Skip to main content

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

लेखक गणपा यांनी बुधवार, 04/08/2010 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा. संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय. पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही. जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे. गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो. पायरी १. प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा. येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे. पायरी २. हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे. तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा. Start Upload क्लिकावे. पायरी ३. फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे. पायरी ४. फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे. पायरी ७. ५ URL चा पत्ता कॉपी करावा. पायरी ६. मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. पायरी ७. पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 172025
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

डायरेक्ट अपलोड फोटो असा पर्याय असायला पाहीजे होता. किती बर झाल असत

In reply to by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)

ही सुविधा कदाचित अव्यवहार्य असू शकते. शेकडो मिपाकरांनी फोटोज मिपाच्या सर्वरवर अपलोड करणे सुरु केल्यास त्याला भरपूर स्टोरेज स्पेस लागेल. त्यासाठी अधिक खर्चही येईल. तसेच कुणी आक्षेपार्ह फोटोज वगैरे टाकल्यास उगाच कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. (या मला वाटणार्‍या शक्यता आहेत, खात्रीशीर माहिती नाही). जर तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड करणे सोपे वाटत असल्यास तसे करून फोटोंचे दुवे इथे वापरता येतील. स्वतःचे प्रोफाइल पब्लिक नसल्यास या कामासाठी वेगळे फेसबुक पेज सुरू करता येईल. माझे फेसबुक प्रोफाइल पब्लिक असल्याने मी तेथे अपलोड केलेले फोटोज मिपावर (दुवा वापरून) प्रकाशित करत असतो.

मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---- मी गेली पाच वर्षे सर्व काम मोबाइलमधूनच करतो आहे.पुर्वी १)photobucket dot com वापरली आणि आता त्याहूनही सोप्पी २)postimg dot org ही आहे. रेजिस्टर करून (कितीही अकाउंट उघडा) अॅल्बम बनवा.एक मिनीट लागेल.इथे फोटो अपलोड झाला की त्याच्याखाली लिंक्स येतात त्यापैकी "Direct link" या चौकोनातली लिंक वापरणे.

In reply to by कंजूस

मी या पद्धतीने फोटो अपलोड करून बघतो. शक्य असल्यास या कृतीचे फोटोजसकट वर्णन टाका जेणेकरून नवमिपाकरांना मार्गदर्शन मिळेल.

आपण काय लिहिणार आहोत आणि कोणते फोटो डकवायचे हे निश्चित असेल तेव्हा ते प्रथम फोनच्या "नोटस"मध्ये html code टाकून सेव करणे सोपे जाते सिवाय हे काम प्रवासात फावल्या वेळातही ओफलाइन करता येते. त्यासाठी खालील टेम्पेलटस करून ठेवायची आणि योग्य जागी फक्त लिंक्स पेस्ट करत जायचे. नंतर संपूर्ण लेख मिपाच्या लेखन चौकटीत पेस्ट करून "पुर्वपरीक्षण" करून फोटो हवे ढसे दिसल्यावरच "प्रकाशित करा" बटण दाबा. टेम्प्लेट: १)[img src="" width="500" /] इथे [[[[ ]]]] हे कंस काढून इसे html चे कंस वापरा आणि " "च्या मध्ये फोटोंची लिंक पेस्ट करायची.

In reply to by कंजूस

मिपाच्या टेक्स्ट एडिटरवरील टूलबारमध्ये पहिलेच बटन फोटो प्रकाशित करण्याचे असताना html कोड वापरावे असे का सूचवले आहे? मोबाइलचा स्क्रीन फार मोठा नसल्यास ते बटन वापरून हे काम करणे कदाचित क्लिष्ट होत असावे हा माझा अंदाज.

ओफलाईन काम करण्यासाठीचे लिहिले आहे.ज्यांना तुकड्या तुकड्यात लेखन आणि फोटोंच्या लिंक्स टाकून काम करायचे आहे त्यांना हे सोपे वाटेल. यापुढची पायरी-तुमचा तीन एमबीचा फोटो posting siteवर असला तरी इकडे ५ -६शे केबीचा येतो आणि न्याय देऊ शकत नाही .अशावेळी [a href="" ]मोठा फोटो इथे पाह [/a]वापरून ती लिंक " " च्या मध्ये टाका.

In reply to by अनुरोध

तुम्ही फोटोचा दुवा वापरलेला नाही. त्याऐवजी बहुधा फ्लिकरवरून फोटो एम्बेडचे कोड वापरलेले दिसत आहे. दुवा (बहुतेक वेळी) https:// ने सुरु होईल अन .jpg किंवा .JPG ने संपेल फ्लिकरवरचे HTML Embed ऑप्शन घेतल्यावर जे कोड मिळतं त्यात < img src = " नंतर सुरु होणारा दुवा घ्यावा अन तो मिपावर वापरावा. स्वतःला पूर्वपरिक्षणात फोटो दिसला नाही तर दुवा चुकलेला असू शकतो असे समजावे. तसेच फ्लिकर मधून लॉग आउट करून मिपावर फोटो प्रकाशित करावा म्हणजे पूर्वपरिक्षणात न दिसल्यास तो पब्लिकली शेअर्ड नाहीये हे कळेल.

