टेंडर कोकोनट आईस्क्रीम
उन्हाळा सुरु झाला,की,निरनिराळ्या थंड वस्तूंचा मारा शरीरावर होऊ लागतो.त्यात काय नसतं?सब्जाचे बी,ठेचलेल्या धने+जिऱ्याचे पाणी कोकम-लिंबू-बेलफळ यांची सरबतं,पन्हं,ताक,लस्सी,दुधी-पालक-काकडी यांचा पुदिना,कोथिंबीर घालून काढलेला रस,निरनिराळ्या स्वादाची मिल्कशेस्,शहाळ्याचे पाणी, निरनिराळ्या स्वादाची आईस्क्रीम्स. यादी संपतच नाहीये.
तर सांगायची गोष्ट अशी की,भर उन्हाळ्यात नागीण झालेला पेशंट घरात असल्याने भेटायला येणारे पाहुणे भेटीदाखल शहाळी घेऊन येऊ लागले. त्यातलं पाणी पिऊन झाले की, मलई तशीच उरत असे.या मऊ खोबऱ्याचे टोमॅटोसार उत्तम होते,ते एक दोनदा करून झाले.मलई तशीच राहिली.मलई या नावाखाली जाड खोबरे जास्त खाल्लेपण जात नाही.लहानपणापासून पातळ मलई खायची सवय.(काय करणार?माहेरी शंभर माड असल्याने हवी तशी कोवळी शहाळी खायची सवय.)आता याचे काय करावे बरं?या विचारात तापमानाचा पारा चढत्या भाजणीत वर वर जाऊ लागला आणि आईस्क्रीमचे वेध लागला लागले.
नॅचरलने ज्यावेळी टेंडर कोकोनट आईस्क्रीमचा स्वाद आणला,त्यावेळेचा स्वाद आता त्या आईस्क्रीमला राहिलेला नाही.“मागणी तसा पुरवठा”, या उक्तीनुसार त्या स्वादाची प्रत पूर्वीची राहिली नाही.सर्रास तयार नारळ त्यात वापरला जातो आणि दुधापेक्षा दूधपावडरचा वापर त्यात होतो, हे लक्षात आल्यावर मी ते आईस्क्रीम खाणे सोडून दिले आहे.
आता हवे तसे खोबरे हाताशी असल्याने घरातच करून पाहूया हा विचार मनात रांगू लागला.अजयाने एका पाककृतीची लिंक दिली.तरला दलाल यांचीही एक कृती दिसली.पण त्यात मलईला वापरलेले फ्लेश,मीट यांसारखे शब्द पाहिल्यावर माझ्यासारख्या मांसाहारी व्यक्तीच्या अंगावरही शहारे आले.श्रीफाळाचा असा अपमान?(हा मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा परिणाम असावा बहुतेक!दुसरं काय?)
दोन्ही पाककृती नापास होण्याचे एक कारण हे आणि दुसरे कारण त्यात वापरलेल्या सगळ्याच वस्तू घरात नव्हत्या.मग आतापर्यंतचा स्वयंषाकघरातला अनुभव जमेस धरून प्रयोग करयचे ठरवले आणि मी हिट विकेट आउट न होता आईस्क्रीम हिट झाले.कमीतकमी पदार्थ वापरून केलेलीअतिशय सोपी,सुटसुटीत पाककृती तुमच्यासाठी सदर करतेय.
मला खात्री आहे,की,ही पाककृती वाचल्यावर तुम्ही नक्की शहाळी आणायला पळाल.तर पाहूया साहित्य काय लागतंय ते.
साहित्य:-
१.दोन लिटर दुधावरची साय,(माझ्यकडे जे दुध येते त्यावर एक लिटर दुधाला मिल्क कुकरमध्ये तापवले असतापिझ्झासारखी जाड साय येते.त्याने एक वाटी भरते.) तर अशी दोन वाट्या साय.
२. अर्धी वाटी दुध.(अर्थात साय काढलेले.)
