दही वडा
मधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे.
साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल
पाककृती –
वडे- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत. वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये.
ताक- पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे.
दही- वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे.
नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.
वाचने
13169
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पाकृमध्ये फोटो नाय हे पाहून
सोपी कृती आहे
In reply to सोपी कृती आहे by पैसा
नाही तो ब्लॉग माझा नाही, नेट
मला एक शंका आहे. उत्तर भारतात
In reply to मला एक शंका आहे. उत्तर भारतात by सही रे सई
उत्तर भारतात दही वड्यामधे गोड
In reply to उत्तर भारतात दही वड्यामधे गोड by माहितगार
श्रीखंडातल्या उडीदवड्याशी
In reply to श्रीखंडातल्या उडीदवड्याशी by रेवती
रोचक माहिती
In reply to उत्तर भारतात दही वड्यामधे गोड by माहितगार
पुण्यातील उपहारगृहात
आजच करून पाहतो! धन्यवाद!
फोटो नाय तर पाकृ नाय!!
असा करतात तर तो दही वडा!
परत करायचे ना दहीवडे ..
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONIछान.