मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजमा

मिथिला · · पाककृती
सहित्य - राजमा १ वाटी (कॅन असतील तर १५ oz चे २ ) २ लहान कांदे - बारिक चिरलेले १ टोमॅटो- बारिक चिरलेला १ चमचा धने-जीरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला १ चमचा तिखट १ चमचा आल-लसूण पेस्ट पाउण वाटी आंबट दही चवीनुसार मीठ २ मोठे चमचे तेल बारीक कापलेली कोथिंबीर फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, १) राजमा अधल्या दिवशी भिजत घालावा (कॅन असतील तर ही स्टेप टाळावी हे सांगण्याची गरज नाही) २) राजमा दु प्पट पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा ३) कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, जिरे घालावे ४) बारिक चिरलेला कांदा फोडणीत टाकावा, गुलाबी होईस्तोवर परतावा, आल-लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, हळद घालून खमंग परतावे. नंतर त्यात दही घालावे व नीट मीक्स करावे. शेवटी टोमॅटो घालून परत खमंग परतावे. ५) तेल बाजूला सुटले की राजमा घालावा. गरजेनुसार पाणी व मीठ घालावे. १० मिनीटे मंद गॅसवर उकळू द्यावे. कापलेली कोथिंबीर टाकून सजवावे. टीप - राजमा आंबट चांगला लागतो. दही आंबट नसल्यास १ चमचा आमचूर पावडर टाकावी.

वाचने 5843 वाचनखूण प्रतिक्रिया 14

जागु Mon, 02/23/2009 - 11:51
मिथिला छान आहे तुझी रेसिपी. मी राजम्यामधे दही ऐवजी कांदा शिजला की त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो टाकुन स्मॅश करते. आता दही घालुन करेन.

केळ्या Mon, 02/23/2009 - 17:11
तसेही राजमा रात्रभर भिजून होईपर्यंत उपास सुटलेला असेल. छानच.मी दही वगळून घोटलेली साय घालतो.मस्त लागते.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

अवलिया Mon, 02/23/2009 - 18:40
परमेश्वराची लीला अगाध आहे .... तोच मारक तोच तारक तोच रक्षक तोच भक्षक हर हर महादेव !!!!! --अवलिया

प्राजु Mon, 02/23/2009 - 20:53
मला खूप आवडतो राजमा. रेसिपी पण छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शाल्मली Tue, 02/24/2009 - 01:02
फोटो आणि पाकृ. दोन्ही मस्त आहे. अजून येऊ दे.. --शाल्मली.

गोगलगाय Tue, 02/24/2009 - 05:51
फोटो अगदी छान. अस वाटतं की चमचा घालावा अन वाढून घ्याव..