३.दोन शहाळ्यांमधली मलई.(हीपण साधारण दोन वाट्या होते.थोडी कमीजास्त चालून जाईल.).
४. एक ते सव्वावाटी साखर.(कारण कधी कधी खोबरे खूप गोड असते तर चवीनुसासार कमीजास्त साखर लागू शकेल.)
कृती:-
१. शहाळ्याच्या मागच्या बाजूचा लालसर भाग काढून त्या मलईचे तुकडे करा.शहाळे जिथून फोडले जाते त्याच्या विरुद्ध बाजुची मलई जास्त मुलायम असते,अशा मलईचे अगदी बारीक तुकडे करा.ते साधारण पाव वाटी बाजूला ठेऊन द्या.
२. आता आपल्याला शहाळ्याचे क्रीम तयार करायचे आहे.बाकीची मलई आणि साखर एकत्र करून मिक्सरमधून मुलायम पेस्ट करा.थोडावेळ थांबून (इथे थांबाच,कारण मिक्सर गरम झालेला असतो.)त्यातच साय घालून फिरवून घ्या,आता मिक्सर स्लोवर ठेवा,नाहीतर सायीतून लोणी वेगळे होईल.
३. अल्युमिनियामच्या भांड्यात हे मिश्रण ओता.
४. बाजूला ठेवलेले मलईचे तुकडे घालून एकाच दिशेने चमचा फिरवून ढवळा.
५. सहा तास फ्रीजरमध्ये ठेवा.सहा तासांनी कधीही काढून खायला घेऊ शकता.मृदूमुलायम आईस्क्रीम तयार.या आईस्क्रीमला पुन्हा मिक्सरमधून फिरवण्याची गरज नाही

Taxonomy upgrade extras
वाचने
16949
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छाने कृती
`सहा तासांनी कधीही काढून खायला घेऊ शकता'.... इतका वेळ वाट पाहाण्यापेक्षा नॅचरल्सला जाऊन खाणं सोपयं. अर्थात, माझं ऑल टाईम फेवरीट आईस्क्रीम हे आहे :नॅचरल्सला? शी! मला नाही आवडत
In reply to छाने कृती by संजय क्षीरसागर
नुकतंच नॅचरल्सचं टेंडर कोकोनट
In reply to नॅचरल्सला? शी! मला नाही आवडत by नूतन सावंत
पण, स्वतः बनवून खाण्याची आणि
In reply to छाने कृती by संजय क्षीरसागर
मस्त ! सगळे आनंद दमड्या देऊन
मस्त ! सगळे आनंद दमड्या देऊन
In reply to मस्त ! सगळे आनंद दमड्या देऊन by मितान
करुन बघायला हवे
फोटू ?
फोटो दिसत नाहीत, पण पाकृ हिट
सुरंगीताई
एकच नम्बर..नक्की करून बघणार.
एकच नम्बर..नक्की करून बघणार.
वा वा!! माबोवर http://www
मायबोलीवर अशी पाककृती आहे हे
In reply to वा वा!! माबोवर http://www by पिलीयन रायडर
टेंडर कोकोनट क्या बात है
छान दिसतय की आईस्क्रीम
कधी येऊ? करुन घालशील ना
नक्कीच निघण्याआधी सहा तास
In reply to कधी येऊ? करुन घालशील ना by यशोधरा
हैला! डन, डनाडन डन!
In reply to नक्कीच निघण्याआधी सहा तास by नूतन सावंत
कोलंबी खायची असेल तर किती वेळ
In reply to नक्कीच निघण्याआधी सहा तास by नूतन सावंत
त्याला वेळ लागणार नाही तू
In reply to कोलंबी खायची असेल तर किती वेळ by टवाळ कार्टा
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakhariaवाह! आता करूनच बघतो ह्या
.................
वाह, मस्तच.
मस्तच, नक्की करून बघणार
अरे वा
ज्यांना शहाळं आणि नारळाचा चव
अहा..