सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?मी सुरुवातीपासूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेत आलेलो आहे. बाकीच्यांचं माहीत नाही. २.
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?नाही. मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे. आ.न., -गा.पै.
In reply to काही निरीक्षणे by गामा पैलवान
मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका घेऊनही नेमस्त व तटस्थ आहे.अशी भुमिका घेऊनही 'नेमस्त व तटस्थ' आहे असे सांगावे लागते, यातच बरेच काही आले, नाही का ? (अशी टोकदार भुमिका घेणारे, त्याच वेळेस तटस्थ असल्याचा दावा कसा काय करु शकतात ? नेमस्तपणाचा आणि कोण्या एका बाजूंचा संबंध आहे असे गृहित नव्हते.)
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या by रामपुरी
In reply to मग तुमच्या मते ती घोषणा by अद्द्या
जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ?
+११११In reply to मग तुमच्या मते ती घोषणा by अद्द्या
We’ve all seen something on the Internet we disagree with or have received unwanted communication. Such behavior does not necessarily constitute online abuse
If you continue receiving unwanted, targeted and continuous replies on Twitter, and feel it constitutes online abuse, consider reporting the behavior to Twitter.https://support.twitter.com/articles/१५७९४ अभिजित, रावल लोकांचे ट्विट लोकांना abusive वाटले म्हणून त्यांनी ट्विटर वर रिपोर्ट केले. ट्विटर ने अभिजितला बॅन केले आणि रावल ला ट्विट डिलिट करायला लावली. या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही. अवांतर: ट्विटर अमेरिकन कम्पनी असल्याने त्यांना भारतीय कायदे पालन करणे अनिवार्य असते का? समजा भारतीय कोर्टाने सांगितले कि अमुक एक अकाउंट बॅन करा, तर ट्विटर ला तो निर्णय बंधनकारक असेल का?
In reply to बरोबर-चूक काय ते माहित नाही by अत्रे
In reply to बरोबर-चूक काय ते माहित नाही by अत्रे
या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणे योग्य होणार नाही कारण प्रायव्हेट कम्पनी ठरवू शकते आपल्या सायटीवर काय ठेवायचं - काय नाही.हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी हा सोईस्कर युक्तिवाद झाला. मग त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणू नयेत. कोणी विचारले की फक्त 'मेरी मर्जी' असं सांगावं सरळ.
लोकांनी मुक्तपणे आली मतं मांडावी आणि भावना व्यक्त कराव्यात. पण धमक्या देणं, गैरवर्तन करणं, कुणाचाही आवाज दाबवण्याचा आणि छळाचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येतील', असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.हे ट्विटरने परेश रावल यांचे अकाउंट बंद करताना सांगितले आहे. आता मला 'अभिनेता' परेश रावल बद्दल आदर असला तरी 'खासदार' परेश रावल आणि त्यांची मते याबद्दल काहीही आपुलकी नाही (अजूनतरी). पण ज्या पद्धतीने त्यांचे अकाउंट बंद झाले आहे ते नक्कीच तेवढे सहज पटत नाही, खासकरुन सोशल मिडियावर (ट्विटरसहित) यापेक्षा नमुनेदार अशी गैरवर्तने आणि कमेंटस आढळत असताना.
In reply to या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती by सच्चिदानंद
In reply to ट्विटर फक्त निमित्त by पैसा
सगळ्या ऑनलाइन social सायटींवर हेच चालू असते. परेश रावळ वर हल्ला करताना स्वरा भास्करने woman card सुद्धा वापरले, जे कोणत्याही विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणारे नाही.अर्थात.! मी याबद्दल लिहिणार होतो पण इथे वेगळे वळण लागेल म्हणून ते टाळले. पण तो ही एक ढोंगीपणाचा महत्त्वाचा मुद्दा आहेच.
दुर्लक्ष अनुल्लेखाने अशा लोकांना मारा म्हटले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे ट्विटर काय मिपावर पण दिसतेच. सोसेल तेवढाच वावर सोशल मीडियावर ठेवावा हे आपल्या डोक्याच्या शांततेसाठी आवश्यक असते.हे आहेच. पण कोणत्याही प्रशासनाने एकावर कारवाई करावी आणि दुसर्याला क्लीन चीट हे पण जरा न पटणारे आहे. या माध्यमांना जर मुक्त अभिव्यक्तीची साधने म्हणावे तर त्यावरच प्रश्न उपस्थित होतो मग.
