पराठा किंवा तिखट पुरणपोळी.. ;)
नमस्कार मित्रहो..
असं म्हणतात की, तहान लागली की, विहिर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी. छे! पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला! आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार? करा इनोवेशन्स.
मी आणि माझी एक मैत्रीण .. दोघी नेहमीप्रमाणे आपापले रडगाणे गात होतो.. की, मुलांना डब्यात काय काय द्यायचं. माझ्या परीने मी माझा प्रश्न सोडवला होता. म्हणजे ५ दिवसांपैकी, २ दिवस तूप सारख पोळी चा रोल, २ दिवस पालक, मेथी, अशा भाज्या घातलेल्या पुर्या आणि एक दिवस ब्रेडचं सँडवीच. पण हा जळ्ळा इथला ब्रेड टोस्ट केल्याशिवाय खावासा वाटतच नाही. त्याचं सँडवीच केलं की, खातना हमखास टाळ्याला चिकटणार आणि सँडविच नको पण ब्रेड आवर असं म्हणायची वेळ येणार. त्यात माझ्या लेकाचे नखरे. माझ्या म्हणजे माझ्या मैत्रीणीच्याही लेकाचे!
सहज बोलता बोलता मी तिला म्हणाले की, अथर्वला पटेल मध्ये मिळते ती गरम कचोरी खूप आवडते. भलेही पटेल वाला, ती माय्क्रोव्हेव करून देतो पण त्याला आवडते. ती सहजच म्हणाली की, कचोरीचं स्टफिंग थोडासा फरक करून त्याच्या पराठा करून द्यायला हरकत नाही.
झालं!!!!!!!!! हे बोलणं झालं आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झाली. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला सारखी मी आले स्वयंपाकघरात. माझं स्वयंपाक घर खर्या अर्थाने प्रयोग शाळा आहे. म्हणजे तिथे इतके प्रयोग सुरू असतात, एखाद्या शस्त्रज्ञ काय करेल त्याच्या लॅबमध्ये!
शितल म्हणते, मी सुरळीच्या वड्या चांगल्या करते. तिला कुठे माहिती आहे की, ते वड्यांचं पीठ नीट पसरल्यावर ते गुंडाळी होतंय की नाही हे पाहिल्याशिवाय मी खोबर्याचं सारण करतंच नाही. ;) असो.. असुदेत गैरसमज.
तर.. आता हा पराठा कम तिखट पुरणपोळी.. करणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर.
कणिक - २ कप
मूग डाळ १ कप
बडिशेप - १ चमचा
मीठ
धणे जीरे पावडर - १ चमचा
गरम मसला - १ चमचा
आमचूर पावडर १ चमचा .. नसल्यास चिंचेचा कोळ १ चमचा.
गूळ - सारण ज्याप्रमाणात गोडसर हवे आहे त्याप्रमाणात अथवा साखर २ चमचे.
तेल.
तवा, फ्राईंग पॅन, पोळपाट लाटणे.
१. मूगाची डाळ सुट्टी शिजवून घ्यावी. ती गरगट्ट नाही झाली पाहिजे. पाणी जास्ती असल्यास निथळत ठेवावी.
२. पॅनमध्ये, थोडे तेल घालून फोडणी करावी. फोडणीत बडीशेप, जीरे, ओवा, कढीपत्ता, हळद, हिंग घालावे. त्यात मूगाची शिजवलेली डाळ घालावी. ती ओलसर असेल.. त्यात मीठ, गरम मसाला, गूळ, चिंचेचा कोळ अथवा आमचूर पावडर घालावी.
३. हे मिश्रण आता हळूहळू शिजू लागते आणि डाळ मोडू लागते. आणि ते कोरडे होते. साधारण कोरडे झाले की, गॅस बंद करावा. ते पूर्ण गार झाले की, ते व्यवस्थित कोरडे होते.
४. हाताने सारखे करून घ्यावे.
५. कणिक, २ चमचे तेलाचे मोहन घालून, थोडी हळद, मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. सैल असू नये. दहा मिनिटे कणिक झाकून ठेवावी.
६. आता कणकेच्या पारीमध्ये वरील सारण भरून पोळी लाटावी.
