चलच्चित्र
लेखनविषय:
भुर्रकन इथे, भुर्रकन तिथे
उडता पक्षी, काढी नक्षी
एक गिरकी, एक फिरकी
घेत हलकी, गळे पान की
सुळूक असा, सुळूक तसा
लवलवता, हलतो मासा
शीतल धुंद, झुळूक मंद
पहाट वारा, गुलाबी शहारा
वेगवेगळी, ऊले पाकळी
पहाट वेळी, खुलते कळी
प्रकाश बिंदू, निशा समय
उडे काजवा, ठाय लय
वाचने
565
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
दुरुस्ती