आणि परेश रावळने जे काही म्हटले आहे त्यात मला तरी काहीही चुकीचे वाटलेले नाही. अरूंधती रॉय सारख्या खाल्या ताटात **णार्या लोकांना नुसते असे जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी माझ्या ओळखीतल्या प्रत्येकाला पेढे वाटून तो दिवस साजरा करेन. भारतात जन्माला आलेल्या
(भारतीय मुद्दामून म्हणत नाही) ज्या लोकांविषयी मला अगदी कमालीचा दुस्वास आहे त्यात अरूंधती रॉय या हडळीचा* नंबर बराच वरचा आहे.
*: उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुळमुळीत लिहिणे, बोलणे मला जमत नाही. माझ्यासाठी तरी जे काही आहे ते रोखठोक आणि कसलाही आडपडदा न ठेवता. तरीही मिपावर हडळ हा शब्द योग्य नाही असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर संपादित करावा. In reply to परेश रावळ काहीही चुकीचे बोलले नाहीत by गॅरी ट्रुमन
जीपला बांधले नाही तर गितमोमध्ये पाठवून शंभर वेळा वॉटरबोर्डिंग केले तरअशे फतवे आचरणात आणण्याची जबाबदारी कोणाची? उद्या कोणी असे खरोखर केले आणि त्यांना पोलिसांनी जेल मध्ये टाकल्यास फतवे जाहीर करणाऱ्यावर त्याची जबाबदारी येते का?
In reply to पण तेच परेश रावल अरुंधती by दाह
कारण त्यानं हे विधान केवळ अफवेचा आधार घेऊन केलं होतंतुम्हाला असे म्हणायचे आहे का, की ती बातमी अफवा नसली असती तर असे फतवे जाहीर करणे योग्य ठरले असते? :)
In reply to कारण त्यानं हे विधान केवळ by अत्रे
In reply to तुम्ही दोन वेळा by सच्चिदानंद
In reply to माझ्या मते फतवा म्हणजे by अत्रे
इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
ही सध्याच्या सोशल मिडीयाची चिंताजनक बाजू आहे. याला अनेक कारणे आहेत. माझ्या मते मुख्य कारण म्हणजे विशिष्ट लोकांचे सोयीस्कर मतप्रदर्शन आणि सोयीस्कर विरोध लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे. सोशल मिडीया हा मतप्रदर्शनाचा सोयीचा प्लॅटफॉर्म असला तरी मोठमोठे मंत्री, नेते आणि विचारवंतही एका कमेंटच्या अंतरावर आहेत (माझ्या गल्लीतल्या एखाद्या मित्रासारखे) आणि "त्यांच्या विचारांना मी लॉजिकल उत्तर देत असेन तर मला पुन्हा उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे" ही सोय यापूर्वी नव्हती.
दुसरी गोष्ट म्हणजे, विचारातील / भूमीकेतील समानता. आपण सर्वजण सदासर्वकाळ बरोबर असू शकत नाही. सोशल मिडीयावर तर मुळीच नाही कारण "आपले पूर्वानुभव आणि एखाद्या गोष्टीबद्दल असलेला दृष्टीकोन" या गोष्टींचा आपल्या भूमीका ठरण्यात मोठा वाटा असतो. अशा वेळी आपले अनुभव त्यावर व्यक्त होणार्या प्रत्येकाला समजतीलच असे नाही. दुसर्या बाजूने विचार केला तर माझ्या विचारांच्या विरोधी विचारांचा कोणी अस्तित्वात असेल आणि मला "आज आत्ता ताबडतोब" निर्णय हवा असेल किंवा त्याला खोटे पाडायचेच असेल तर मोघम आरोप करून त्याला खोटे पाडणे जास्ती सोपे असते. मग लाँग रन मध्ये तो माणूस बरोबर ठरला तरी नवीन आरोप शोधले जातात आणि पूर्वीचे बरोबर असलेले मुद्दे सोयीस्कररीत्या विसरून नवीन नवीन खोटेपणा केला जातो.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
आयडेंटिटी क्रायसीस म्हणा किंवा आणखी एखादी गोष्ट असेल.. पण मी एखाद्याला निरूत्तर केले म्हणजे माझा विजय किंवा मला कोणी निरूत्तर केले म्हणजे माझा पराजय ही भावना टोकाच्या भूमीका घ्यायला भाग पाडते कारण मी सज्जनपणे नवीन विचार स्वीकारून त्यावर विचार करण्याची तयारी दाखवली तरी अनोळखी प्रश्नकर्ता ती भूमीका समजून घेईलच असे नाही. मग तो मार्ग संपूर्णपणे बंद करून आहे त्या परिस्थितीत टोकाच्या भूमीकांमध्ये राहणे जास्ती सोपे आहे.
एखाद्याचा तटस्थपणा किंवा नेमस्तपणा जर एकाच विचारधारेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विशिष्ट विचारधारेची भलामण करत असेल तर त्याला सध्याच्या घडीला उघडपणे विरोध होतो आहे. अशावेळी मुद्द्यांच्या आधारे केलेला विरोध म्हणजे "असहिष्णुता" किंवा "हमको चाहिये आजादी" अशा अजेंड्याखाली ढकलला जात असेल तर कोणताही सामान्य माणूस "असहिष्णुता तर असहिष्णुता पण आधी या सोयीस्कर विचारवंतांचे बुरखे टरकावूया" असा विचार करेल हे अत्यंत साहजिक आहे. (मी स्वत: याच विचाराने मिपावर राजकारणी चर्चांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली)
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. मिपावरच्या अशा किमान ३ वेगवेगळ्या लोकांच्या (डुआयडींच्या नव्हे!) मी लिंका देऊ शकतो. मग अशावेळी समोर दिसत असलेला पक्षपातीपणा उघड पाडण्यासाठी मैदानात उतरणे भाग पडते आणि एकदा मैदानात उतरलात की तुम्हाला विरोधकांकडून लेबले लावली जाणारच. तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण.
..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारचयातले वागळे प्रकरण काय आहे? लिंक मिळेल का एखादी?
In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
In reply to मोदक जी.. by विशुमित
In reply to दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये by विशुमित
In reply to मी प्रतिसादामध्ये पुरेसे by मोदक
In reply to मोदक जी...!! by विशुमित
In reply to ओके.. हा लेखनप्रपंच by मोदक
In reply to <<<हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी by विशुमित
दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते.In reply to मोदक जी.. by विशुमित
In reply to १) त्याच मुद्द्यातील बाकी भाग by मोदक
In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात.या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.
तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते.इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का? म्हणजे मी जरी त्या मुलीच्या कुठल्याही विचारांशी सहमत नसेन तरी तिला प्रतिवाद म्हणून कोणी 'पुरेसे पैसे मिळाले नाही म्हणून तक्रार करणारी वेश्या' म्हणत असेल तर ते नक्की कुठल्या पातळीवर येते? तिने अशी कोणती पातळी सोडली होती म्हणून ही प्रतिक्रिया समर्थनीय ठरते ? जर ती भाजपासमर्थक असती (आणि तथाकथित सेक्स रॅकेट्ची बातमी काँग्रेसची असती) तर अभिजीतच्या या कमेंटवरच्या प्रतिक्रिया अशाच असत्या का ? यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.
..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.हे मान्यच. आणि हा एक प्रश्न आहेच.
In reply to मोदक, प्रतिसाद आवडला.. by सच्चिदानंद
या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.
सर्वच जण असे करत असतील असे तुमचे मत असेल तर "सुरूवात कोण करत आहे आणि प्रत्युत्तर कोण देत आहे" हे बघावे लागेल. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्याला संपूर्ण दोष देता येणार नाही.
इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का?
अभिजीतच्या कमेंटची भलामण नाही. सर्वसाधारण विधान आहे.
यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.
समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)In reply to या संदर्भात इतकेच म्हणेन की by मोदक
. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्याला संपूर्ण दोष देता येणार नाही.मग याच न्यायाने नक्षलवादाचे समर्थन करणारे करतात आणि ते अक्षरशः करतात. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जण त्याने आधी चिमटा काढला हेच म्हणत बसतो आणि मग कानठळ्या, बुक्क्या, लाथाळ्या सुरु होतात. तुमच्या बेवड्याच्या प्रतिक्रियेस प्रमाण मानून अशा वेळेस दोन्ही बाजू लाथाळ्यांचे समर्थन करु लागेल तर ते कसे बरोबर ठरेल ?
समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)ही बेवड्याची तुलना तेवढी पटली नाही (थोड अॅपल/ऑरेन्ज झाले). तरीही बेवडा समोर आला तर त्याच्या पातळीवर उतरणे काही मान्य नाही. तटस्थता स्वयंभू असावी हे या फॉरमॅटमध्येही शक्य आहे नक्कीच आणि इथे सुहास म्हात्रेंसारखे नक्कीच चांगले उदाहरण आहेत त्याचे (माझ्यामते).
