श्री शिवस्तुती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अति शितल मृदू शांत
चंद्र्मा तो ललाटी
जटी जया उगम पावे
जन्हवी पुण्यदाती
लेपुन तनू भस्मा
स्वात्मनंदा विराजी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी
अणू रणू व्यापणारी
लोचने तीन दिव्य
करी धरी ड्मरू
आणि त्रिशुळ भव्य
अति धवल दिव्य कांति
तेजसी ती प्रकाशी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी
अर्धांगी आदी शक्ती
वाम अंगास ज्याच्या
जगत वंद्य पुत्र
गणपती स्कंदराजा
देखणा करी प्रपंचा
शिव विरक्त योगी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी
अविरत जपी रामा
भक्त श्रेष्ठा दयाळा
शरण तव येता
उद्ध्ररसी कृपाळा
सहज तरूनी जाइ
प्राथ्रितो जो शिवाला
नमन तव करीतो
शंकरा विश्वनाथा
नृत्यनिपुण नटराजा
मोहसी तू जगाला
तांडव परि करीता
विश्व जाते लयाला
करून हरण प्राणा
निजधामासी नेसी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी
वाचने
3088
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुंदर.
In reply to सुंदर. by कलंत्री
असेच
+१
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
+ २
आवडले...
In reply to आवडले... by नीलकांत
बऽऽऽम बोले!
In reply to बऽऽऽम बोले! by धमाल मुलगा
रावण रचित शिव तांडव स्तोत्र.
In reply to रावण रचित शिव तांडव स्तोत्र. by शेखर
धन्यवाद!
सुरेख रचना.
धन्यवाद.