७. तव्यावर दोन्ही बाजूनी तूप्/तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी.
८. सारणार कांदा बारिक चिरून घातला तरी छान लागेल..
हाच तो जगप्रसिद्ध पराठा..
सारण कोरडे असल्याने या पोळ्या ४-५ दिवस तरी अगदी छान टीकतात. प्रवासाला नेता येतील. मात्र त्यात कांदा घालू नये.
तर माझ्या ताई आणि मैत्रीणींनो.. नक्की करून बघा. तुमच्या पिल्लाला डब्यात काय द्यावे असा प्रश्न असेल तर एकदिवसाचा तरी हा प्रश्न मिटेल हे नक्की.
माझ्या दादा, काका आणि मित्रांनो.. तुम्हीही तुमच्या अन्नपूर्णेला (आई, पत्नी, बहीण, मुलगी) अगदी जरूर करायला सांगा आणि स्वतःच करत असाल तर नक्की करून बघा.
माझ्या प्रयोग शाळेतले प्रयोग नेहमीच टाकाऊ नसतात याचा प्रत्यय मला आला... जेव्हा माझ्या लेकाने अगदी आवडीने हा पराठा खाल्ला. :)
- प्राजु
सारण कोरडे असल्याने या पोळ्या ४-५ दिवस तरी अगदी छान टीकतात. प्रवासाला नेता येतील. मात्र त्यात कांदा घालू नये.
तर माझ्या ताई आणि मैत्रीणींनो.. नक्की करून बघा. तुमच्या पिल्लाला डब्यात काय द्यावे असा प्रश्न असेल तर एकदिवसाचा तरी हा प्रश्न मिटेल हे नक्की.
माझ्या दादा, काका आणि मित्रांनो.. तुम्हीही तुमच्या अन्नपूर्णेला (आई, पत्नी, बहीण, मुलगी) अगदी जरूर करायला सांगा आणि स्वतःच करत असाल तर नक्की करून बघा.
माझ्या प्रयोग शाळेतले प्रयोग नेहमीच टाकाऊ नसतात याचा प्रत्यय मला आला... जेव्हा माझ्या लेकाने अगदी आवडीने हा पराठा खाल्ला. :)
- प्राजु
वाचने
9640
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मस्त आहे ग. मी आजच करुन बघते,बाकी माझ्याकडे ही स्वयंपाक घर म्हणजे प्रयोग शाळा आहे.
आणी अजुन तरी सगळे प्रयोग व्यवस्थित होतात.
ही रेसिपी माझ्या पिल्लीला तरी नक्की आवडेल्,तीला असे पराठा प्रकार खुप आवडतात.
माझाही एक दिवसाचा प्रश्न सोडवल्या बद्द्ल धन्यवाद. .... :)
करून बघीन मीही!
एखादा दिवस उपयोग झाला तरी तुला शाबासकी!
सगळ्याप्रकारच्या पुर्याही करून बघीन आता.
रेवती
रेवती गवारीच्या ही करुन बघ. ;)
In reply to गवारीच्या ही by समिधा
हो करून बघीन.:)
रेवती
पराठा लई टेंम्टिंग!!!! नेमक्या भुकेच्या वेळी असले फोटु बघु नयेत! :) बाजुला कसलं लोणचं दिस्तंय? (की चटणी?)
असे खस्ता पराठे (खस्ता खाऊन केलेले ते) मस्तच लागतात.
एक बदल सुचवु का आगाऊपणा करून? भिजवलेली मुगडाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची. आणि थोड्या तेलात हिंग घालून परतायची. वरून थोडं थोडं पाणी शिंपडून, झाकण ठेवून वाफवायची. शिजवून आटवण्यापेक्षा पटकन होतं. (स्वानुभव :) ) हवे तर मसले पण तेलात परतून वर वाटलेल्या डाळीचा गोळा घालता येतो.
चण्याच्या डाळीचे पराठे पण असेच.
In reply to झकास!!! by मृण्मयी
राईट, माझ्याही डोक्यात हाच विचार आला.. की असं करता येईल.. वाटलीडाळ ला करतो तसं.. अर्थात सारण तितके कोरडं करायचे नसावे..
प्राजु, अफलातून रेसिपि आहे..