In reply to काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा. by सच्चिदानंद
In reply to मी डॉक्टरसाहेबांइतका अनुभव, by मोदक
In reply to अर्थात, मग कोणाचा आदर्श by सच्चिदानंद
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?होय. शांतपणे चर्चा, वाद, संवाद यांच्या माध्यमातून मुद्दे समजावून देण्याला प्रतिष्ठा उरलेली नाही. सुमार बुद्धीमतेच्या, सवंग(trite) मते असणार्या पण कुठल्याही विचारसरणीचा अतिरेकी पाईक असणार्यांना लाईमलाईट मिळू लागलेला आहे. बाकी 'अभिजीत' जे जे करत आलेला आहे त्याला ट्विटर अकाऊंट बंद करणे ही शिक्षा म्हणजे करूणा झाली.
उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुळमुळीत लिहिणे, बोलणे मला जमत नाही. माझ्यासाठी तरी जे काही आहे ते रोखठोक आणि कसलाही आडपडदा न ठेवता. तरीही मिपावर हडळ हा शब्द योग्य नाही असे संपादकांचे मत असल्यास तो शब्द जरूर संपादित करावा.या विधानाद्वारे हडळींचा अपमान केल्याबद्दल समस्त हडळ-खवीस-पिशाच्च-मुंजा-बायंगी-संघातर्फे तुमचा तीव्र निषेध ! आ.न., -गा.पै.
In reply to गॅरी ट्रुमन यांचा तीव्र निषेध by गामा पैलवान
In reply to अरुंधती यांच्या वैचारीक मांडणीचा विरोध वैचारीक पातळीवरुन by मारवा
In reply to विक्रम गोखले, तेंडूलकर आणि by पुंबा
In reply to रावल यांनी याही पेक्षा भयावह by arunjoshi123
अशी भुमिका घेऊनही 'नेमस्त व तटस्थ' आहे असे सांगावे लागते, यातच बरेच काही आले, नाही का ? (अशी टोकदार भुमिका घेणारे, त्याच वेळेस तटस्थ असल्याचा दावा कसा काय करु शकतात ?तुमचा प्रश्न समर्पक आहे. उदाहरण देऊन सांगतो. आज सौदी अरेबियाकडून येमेनमधल्या निरपराध मुस्लिमांची कत्तल चालू आहे. भारतातल्या मुस्लिम नेत्यांनी याविरुद्ध तोंडातून ब्र तरी काढलेला ऐकलाय का कोणी? मी हिंदुत्ववादी असूनदेखील या निरपराध्यांच्या संहाराचा निषेध करतो. यावरून हिंदूहितैषी भूमिका सर्वसमावेशक आहे हेच सिद्ध होत नाही काय? उत्तर प्रदेशांतल्या निवडणुकींत मुस्लिमांनी याच कारणासाठी भरभरून मोदींना मतं दिली. मुस्लिम नेत्यांच्या मागे गेलं तर इथल्या मुस्लिमांची गत येमेनप्रमाणेच होणार हे सगळ्यांना कळतं. भारतातल्या मुस्लिमांचे नेते म्हणवणारे लोकं सौदीचा पैसा खायला चटावलेत. म्हणूनंच टोकदार हिंदूहितैषी भूमिकेतंच बिगर हिंदूंचंही सौख्य सामावलेलं आहे. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
हे शेला रशिदचे ट्विट किंवा योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचे ट्विट किंवा भाजपाचे लोक सरसकट सेक्स रॅकेट चालवतात वगैरे ट्विट ही नक्कीच आक्षेपार्ह आहेत. त्यासाठी तिचा अकाउंट रद्द केला गेला नाही. मात्र परेश रावळ याचा अकाउंट तशाच ट्विटसाठी रद्द केला गेला अशी महाराष्ट्र टाईम्सची बातमी आहे.
