे विशेष आवडलं____/\___
सुरेख!
"रिमझिमतं आभाळ तर, कधीचं ओथंबून वाकलंय". भिडलं मनाला अगदी! चौकटीबाहेरचा विचार करून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचीच काय ती खोटी... सारं जग तुमचंच आहे.
आपल्या प्रतिसादा॑बद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
शेवटचा बंध अगदीच क्लासिक!
अवांतर—वातावरण म्हणा किंवा काय,पहिला नि तिसरा बंध वाचताना,पावसाळ्यातली एखादी ओलसर,कुंद पहाट-ऊषा,आठवुन गेली!
...ही एक नवी सुरुवात ठरावी अशी इच्छा आहे.
In reply to सत्यजित, धन्यवाद! शेवटचा ब॑ध... by अनन्त्_यात्री
मेळविता एकेक पणती,उजळता प्रकाश-पंक्ती
सूर्य व्हाव्या लक्ष ज्योती,अखंडीत!
सुंदर!!