In reply to by अरिंजय

कुठल्याही फोटो शेअरींग साइटवरुन फोटोच्या फाइलचा दुवा द्यावा लागतो. तो तिथे दिसत असताना अ‍ॅड्रेसबारमधला युआरएल दुवा म्हणून वापरू नये. तुम्हे वापरलेल्या दुव्यावरून फ्लिकर वर गेलो असता खालचा फोटो मिळाला (फोटोचा दुवा)

माझा प्रश्न पिकासावेब बद्दल.मला दुवा मिळतो त्याच्या शेवटी feat=directlink हा शब्द येतो आणि फोटो उमटत नाही.इतरांच्या याच साइटच्या फोटोच्या दुव्यात feat=embedwebsite असं दिसतं आणि त्याचा image tag काम करतो. प्रश्न दुसरा: लेखातल्या फोटोवर प्रेस केले की इतर संस्थळावरच्या पिकासावेबचे फोटो असले तर copy link हा पर्याय दिसतो.मिपावरच्या कोणत्याच लेखाच्या कोणत्याच फोटोंवर copy link पर्याय मिळत नाही फक्त save/open image हे सामान्य पर्याय येतात.मोबाइलच्या ब्राउजरची असमर्थता असावी का?

123 जमले हो. धन्यवाद श्रीरंग.

फ्लिकरच्या वेबसाईटवरुनच फोटो चिकटवावा लागतो, अॅप वरुन चिकटवता येत नाही.

#फ्लिकर : #वेबसाईटवरुनच फोटो चिकटवावा लागतो, अॅप वरुन चिकटवता येत नाही. या लेखात फोटो देण्याविषयी लिहिलेलं आहे आणि हे काम computer/laptop वरून करताना काही अडचण येत नाही.परंतू फक्त मोबाइलच वापरायचा झाला तर १) एकतर फुल वेबपेज उघडत नाही आणि दुवा मिळत नाही, अथवा २) फुल वेबपेज उघडले तरी इकडे भारतात नेट स्पीड फार कमी असल्याने वेळ फार जातो ,अथवा फोनची रॅम लगेच फुल होते , आणि ३) महत्त्वाचे डेटा फार खातो. पंधरा मिनीटांत पंधरावीस एमबी डेटा जातो. ४) आतापर्यंतची सर्व इतरही फोटोशेअरिंग साइट्सची अॅप्स फक्त फोटो घेतात पण त्यांची लिंक्स देत नाहीत.

In reply to by स्वधर्म

आपल्या माहितीकरता: अविनाश कुलकर्णी आता हयात नाहीत. संदर्भः अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ते गेल्यावरही त्यांची मदत होतच आहे.

खरच उपयुक्त

१. मिपा वर कोणत्याही बाहेरच्या साईट ची लिंक न देता मोबाईल वरून किंवा i-pad वरून फोटो टाकता येत नाही का? २. पिकासा ची लिंक देता आली पण फोटो नाही जोडता आला काय कारण असेल , laptop वरूनच करावे लागते का ?

सप्तरंगी साहेब, तुम्ही पिकासामध्ये फोटो डिस्प्ले होतो तिथला अ‍ॅड्रेसबारमधला दुवा वापरला आहे. त्याऐवजी फोटो डिस्ल्पे झाल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज अ‍ॅड्रेस हा पर्याय वापरून जो दुवा मिळेल तो मिपावर वापरावा लागतो. थोडक्यात दुवा प्रत्यक्ष इमेज फाइलचा असावा (बहुतेक वेळी .jpg ने संपणारा) वेबपेजचा दुवा वापरल्यस फोटो दिसणार नाही.

In reply to by सप्तरंगी

last try मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत , कदाचित माझ्या laptop च्या settings चा problem असावा , मोबाईल वरून तर linkच दिसत नव्हती , नंतर दुसर्या comp वरून बघते , thanks

In reply to by सप्तरंगी

तुम्ही योग्य दुवा मिळवला असला तरी प्रकाशित करताना फोटोऐवजी दुवा प्रकाशित करण्याची प्रक्रिया केली. फोटोसाठी या टेक्स्ट एडिटरच्या वरचे पहिलेच बटन वापरावे लागते. दुसरे बटन दुवा देण्यासाठी आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे कोणताही फोटो त्या लिंक icon वरून (दुसऱ्या ) टाकताना सतत pixels adjust करून बघावे लागणार न ? फारच कंटाळवाणे आहे, बाकी सगळीकडे पटकन फोटो टाकता येतो. मिपा patience शिकवते :) मी सतत फोटो टाकून बघितले, मिपा admn images delete करू शकते

In reply to by सप्तरंगी

pixels adjust म्हणजे नेमके काय ते कळले नाही. प्रतिसादात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६४० असावी (लांबी द्यायची गरज नाही, ब्राउझर स्वतः रुंदीच्या गुणोत्तरानुसार सेट करते). लेखात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६६० असावी म्हणजे फोटो उजव्या समासातल्या गोष्टींवर अतिक्रमण करत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