अभिजीत भट्टाचार्यची ट्विट्स नक्कीच आक्षेपार्ह आहेत. तशा ट्विट्ससाठी अकाउंट रद्द केला जाऊ शकतो. मला प्रश्न एवढाच आहे की शेला रशीदची ट्विट्स आक्षेपार्ह आहेत तिचे खाते रद्द करा अशी मागणी कोणी ट्विटर कडे केली होती का नाही? त्यावर जर ट्विटरने कारवाई केली नसेल तर भाजपामधील कोणी तिच्यावर चारित्र्यहनन केले म्हणून कोर्टात केस दाखल करू शकतो का नाही? असल्या तोंडाळ लोकांच्या नादी लागून आपली लेव्हल सोडण्यापेक्षा आपल्या हातात असलेल्या कायदेशीर मार्गांनी त्यांना जेरीस आणता येते. ज्यांना खरेच काही करायचे असेल त्यांनी पुढे जाऊन ट्विटर पक्षपाती आहे म्हणून त्यावर सामुदायिक बहिष्कार घालून ट्विटरलाच धडा शिकवता येईल. काही दिवसांपूर्वी आमीरखानच्या बायकोच्या वक्तव्यांमुळे वैतागून तो ब्रँड अँबेसेडर असलेल्या स्नॅपडीलकडे लोकांनी पाठ फिरवली होती आणि स्नॅपडीलला नुकसान सोसावे लागले होते याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. In reply to जेएनयूला अजून किती प्रसिद्धी by पिशी अबोली
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
In reply to शंभर टक्के सहमत. by गामा पैलवान
सुझान अरुंधती रॉय या बाईकडे वैचारिक भूमिका आहे असा काहीसा आभास उत्पन्न केला जात आहे.अरूंधती रॉयच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करणे असे म्हणणे आणि हातात चाकू ठेऊन आपल्या गळ्यावरून तो चाकू कधीनाकधी फिरवायची इच्छा बाळगून असलेल्या कोणाबरोबर सौजन्याने वागावे आणि त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असे म्हणण्यासारखे झाले. १३ डिसेंबर २००१ च्या त्या महाभयानक प्रकारातून आपला देश कसा काय वाचला याचेच आश्चर्य वाटते. खरे तर खासदार , मंत्री, कदाचित पंतप्रधानांनाही ओलीस ठेवणे असले काहीतरी घडायचे त्या दिवशी. आणि त्या प्रकारात सहभागी असल्याबद्दल कायद्याच्या प्रक्रीयेतून फासावर गेलेल्या कोणाविषयीही सहानुभूती ठेवणे म्हणजे आपल्या गळ्यावरून चाकू फिरवायची इच्छा असल्यासारखेच झाले. अरूंधती रॉय सारख्यांविषयी कोणतीही सहानुभूती मला तरी नाही. इतरांचे माहित नाही.
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमनसाहेब, by अत्रे
कोणत्याही हिंसेला प्रोत्साहन देत नाही आहे - तो पर्यंत विचारांचा मुकाबला विचाराने करता येतो.काश्मीरात गांधीजी आणि गौतम बुद्ध यांना लाजवेल अशा पध्दतीने अगदी अहिंसात्मक आंदोलनच चालू आहे ना? अफजल गुरू दिल्लीत संसदभवनावर पदयात्रा करत गेला होता की नाही? काय बोलता राव?
In reply to काय बोलता राव? by गॅरी ट्रुमन
In reply to तुम्हाला मी हायपोथेटिकल by अत्रे
In reply to तुम्हाला मी हायपोथेटिकल by अत्रे
तुम्हाला मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे. "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या.हायपोथेटिकल प्रश्न जरूर विचारावेत पण त्या हायपोथेटिकल परिस्थितीचा वास्तविकतेशी दुरूनदुरूनपर्यंत संबंध लागत नाही अशी परिस्थिती नको.उद्या कोणी हायपोथेटिकल प्रश्न विचारला---"समजा माणूस गुहेतून बाहेर पडलाच नसता तर" आणि यातील "समजा" हा शब्द कृपया लक्षात घ्या तर त्याला काय कप्पाळ उत्तर देणार? तद्वतच काश्मीरात जे काही चालू आहे त्याच्याशी "समजा" अहिंसक पध्दतीने असते तर काय अशाप्रकारचे प्रश्न विचारले तर त्याला काय डोंबल उत्तर देणार?
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमनसाहेब, by अत्रे
(अश्याच मागण्या करून आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले नाही का?)याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. हे एव्हढेच कारण पुरेसे नव्हते याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. किंबहुना या गोष्टीची स्वातंत्र्य मिळवून द्यायची क्षमता २०% पण नव्हती असे वाटते. अर्थात त्याचे इतरत्र काही अत्यंत महत्वाचे चांगले परिणाम झालेत, त्यामुळे ही गोष्ट कुचकामी नव्हती याबद्दलही माझ्या मनात मुळीच शंका नाही. तरी पण. असो. अवांतर नको. चालू द्या.
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
In reply to जेएनयूला एकूणच अवास्तव महत्व by पिशी अबोली
In reply to जेएनयूला अजून किती प्रसिद्धी by पिशी अबोली
In reply to लाख वेळा सहमत पिशी ताई by उपेक्षित
In reply to वा वा. तुम्हाला हळूहळू by आनन्दा
ही बाई भारताच्या वाईटावर तपोन बसलेली आहेका बरे ?
