जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
वाचने
3901
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
गझलेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणारांसाठी...
गझलेचा प्रत्येक शेर,हा एक स्वतंत्र कविताच असतो! कोणताही शेर वेगळा करुन वाचला तरीही त्यातून पूर्ण अर्थ लागतो!
सर्व शेरांत साधारणतः एकच विषय हाताळला जातो,ती 'मुसलसल' गझल,तर प्रत्येक शेरांत वेगळ्या विषयावर भाष्य केले असेल,ती 'गैरमुसलसल' गझल!
त्यामुळे गझल वाचत/ऐकत असताना (विशेषतः गैरमुसलसल),रसिकाने पहिल्या शेरांतून स्वतःच्या मनाची सोडवणूक करुन पुढील शेराच्या विचारात नव्याने गुंतणे अपेक्षित असते!
In reply to गझलेबद्दल काही... by सत्यजित...
जिच्या सर्व शेरांत एकच विषय हाताळलेला असतो अशा गझलला 'नज्म' म्हणतात ना? की नज्म म्हणजेच मुसलसल गझल, किंवा इतर प्रकार?
In reply to जिच्या सर्व शेरांत एकच विषय by शिवोऽहम्
गोंधळ काहीसा दूर झाला हे वाचून (https://www.quora.com/Poetry-What-is-the-difference-among-Ghazal-Nazm-Sher-Doha-Rekhti-Marsiya-and-Rubai).
फैझ़च्या अनेक प्रसिद्ध कविता या नज्म़ आहेत हे रेख्तावर पाहिले (https://rekhta.org/poets/faiz-ahmad-faiz/nazms)
काय एक से एक पोतडीतून बाहेर काढताय राव !
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?जबर.
In reply to काय एक से एक पोतडीतून बाहेर by वेल्लाभट
आपली दाद सतत लेखनास प्रोत्साहीत करते!खूप धन्यवाद अपूर्वजी!
मला स्वतःलाही हाच शेर अधिक भावला होता!
जबरा!!
वा!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
कविता आवडली
पण ह्या ओळी अजिबात कळल्या नाहीत -
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
In reply to कविता आवडली by आषाढ_दर्द_गाणे
राळ एक सुगंधी द्रव्य आहे,जे जाळले असता सुगंध दरवळतो!
गझलेबद्दल काही...