आमची फटाफट झणझणीत मिसळ
कृती:
आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली.
आता कट करायचं ठरवलं :)
कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं. मी मिसळ नुसतीच तिखटजाळ करण्यापेक्षा ती सणसणीत होईल पण घशात येणार नाही अशी करते. हे परतल्यावर त्यात चिमूट्भर साखर घालून पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि यातही थोडी आमचूर पावडर घातली. तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं ;) हवी तेवढीच दाट होते याने तर्री.
मग नेहमीप्रमाणे बाउल मध्ये आधी उसळ, मग तर्री, मग फरसाण घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सजवली. एक लिंबाची फोड आणि गव्हाचा पाव याबरोबर फन्ना पाडण्यास दिली घरच्यांना.
झाली सुद्धा मिसळ. हाकानाका :)


वाचने
24286
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
क्लास्स!!
फरसाण पीठ करून लावण्याची
स वि ता ता ई
In reply to स वि ता ता ई by अभ्या..
अभ्या
एक महिन्या पासून झारखंड मध्ये
हम्म्म्म..! इसमे नया तो है
अश्या भूक खवळणार्या पाकृवर
जबरीच आहे. फरसाण वापरायची
भारीये! झटपट मिसळ असल्याने
In reply to भारीये! झटपट मिसळ असल्याने by रेवती
रेवाक्का
वा.. मस्त फोटो..
In reply to वा.. मस्त फोटो.. by रुपी
कट
मस्त मिसळ
एक नंबर!
म्म्मम्म्मम्म्मम्ममस्त!!!
सवे
वा!
हे एक भारीये की फरसाणची
झक्कास!!!!!
झक्कास मिसळ आणि फोटो.
फोटो दिसत नाहीत.
In reply to फोटो दिसत नाहीत. by सूड
का?
बास! खूप झालं! आता
साखर?
In reply to साखर? by कंजूस
हो
In reply to हो by सविता००१
वा ! झकास मिस्सळ.. फरसाण आणि
In reply to हो by सविता००१
सहमत
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieuमस्त मस्त,आता पुण्याला आले की
अग अस काय
पूर्ण रेसिपीही वाचू शकलो नाही
हे देवा वाचव सव्या पासुन
तर्रीला किंचित घट्टपणा
In reply to तर्रीला किंचित घट्टपणा by गवि
धन्यवाद गवि
तुम्ही यात सगळ्या पदार्थांचे
In reply to तुम्ही यात सगळ्या पदार्थांचे by एस
अरेच्चा
झकास सवे! मस्त दिसतेय मिसळ!
मस्त !!!
ठीकठाक रेसिपी आणि फोटो.