सध्या तरी मला जरा किचकटच वाटते आहे, कारण पटकन upload नाही करता येत फोटो. आधी पिकासा वर पण upload करावा लागतो. पण मला वाटते आता कळाले आहे, तुमचे आभार, वेळ काढुन शिकवल्याबद्दल :)

In reply to by सही रे सई

या फोटोला पब्लिकली शेअर्ड केले आहे का. या दुव्याद्वारे तुम्ही गुगलमधून लॉगाआउट केल्यावरही फोटो दिसत असल्यास पब्लिकली शेअर्ड आहे असे सिद्ध होईल.

meghalay मेघालयमधील एका खेड्यात भुभु लोकांशी गप्पा मारल्यावर साहना यांनी केलेल्या टुलची लिंक उपयुक्त दिसते. वा!

In reply to by इन्ना

काही लोकाना दिसतय काहीना नाही हे कस . पिकासा आता गूगल फोटो झाल तेव्हा पासून हा प्रॉब्लेम येत असावा का? इमेजेस पब्लिक केल्यात ( ज्या लोकाना दिसतायत ते सगळेच फ्रेन्ड्लिस्टीत नाहीत अन ज्याना दिसत नाहीत त्यात फ्रेन्ड लिस्टीतले आहेत , त्यामुले हे कारण नसाव)

tayaree फ्लिकर वरचा फोटो दिसत नाहीय. त्याची शेअर ऑलरेडी पब्लीक आहे. कृपया मदत करा.

In reply to by अरुण मनोहर

तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून मिपाच्या इमेज डायलॉग बॉक्समध्ये जे पेस्ट करत आहात तो "इमेज अ‍ॅड्रेस" नाही तर आल्बमकोड किंवा थंबनेल कोड आहे. इमेज अ‍ॅड्रेसचे ".jpg" किंवा तत्सम ग्राफिक्स एक्स्टेन्शन असेल. ते कॉपी-पेस्ट केलेत तर समस्या येणार नाही. फ्लिकरवर (किंवा इतर कोणत्याही संस्थळावर) चित्र पूर्ण आकारात (मोठ्यात मोठे) डिस्ल्पे केल्यावरच इमेज अ‍ॅड्रेस मिळू शकतो. छोट्या आकारांत अल्बम कोड अथवा थंबनेल कोड मिळतो. उदा : तुमच्या वरील चित्राचा इमेज अ‍ॅड्रेस "http://c1.staticflickr.com/5/4193/34049782532_9f8fdb8502_z.jpg" असा आहे. तो वापरल्यास मिपामध्ये ते चित्र असे दिसेल...  त्याऐवजी तुम्ही वापरलेला कोड "https://www.flickr.com/photos/149117751@N04/34049782532/in/album-721576…" असा आहे, जो आल्बम कोड / थंबनेल कोड आहे.

सगळ्या प्रतिसादांची खूप मदत झाली. मी पिकासाद्वारे फोटो अपलोड करण्याचा फोल प्रयत्न केला. त्यानंतर फ्लीकरवर तपास सुरु केला आणि यशस्वी झाले. सामोसा नावाची पहिली पाककृती पोस्ट केली. सर्वात आधी याहूवर अकाऊंट बनवले.त्यावरून फ्लिकरवर जाता येते. तिथे फोटो अपलोड केले. ते सर्वाना दिसले पाहिजे. पब्लिक असावेत. प्रायवेट नकोत. फोटोला क्लिक करून मोठा केला. त्याला राईट क्लिक करून “कॉपी इमेज अड्रेस” घेतला आणि मिपावर त्यांच्या सुचनेनुसार टाकला. तिथेच “इन्स्पेक्त” करून जास्तीच्या प्रोपरटीज घेतल्या. झालं!

वरील फोटो येथे अगदी स्पष्ट दिसतोय. हाच फोटो मी माझ्या मोबाईलवरून आणि कॉम्प्युटरवरूनसुद्धा माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये डकवून पाहिला. पण तेथे तो एकदम धुरकट दिसतोय. कृपया धुरकट फोटो माझ्या प्रोफाइलमध्ये जाऊन आपणांस पहाता येईल. प्रोफाईलमधील फोटो स्पष्ट दिसायला काय करता येईल बरे!?

माझ्या जुन्या लेखांवर नजर टाकता एक दिसले. पूर्वी व्यवस्थित चढविलेले व दिसत असलेले फोटो आता गायब होतात. त्याजागी फक्त छोटी चौकट दिसते. एका लेखात ४ फोटो होते. त्यातले ३ दिसताहेत अजून पण एकच गायब. याचे कारण?

In reply to by हेमंतकुमार

काही कारणे: १. फोटो हलवून वेगळ्या अल्बममध्ये/संस्थळावर हलवले २. फोटो एडिटिंग केले * १ व २ केल्याने फोटोंचा इमेज अ‍ॅड्रेस बदलतो व तो नव्याने मिपावर टाकावा लागतो. ३. फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला