तडा गेलाच आहे तर...
नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या!
नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या!
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!
नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या!
जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो
चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या!
—सत्यजित
वाचने
4318
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान कविता.
In reply to छान कविता. by एस
धन्यवाद!
अश्या बेरंग अश्रूंची कुठे
धन्यवाद!
गझल किती नियमात आहे हे न
In reply to गझल किती नियमात आहे हे न by दशानन
धन्यवाद!
छान आहे!
In reply to छान आहे! by अनुप ढेरे
धन्यवाद!
आवडली येवू द्या अजून
In reply to आवडली येवू द्या अजून by प्रमोद देर्देकर
धन्यवाद!
कविता आवडली
In reply to कविता आवडली by पैसा
धन्यवाद!
छान!
In reply to छान! by आषाढ_दर्द_गाणे
धन्यवाद!
सॉलिड आवडलीय ! :) आशय अप्रतिम
In reply to सॉलिड आवडलीय ! :) आशय अप्रतिम by वेल्लाभट
धन्यवाद!