मित्रहो, "आपण आता चित्रकलेची सुरुवात केली पाहिजे" असे नेहमी वाटत राहणाऱ्या, पण नेमके काय करावे, कसली चित्रे काढावीत, ती कशी निघतील, लोकांना ती आवडतील का, कोणते रंग-ब्रश-कागद वापरावेत, कोल्ड प्रेस कागद बरा की हॉट प्रेस, ऍसिड फ्री बरा की साधाच बरा, ऍक्रेलिक की ऑइल की पोस्टर कलर की जलरंग की पेस्टल वापरावेत, चित्रांचा आकार किती असावा, झालेले चित्र बेडरूमात लावावे की जिन्यात की कुठे, फ्रेमिंग कुठून करवावे, फेसबुकावर लाईक्स मिळतील ना ? मिपावर दंगा तर होणार नाही ? ..... छे..... काहीच कळत नाही बुवा/बाई..... आणि अगदी आत्ताच सुरुवात केली पाहिजे असे कोणी सांगितले ? चला, नंतर बघू कधीतरी.... आत्ता अमुक तमुक करु .....
...... असे वाटणाऱ्या सर्वांनो , हा धागा तुमच्यासाठीच आहे. तर आता काय करायचे ते बघूया.
१. सुरुवातीचा निश्चय
बहुतेक सर्वांच्याच चित्रकलेची सुरुवात फोटो वा चित्रे बघून काढण्यापासून होत असते. सुरुवात म्हणून हे ठीक असले, तरी नंतर मात्र या सवयीत अडकलेल्यांची प्रगती खुंटते.
तर समजा तुम्ही ती मधुबाला, सचिन, शिवाजीमहाराज वगैरेंची सुंदरशी हुबेहूब चित्रे काढून वाहवा मिळवणारांपैकी आहात, किंवा तसले काही न करणारांपैकी आहात ... आता पहिले काम करायचे ते असे, की "यापुढे कोणतेही चित्र वा फोटो बघून आपण चित्र काढायचे नाही" असा निश्चय सगळ्यात आधी करायचा.
२. बरं, मग पुढे ?
... सुरुवातीला सहज उपलब्ध असलेले साहित्य उदाहरणार्थ कोणताही कोरा/पाठकोरा कागद आणि पेन्सिल/ पेन घेऊन आता या पुढील अर्धा तास आपल्याला फक्त चित्र काढण्यात घालवायचा आहे, असे ठरवून सज्ज व्हा.
... अन्य व्यत्यय उदा. मोबाईल, टीव्ही, वगैरे बंद करा.
....आपण आता करणार असलेले चित्र कुणाला दाखवण्यासाठी, फेसबुक वा मिपावर वगैरे टाकण्यासाठी नसून निव्वळ शिकण्यासाठी, चित्रकलेचा आनंद लुटण्यासाठी आहे, ते चांगले झाले नाही तर फाडून टाकले तरी चालेल .. असे ठरवून आजूबाजूला बघा.
३. भोवताली काय दिसते आहे?
... ते बघा, आणि त्यापैकी एकादी वा दोनचार गोष्टी निवडा आणि त्याचे जसे जमेल तसे चित्रण करणे सुरु करा. भोवताल अगदीच नीरस वाटत असेल तर गॅलरीत, गच्चीवर वा बाहेर पडा आणि समोर दिसणारे दृश्य रेखाटने सुरु करा.
बस. हीच तुमच्या चित्रकलेची खरी सुरुवात आहे.
अन्य संकल्पना, रंगांचे प्रकार, कागद / कॅनव्हासचे प्रकार, ब्रशचे प्रकार आणि त्यांचे उपयोग वगैरे सर्व गोष्टी यथावकाश या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये येतीलच.
हुर्रर्रर्रर्रर्रर्र सुटा, रेखाटनाला लागा, आणि चार- पाच रेखाटने इथे टाका. तुम्हाला आणि घरच्यांना ती कितीही खराब किंवा चांगली वाटली तरी.
(क्रमशः)
.
.
.
.
.
.
.
.
वाचने
35537
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना.
छान सुरुवात!
घरी जाऊन रेखाटन करतो आणि
अत्यंत धन्यवाद काका..
पुढचे पाऊल
In reply to अत्यंत धन्यवाद काका.. by गवि
अरे वा! मस्त मालिका. टाकते
यशोधरेने केलेली ही काही अगदी बेसिक रेखाटने.
In reply to अरे वा! मस्त मालिका. टाकते by यशोधरा
वाहवा.
In reply to यशोधरेने केलेली ही काही अगदी बेसिक रेखाटने. by पद्मावति
तुमच्याकडून शिकायचे आहे काका.
In reply to वाहवा. by चित्रगुप्त
एकच लंबर स्केचेस मैय्या, खुप
In reply to तुमच्याकडून शिकायचे आहे काका. by यशोधरा
सुंदर.
In reply to यशोधरेने केलेली ही काही अगदी बेसिक रेखाटने. by पद्मावति
सुंदर !
In reply to यशोधरेने केलेली ही काही अगदी बेसिक रेखाटने. by पद्मावति
वाउ
In reply to यशोधरेने केलेली ही काही अगदी बेसिक रेखाटने. by पद्मावति
धन्यवाद सरजी!
चिरंजिवांना नियमित वाचायला
In reply to धन्यवाद सरजी! by खेडूत
मस्तच विषय! चित्र काढणं मनापासून आवडतं पण वेळ मिळणं मुष्किल
सुंदर
In reply to मस्तच विषय! चित्र काढणं मनापासून आवडतं पण वेळ मिळणं मुष्किल by चतुरंग
वाचते आहे. तुमच्याकडून शिकणे
छान सुरुवात!
मस्त
चित्रकलेची(म्हणजे चित्र
उपयोगी मालिका !
सुंदर उपक्रम !!
भन्न्नाट इनिशियेटिव !
छान माहिती
व्वा!
मिपा कलादालन
मिपा कलादालन
वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने -
सराईत हात आहे हो, शेडलाईटस
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
+१११
In reply to सराईत हात आहे हो, शेडलाईटस by अभ्या..
+११११ सुंदर !!!
In reply to +१११ by खेडूत
सराईत वगैरे काही नाही, शिकवूच
In reply to सराईत हात आहे हो, शेडलाईटस by अभ्या..
भारी स्केचेस ! अजून येवु
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
सर्व चित्रे आवडली.
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
मस्तच!
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
मस्तंच की !
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
फोटो व चित्र
In reply to वा! सुंदर धागा! माझी काही रेखाटने - by सपे-पुणे-३०
छान आहे मालिका ..... अभिनंदन
किती कलाकार आहेत मिपावर !!!
चित्रे न बघता चित्रे काढणे हे
पिशाच्यापासी पिशाच गेलें
वाचतो आहे
हे "द कन्क्लुजन" आहे बहुधा,
In reply to वाचतो आहे by प्रदीप
ह्यात कुठेही रेखाटने कशी
In reply to वाचतो आहे by प्रदीप
कलादालन
In reply to ह्यात कुठेही रेखाटने कशी by चित्रगुप्त
मोदादि
In reply to कलादालन by केरभाऊ विश्वासराव
चांगला उपक्रम
वा
जिथे मिळेल आणि जसे जमेल....