कंडोम
लेखनविषय:
कामगार दिवस
आज एक मे कामगार "दिवस"
--------------------------------------------
कंडोम
भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि मालक
आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे मालक
*
भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक
नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात तुम्ही मालक
*
मजुराचे रक्त खूप स्वस्त दरात मिळते या देशात मालक
५-५०रु थोबाडावर फेकून ८तास शोषायला चटावलात तुम्ही मालक
*
देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक
निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले आम्हा मालक
*
भांडवल शाहित जाती व्यवस्था चांगलीच राबवलित मालक
कंत्राटी कामगार नांवाची नवीनं जात निर्माण केलीत मालक
.
कंत्राटी कामगार, पण कच्ची बच्चि आहेत आम्हाला मालक
वापरा,काम झाले फेकून द्या"अस करायला कंडोम नाही
कामगार आहोत आम्ही मालक
_____________________________________
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन
वाचने
3891
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
शेवटची ओळ काळजाला भिडली. ;)
In reply to शेवटची ओळ काळजाला भिडली. by सतिश गावडे
अविनाश - बेधुंद वगैरे? मी तर ती वाचून काळजीत पडलो ;)
अकुंचित जिल्बी! ;)
In reply to अकुंचित जिल्बी! by अत्रुप्त आत्मा
अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन पावलेली जिलबी का?
In reply to अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन by सतिश गावडे
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! :-/
कं.डो.म. म्हणजे कंपनीच्या डोक्यावर बसलेले मजूर.
In reply to कंडोम म्हणजे ... by चित्रगुप्त
कल्याण डोंबिवली महानगरपालिका.. असंही होतं म्हणतात ते! :D
कविता छान आहे. आवडली.
छान लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
छान.
खरच आवडली, भावना सुद्धा पोहोचल्या त्या मागच्या.
बाकी स्वतः बिनकामाच्या जिलब्या पाडणारे इतरांच्या लिखाणाला जिलब्या संबोधतात हे पाहून जल्ला मेला गम्मतच वाटली.
In reply to बाकी स्वतः बिनकामाच्या by उपेक्षित
असं नका म्हणू हो. तुम्ही त्या जिलब्यांची टेस्ट डेव्हलप करा. मग तुम्हाला त्यातली गोडी कळेल.
जरी थांबलो दाबून नीट, आतल्या आत पडतंय पीठ किती वास्तवदर्शी ओळ आहे ही. ;)
In reply to असं नका म्हणू हो. तुम्ही त्या by सतिश गावडे
अस म्हन्तासा ? वके ह्ये बी ट्राय करू
शेवटची ओळ काळजाला भिडली.