-----
लेखनविषय:
काव्यरस
परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा
हळूच कुरवाळावी
पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी.
त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी...
जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या
त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे..
झेपले तर थोडा दूधभात घालावा
म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल...
कोण कुठले गरीब बिचारे
देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे..
मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत
जड वाटल्याचे भासवत हलके हलके व्हावे !
परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे!
जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !
एवढे करून चिरेबंदी वाड्यात परतताना
पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये
नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !
वाचने
4890
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
हम्म....
कच्च्कन काटा रुतावा तशी टोचणारी कविता. प्रचंड प्रभावी.
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून.
हो ना, पुन्हा पुन्हा वाचतेय, प्रत्येक वेळी नवीन काही कळत जाते. खूप सुंदर!!
छान कविता.
संदीप खरेंची "दु:ख येतेच" ही कवीताही वाचण्या सारखी आहे. बहुतेकांनी वाचलीही असेल.
जनमानसात त्या मानाने रुळलेल्या, सोसेल तेवढेच बेगडी परोपकार करण्याच्या टोचणीचे चित्रण छान केलेय. "मांजर होते म्हणे" या ओळीतून "म्हणतात म्हणे" या चालीवर रेटली जाणारी अनेक उदाहरणे आठवली. शेवट या ओळींनी झाल्याने कविता विशेष आवडली.
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे अवघड काम!
अतिशय मार्मिक !अभिनंदन!
In reply to लाजवाब! by सत्यजित...
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे अवघड काम! अतिशय मार्मिक !अभिनंदन!››› प्लस वन.
.
Sandy
व संवेदनशीलता दोन्ही ची मागणी एकाच वेळी करतात. त्यातुन होणारी जीवाची घालमेल किंवा मनाच्या समरस होउ पाहण्याची आस या कवितेची प्रेरणा असावी का ?
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून. +१
सुन्दर !! आत्तापर्यन्त श्रॉडि॑जरच॑ (क्यू.एम. मधल॑) एकच मा॑जर मनात घर करून होत॓. आता हे दुसर॓ बरेच दिवस पाठलाग करणार !
बर्याच गोष्टी डोळ्यासमोरुन गेल्या. सुंदर आहेच हेवेसांनल!
__/\__ सुन्दर..
परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे! जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !जब्बरदस्तच की. . इंटरन्याशनल कवितेचे सबस्टन्स आहेत राव.
छानच !
खूप भावली.
कविता फार आवडली.
...
पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये
नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !
हे तर अगदीच खास!!!!
सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार !
शीर्षक काही सुचले नाही या कवितेला :(
मस्त !!
निशब्द!!!!!
आवडली
कविता आवडली.
काय गजब लिहिल्या गेलं आहे हे!
वाचून-वाचून पाठ झालंय तरी वाचल्यावाचून राहत नाही!
शीर्षकाची तशी उणीव अशी भासत नाही काहीच,पण तरी 'दुःख आणि मांजर' असं साधं किंवा 'नाहीतर आपलेही...'असं,सुचवतोय सहज!
In reply to काय गजब लिहिल्या गेलं आहे हे! by सत्यजित...
'दुःखानुभूतीचे मर्म' उलगडणारा 'सफल राजमार्ग' वाटते ही रचना! पुनःश्च अभिनंदन! लिहीत रहा!
हम्म...