असली भारी रेसिपी सुचवल्याबद्दल (आणि तसंही १८ तारिख आहे म्हणून ;) ) तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
In reply to राईट, by भाग्यश्री
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to झकास!!! by मृण्मयी
ते उडपींच्या किचनमधून आलेलं टॉमेटो पिकल आहे.. म्हणजे पिकलेल्या टॉमॅटोचं लोणचं.. :)
सह्ही आहे एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to बाजूला ना.. by प्राजु
डेड्ली काँबीनेशन! उडप्याचं टोमॅटो पिकल आणि मुगाचे पराठे! आता रात्री वरणभात कसा गीळणार?? :)
आत्ताच ऑफीस मधुन घरी आलो आहे. तेव्हा करुन बघतो. पण मला पोळ्या निट लाटता येत नाहीत. तरी पण नक्की प्रयोग करतो आज. :P :P
मला तर स्वप्नातही भुक लागते....
In reply to लई भारी...तोडाला पाणी सुटले आहे. by खादाड_बोका
कणकेत ना, थोडं बेसन आणि चमचाभर रवा घालून भिजवा. आणि त्यात हे सारण भरून छोटी पुरी लाटून सरळ शॅलो फ्राय करा.. (किंवा डाएटचा प्रश्न नसेल तर सरळ तळून घ्या) मस्त नवाच प्रकार.
जान छिडक दोगे। ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वजन तर वाढले च आहे पण नो प्रॉब्लेम.. जसे जमेल तसे करीन :P
मला तर स्वप्नातही भुक लागते....
यमसदनास गेलो..!
सुंदर पाकृ..!
तात्या.
In reply to यमसदनास by विसोबा खेचर
हा पराठा खाल्ल्यानंतर आता पर्यंत तरी कोणाला काही फुड पॉईझनिंग सुद्धाअ नाही झालं नाहीये. तुम्ही यमसदनास कसे जाल?? अशा प्रतिक्रिया देऊ नका हो.. लोकांचा गैरसमज होतो.. :) अर्थातच ह. घ्या. हे. सां. न. ल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अगदी जरूर करायला सांगतोच.
मुगपराठा आवडला.
:-)
उद्याच्या डब्याचा प्रश्ण सुटला. पण छान रेसिपी हे माझ्या पोरीने पराठा संपवला तरच म्हणणार..
बघते करून कस काय जमत ते.
मीनल.
रोज बायकोला डब्यात काय द्यायचे हा प्रश्नच आहे.
कसला भारी दिसतोय हा पराठा..मी पण करुन बघणार नक्की...
हा पराठा डब्यात द्यायचा नसेल तेव्हा अशा प्रकारे खाल्ला तर:
गरम परठा थोडा कडक भाजायचा...ताटलीत काढुन घ्यायचा..
त्यावर चिन्चेचा सॉस/चटणी पातळ पसरायची,चाट मसाला भुरभुरायचा....बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर्,आणि बारीक शेव टाकायची.....आणि पिझ्झा सारखे तुकडे करुन खायचा :-)
-स्मिता :-)
In reply to १ नंबर... by स्मिता श्रीपाद
मस्त आयडीया आहे. झकासच लागेल. :)
प्रवासामधे खायला काय? हा प्रश्न सोडवलास..:)
मस्त आहेत आणि पौष्टीक सुद्धा..:) करून पाहीन नक्की.
मस्त आहे रेसिपी. उद्या लेकाला डब्यात पराठे.
छान आहे रेसेपी व सोपी पण !
* माझ्या प्रयोग शाळेतले प्रयोग नेहमीच टाकाऊ नसतात याचा प्रत्यय मला आला... जेव्हा माझ्या लेकाने अगदी आवडीने हा पराठा खाल्ला
बेचारा !!!!
=))
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा
वा वा!
एकदम प्रयोगशील आहेस की!! ;)
छान वाटतोय पराठा.
असेच प्रयोग करत रहा हो..
--शाल्मली.
भारीए की!!
करुन पाहिन...
माझा हा प्रयोग आवडल्याचे सांगणार्या सर्वांचे मनापासून आभार .
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
पाकृ आवडली. बडिशेप घातल्याने छान लागेल.
चकली
http://chakali.blogspot.com
सही