In reply to ही बाई भारताच्या वाईटावर तपोन by मराठी_माणूस
-गा.पै.In reply to भारताच्या वाईटावर टपून बसणे by गामा पैलवान
In reply to फोटो वरुन काही समजले नाही. by मराठी_माणूस
In reply to खुलासा by गामा पैलवान
In reply to बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध by सतिश गावडे
In reply to नेमका by आनंदयात्री
In reply to बरेच by मारवा
In reply to ते लहान मुलांसाठी नव्हतं by सतिश गावडे
In reply to बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध by सतिश गावडे
पण मग त्यांच्याविरोधात सरकारकडून कायदेशीर कारवाई का होत नाही?या असल्या लोकांच्या बाबतीत मोदी पाहिजे तितका कणखरपणा दाखवू शकलेले नाहीत हे नक्कीच. कदाचित अजूनही विचारवंतांची मिडिया, शिक्षणसंस्था इत्यादी ठिकाणची पकड मोडून काढायच्या स्थितीत ते नाहीत. आणि असल्या विचारवंतांना कायमचे देशोधडीस लावायची ताकद मोदींना मिळावी यासाठी मी माझा खारीचा वाटा २०१९ मध्ये उचलणार आहेच.
In reply to कणखरपणा कमी पडत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to श्री मोदींना माहित आहे कि by सुबोध खरे
In reply to याच, अगदी याच कारणांमुळे by सचिन७३८
२०१९ साली ‘मोदी या कारणांमुळे यावेत’ अशा काहीशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे.मोदींचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स प्रभावी आहेतच तितके. यांचा विरोध मोदी सरकारला आहे की भारत देशालाच आहे असा प्रश्न पडावा यांची अशी वर्तणूक आहे. मोदी सरकारला विरोध असला तर तसा विरोध करायचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकाला आहे. पण मोदी सरकारला विरोध म्हणून संसदेवर हल्ला करण्यासारख्या महाभयानक प्रकारात हात असलेल्याचे समर्थन करायचे आणि असे समर्थन करणार्यांची तळी उचलून धरायचे कारण काय? यातूनच होत असे आहे की अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे मोठेमोठे उच्चभ्रू विचारवंत सोडले तर देशावर प्रेम असलेल्या सामान्य भारतीयापुढे असे चित्र उभे राहात आहे की हे विरोधक मोदींना विरोध करायच्या नावावर देशालाच विरोध करत आहेत. यातूनच देशाच्या हिताची केवळ मोदींना पडलेली आहे आणि सगळ्या विरोधकांना देशद्रोह्यांचा कळवळा आहे असे चित्र आपसुकच उभे राहात आहे. मोदी हे बघून मनातल्या मनात किती समाधानी असतील!! म्हणूनच मी असल्या लोकांना मोदींचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स म्हणत आहे. जसे मणीशंकर अय्यर, केजरीवाल असे मोठेमोठे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स आहेत तसेच फेसबुक, मिसळपाव इत्यादी ठिकाणी छोटेछोटे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्सही आहेतच. या चर्चेतही ते आलेच आहेत. एकूणच काय की गेल्या तीन वर्षात मोदी सरकारच्या कामगिरीवर तारतम्याने भाष्य करणे आणि सरकारच्या कमतरता काय आहेत हे व्यवस्थित पध्दतीने लोकांसमोर मांडण्यात विरोधी पक्ष अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण अपयशी ठरले आहेत. जर मोदी २०१९ मध्ये परत निवडून आले तर ते सरकारची कामगिरी दृष्ट लागण्यासारखी वगैरे आहे म्हणून नक्कीच नाही तर या असल्या विरोधी पक्षांमुळे आणि या ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्समुळे निवडून येतील.
In reply to अरुंधती यांची सडेतोड कोट्स by मारवा
We will do what we have to doचा अर्थ काय अपेक्षित आहे?
In reply to अरुंधती यांचा हा लेख बघावा by मारवा
In reply to बापरे by पैसा
In reply to बापरे by पैसा
In reply to अहो ताई by मारवा
In reply to वाचलं म्हणूनच लिहिलंय by पैसा
In reply to अरुंधती यांचा हा लेख बघावा by मारवा
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमन साहेब by सुबोध खरे
कुठे यांच्या नादाला लागता?असल्या लोकांच्या नादी लागण्यात शहाणपणा नाही हे नेहमीच कळते पण वळत नाही :( अरूंधती रॉय सारखे उपटसुंभ काहीतरी बरळणार आणि त्याची भलामण आपल्या मिपावर होताना दिसली तर खरच ते सहन होण्यापलीकडे जाते. तरीही असल्या लोकांपासून दूर राहावे हे कळलेले 'वळवायचा' प्रयत्न मात्र नक्कीच आहे.
