आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता.
माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?
******************************************************
त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !
रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ?
सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?
'योगी' कितीक झाले, होतील लाखो मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ?
झोळी गळ्यात बांधुन दारात ऊभा आहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल का हो काही ?
पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली
पाण्यास मार्ग आता दावाल का हो काही ?
येतील दिवस तेही नांदू पुन्हा सौख्याने
आशा चुकार वेडी रुजवाल का हो काही ?
© विशाल कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4242
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी कच्चा माल !
वाह क्या बात है!!
विशालभाऊ, वेल्लाभाऊ,
+१
In reply to विशालभाऊ, वेल्लाभाऊ, by अभ्या..
चक्क !!
In reply to +१ by स्पा
ॲड मी!
In reply to चक्क !! by किसन शिंदे
22 Mar 2017 - 12:03 pm | स्पा
In reply to +१ by स्पा
22 Mar 2017 - 12:03 pm | स्पा दिसल जरा इथेही मीि-पावरीच आहे अॉफलाइनीतूनिही मिपाघरीच आहे.
भारी लिहिलय!
मस्त! आवडली
इतरांचे माहीत नाही अभ्याशेठ,
थ्यांक्स विशालभाव,
In reply to इतरांचे माहीत नाही अभ्याशेठ, by विशाल कुलकर्णी
धन्यवाद, स्वारस्य असेल तर
In reply to थ्यांक्स विशालभाव, by अभ्या..
आधी होते स्वारस्य. आता नाही.
In reply to धन्यवाद, स्वारस्य असेल तर by विशाल कुलकर्णी
बाकी इनव्हर्टेड कॉमामधले शब्द
छान!
सुरेख गझल, पण.....
शार्दुल भाऊ, मनःपूर्वक आभार.
In reply to सुरेख गझल, पण..... by शार्दुल_हातोळकर
वाह!!
In reply to शार्दुल भाऊ, मनःपूर्वक आभार. by विशाल कुलकर्णी