मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेदना..

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

वाचने 1024 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अत्रुप्त आत्मा 23/02/2017 - 23:02
@
कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते!
››› आहाहा! सल्लाम!

मदनबाण 22/03/2017 - 05:28
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty

शार्दुल_हातोळकर 22/03/2017 - 16:43
छानच !!