In reply to यायला इथे लिंक चिकटवण्याची by अद्द्या
In reply to काही मुलभुत मुद्दे by मारवा
In reply to काही मुलभुत मुद्दे by मारवा
मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका
आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात वेगळेपण नेमके कशात आहे ?
वरचा इतका तत्ववादी प्रतिसाद लिहिणारा "बलुचिस्तान, बांगलादेश, तिबेट" आणि "काश्मीर" यांच्यामधला फरक काय असे विचरतो (पक्षी : त्यांच्यात फरक नाही असे म्हणतो), तेव्हा खरे तर, कितीही फरक दिसत असले तरीही (कोणत्याही गुप्त कारणांनी का होईना पण) आपल्या भूमीकेला सोडायचे नाही, हे त्याने नक्की केलेले असते. :)
तरीही, काही गोष्टींकडे लक्ष वेधतो...
१.अ. काश्मीर मधला असंतोष खालील सिद्ध झालेल्या गोष्टींनी "बनवलेली" परिस्थिती आहे :
* प्रत्यक्ष पाकिस्तानी हस्तक्षेपाने (पक्षी : सीमेपार अतिरेकी पाठवून) होणार्या कारवाया.
* काश्मीरमध्ये असलेल्या व पाकिस्तानी पैश्याने खरेदी केलेल्या फुटीरतावादी हस्तकांकरवी केल्या जाण्यार्या कारवाया.
* केवळ काश्मीरबरोबरचीच नव्हे तर अफगाणिस्तान व काही प्रमाणात इराण बरोबरचीही सरहद्द पेटत ठेवून, त्यामुळे निर्माण होणार्या अस्थिर परिस्थितीचा बागुलबुवा कायम ठेवून पाश्चिमात्य (विशेषतः अमेरिका) आणि खाडी देशांसाठी महत्वाचे (स्ट्रॅटेजिक) स्थान कायम ठेवून राजकारणी आणि आर्थिक फायदा लुटत राहण्याची पाकिस्तान लष्कराची रणनीति.
१.आ. काश्मीरमधल्या बहुसंख्य जनतेने तिचे मत खालील गोष्टींनी वारंवार स्पष्टपणे व्यक्त केले आहे :
(अ) अनेक स्थानिक, राज्य व राष्ट्रीय निवडणूकांत, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, मोठ्या संखेने होणारे मतदान.
(आ) अनेकदा झालेल्या पोलिस व सैन्य भरतीच्या वेळेस, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, हजारोंच्या संखेने असलेली काश्मीरी युवकांची हजेरी.
अर्थातच, काश्मीरमधिल (आणि बर्याच अंशी अफगाणिस्तानातली) परिस्थिती शेजारी राष्ट्राने (पक्षी : पाकिस्तानने) चालवलेल्या अतिरेकी कारवायांवर आधारीत आहे, त्यात स्थानिक बहुसंख्य लोकांच्या आशा-आकांक्षांचा फारसा सहभाग नाही; किंबहुना,
या पाकिस्तान-निर्मित दुष्टचक्रात सर्वसामान्य जनता भरडून काढली जात आहे.
२. तिबेट चीनने सरळ सरळ आक्रमण करून ताब्यात घेतलेला भूभाग आहे, हे चीनही अमान्य करणार नाही. या प्रकरणात, दलाई लामांना आश्रय देणे यापलिकडे, भारताचा कोणताही सहभाग नाही.
३. बांगलादेश प्रकरणाबद्दल "अधिक काही विचारण्याची आणि सांगायची" गरज फक्त झोपेचे सोंग घेणार्यासाठी आवश्यक ठरेल. तरीही... बांगलादेश युद्धात शरण आलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या बंदुकांना स्वतःजवळ बाळगण्याची, न भूतो (आणि बहुदा) न भविष्यती, परवानगी कोणत्या कारणासाठी दिली गेली, याच एका अतीप्रसिद्ध गोष्टीची कारणपरंपरा माहित करून घेतल्यास, बांगलादेश प्रकरणाच्या फरकाबद्दलचे सगळे गैरसमज मूळातून दूर होतील.
तेव्हा...
या वरच्या गोष्टींचा विचार करून काश्मीर समस्येकडे परत प्रामाणिक दृष्टीक्षेप टाकायची इच्छा असलेल्या माणसाचे अधिक अभ्यासाने स्वतःहूनच मतपरिवर्तन होईल असे वाटते... अन्यथा इतरांनी अजून जास्त प्रयत्न करणे म्हणजे, झोपलेल्या माणसाला उठविण्याचा प्रयत्न होईल, व असे करण्याचे फलित काय असते हे तुमच्यासारख्या बुद्धिमान व विचारी माणसाला सांगण्याची गरज नाहीच. :)
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे by पैसा
In reply to मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे by पैसा
रावल यांनी याही पेक्षा भयावह मत तिच्याबद्दल द्यावे या लायकिची ती आहे.माझ्या मते वरची विधानेच मिपाला अडचणीत आणू शकतील.
In reply to मिपावर हिंसक क्रांतीला by अत्रे
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यासंबंधी डोळे उघडणारी, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हात्रे सर by मारवा
In reply to म्हात्रे सर by मारवा
In reply to हैद्राबाद संस्थानात, मूठभर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हात्रेजी अजुन स्पेसीफीक तुलना देतो. by मारवा
In reply to अजून एक वडाची साल पिंपळाला... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काय योगायोग पहा ! by डॉ सुहास म्हात्रे
कालपासून भारतसरकारच्या इडीसकट इतर विभागांनी काश्मीरी फुटीरतावाद्यांच्या दिल्ली, श्रीनगर, इत्यादी जागांवर धाडी घालणे सुरु केलेअशा बातम्या आहेत की या धाडी घातलेल्यांमध्ये पाकिस्तानला फळांची निर्यात करणार्या काही व्यापार्यांचाही समावेश आहे.या फळांच्या व्यापार्यांमार्फत काश्मीरातील दगडफेकीला आणि दहशतवाद्यांना फंडिंग करायचा मार्ग ई.डी च्या लक्षात आला.समजा २५ लाखांची फळे निर्यात केली तर बिल ५० लाखांचे करायचे. वरच्या २५ लाखांपैकी थोडा वाटा त्या फळ व्यापार्याचा आणि उरलेला वाटा काश्मीरातील 'काही' लोकांना पोहोचता करणे अशा स्वरूपाची ही योजना आहे. माझ्या चेपु मित्रमंडळींपैकी एका निवृत्त कर्नलने याविषयी चेपुवर लिहिले त्यावरून असे काही असते हे कळले. असल्या काही फळ व्यापार्यांवरही छापे घालण्यात आले आहेत. एक समजत नाही. पाकड्यांना अगदी सगळ्या गोष्टींच्या निर्यातीवर आणि कुठच्याही प्रकारच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदीच का टाकत नाहीत?काही फरक पडत नाही पाकड्यांना फळं खायला मिळाली नाहीत तरी.अर्थातच असे काही केले तर एकजात सगळ्या विचारवंतांना पाकड्यांचा पुळका येईलच. आणि अशा विचारवंतांना अगदी पूर्ण रस्त्यावर आणून देशोधडीला लावण्याचा कणखरपणा मोदी सरकार अजूनही दाखवू शकलेले नाही ही एक मोदी सरकारविषयी तक्रार आहेच.
नेहमी फुटीरतावाद्यांच्या गळ्यात गळा घालून "स्टेक होल्डर्स, स्टेक होल्डर्स" असा गळा काढणार्या या नेत्यांची आता मात्र दातखीळ बसली आहेछे हो अशी कशी दातखिळ बसेल? अजून काही दिवसात फळ व्यापार्यांवर कसा अन्याय होत आहे याविषयीच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या तरी आश्चर्य वाटायला नको.
In reply to काही फळ व्यापार्यांवर छापे by गॅरी ट्रुमन
In reply to सुबोधजी by मारवा
पण मुळ मानव निर्मीत सरकार नावाच्या यंत्रणेने चिरडलेला माणुस व त्याचे समर्थन जर अन्याय विरोध या व इतक्याच पहील्या पायरीपर्यंत काय गैर आहे.दुर्दैवाने काश्मिरी हिंदूंच्या बाबतीत ही पहिली पायरी सुद्धा गाठण्यासाठी तथाकथित डावे विचारवंत तयार नसतात. अशांचे लाड का म्हणून खपवून घ्यायचे? पहिल्यांदा काश्मिरी हिंदूंचं पुनर्वसन होऊ द्या, नंतर काय ती मुक्ताफळे उधळा. आ.न., -गा.पै.
In reply to डाव्यांना कडाडून विरोधाचे कारण by गॅरी ट्रुमन
In reply to डाव्यांना कडाडून विरोधाचे कारण by गॅरी ट्रुमन
In reply to अभिजित इज बॅक by धर्मराजमुटके
ट्विटर अमेरिकेपासून