मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रकथी

विशेषांक · · लेखमाला

अ‍‍ॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले. फिल्मच्या एडिटिंगसारखा किचकट भागही वेगाने पूर्ण केला गेला. खास ह्या उपक्रमाकरिता एवढे कष्ट घेऊन तयार केलेली ही फिल्म, मिपावर पहिल्यांदा प्रदर्शित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही फिल्म एकहाती बनवणार्‍या अ‍‍ॅरि फिल्म्सच्या संचालिका शिल्पा धेंडे ह्यांचे मिपाच्या वतीने हार्दिक आभार! राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलाकारांनी सादर केलेली चित्रकथी हा मिपाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण फिल्म असेल, हे नक्की!


वाचने 33925 वाचनखूण प्रतिक्रिया 42

जयंत कुलकर्णी Tue, 01/17/2017 - 10:36
मस्तच... कॅमेरा कुठला अहे ? हे एवढ्यासाठी विचारतोय की या प्रतीची फिल्म बनवायला काय काय लागते हे जाणून घ्यायची इच्छा आहे.. पण हे मस्तच...

In reply to by कंजूस

वेल्लाभट गुरुवार, 01/19/2017 - 16:35
मी काय म्हणतो कंजूसभाऊ, घरचं ब्रॉडबँड अनलिमिटेड असल्यास घरून प्ले करा विडियो. म्हणजे टेन्शन नको डेटाचं. किंवा मग लो-रेस मधे बघा, म्हणजे कमी टेन्शन. नाहीतर यूट्यूब चे व्हिडियो डाउनलोड करून देणार्‍या ऑनलाईन साईट आहेत, त्यांचा वापर करा. पण बघा नक्की.

केवळ अप्रतिम ! राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलाकारांनी सादर केलेली चित्रकथी हा मिपाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण फिल्म असेल, हे नक्की! +१००० अश्या कलाकारांचे या विशेषांकासाठी सहकार्य मिळविणार्‍या मिपाकराचे/रांचे हार्दीक अभिनंदन व धन्यवाद !!!

टुंड्रा Tue, 01/17/2017 - 21:35
शिल्पा धेंडे यांचे खूपच कौतुक ! नुसती एक सुंदर फिल्म बनवल्या बद्दल च नाही तर त्यावर शारीरिक व आर्थिक खर्च करून ती मिपा साठी मोफत उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद !!

सुरुवातीच्या प्रस्तावनेत फिल्म कशाबद्दल आहे, विषय, त्याच्याबद्दल केलेल्या शोधाची अनालॉजी वगैरे जर संक्षिप्त स्वरूपात मांडले असते तर माझ्या सारख्या डेटा रेशनिंग वर असलेल्या सभासदाला काही साधक बाधक कॉमेंट करता आली असती, तरीही फिल्मचे थोडे डिटेल्स जर प्रस्तावनेत संलग्न करता आले तर (अजूनही) करावेत ही नम्र विनंती.

सविता००१ Wed, 01/18/2017 - 12:02
मस्तच आहे ही चित्रकथी. खूप आवडली. शिल्पा धेंडे यांचे अनेकानेक आभार

सूड Wed, 01/18/2017 - 19:15
सुरेख, एक आजोबा शेवटी ते आणि त्यांचं कुटुंब महाराष्ट्रातून आंध्रात गेल्याचं नमूद करतात. मग आंध्रालगतच्या महाराष्ट्राच्या भागात देखील ही कला अजून आहे का याबद्दल माहिती मिळायला हवी.

In reply to by सूड

पैसा गुरुवार, 01/19/2017 - 12:42
कोकणात, वेंगुर्ल्याजवळ पिंगुळी गावात या कलेचा उगम आहे असे वाचलेले आठवते. तिथे अजून काही कुटुंबात ही कला जिवंत आहे.

In reply to by सूड

Arifilm Fri, 01/20/2017 - 23:54
महाराष्ट्रात पुण्याजवळ मामुर्डी नावाच्या गावात तसेच विदर्भातही चित्रकथी कुटुंबे आहेत. परंतु दुर्देवाने यातले कोणीही हि कला पुढे नेऊ शकले नाही. कोकणात पिंगुळी या गावात ठाकर आदिवासी ही कला सादर करतात.

Arifilm Fri, 01/20/2017 - 23:42
नमस्कार, चित्रकथी या माहीतीपटाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार. मिसळपावच्या माध्यमातून अगदी योग्य प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचता आले यामुळे खुप समाधान वाटत आहे.

अभिजीत अवलिया Sun, 02/05/2017 - 18:56
अतिशय सुंदर. संपूर्ण आयुष्य कोकणात (कणकवलीत) घालवून देखील कणकवलीपासून जेमतेम ४५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पिंगुळी मध्ये अशी काही कला आहे हे माहीत न्हवते. आता लवकरच पिंगुळीला जाऊन शोध घेईन. कोकणातील दशावतार ह्या कलेवर एक उत्तम भाग झाला असता. ह्या उपक्रमात भाग घेऊन दशावतार ही कला लोकांसमोर आणायला हवी होती असे आता वाटतेय.

In reply to by अभिजीत अवलिया

Arifilm Tue, 02/07/2017 - 13:17
धन्यवाद. महाराष्ट्रात दुर्मिळ होत चाललेल्या अशा खुप लोककला आहेत, ज्या प्रकाशात आणणे गरजेचे आहे. दशावतरीवर काम करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत. काही मदत लागली तर arifilms.in@gmail.com या पत्त्यावर नक्की कळवा.

एस Fri, 02/10/2017 - 08:24
चित्रफीत अतिशय नेटकी आणि देखणी झालेली आहे. अशा लुप्त होत चाललेल्या लोककलांचा दस्तावेज म्हणून या चित्रफितीचे महत्त्व मोठे आहे. अरी फिल्म्स चे आभार व कौतुक.

प्रदीप Sun, 02/19/2017 - 18:01
अतिशय बोलके चित्रीकरण, नेमके संकलन व नॅरेशन. अतिशय चांगला अनुभव. ही कला शतकांपासून चालू आहे, म्हणजे अगदी पार पूर्वीपासून हे कलाकार प्रेक्षकांना दूरचित्रवाणीचा अनुभव देत होते ! हे कौतुकास्पद आहेच, पण त्या कलाकारांची पाठ थोपटतांना बरेच वाईटही वाटत आहे. ते अशासाठी की सुमारे १९३०- ४० पासून चित्रपटांच्या जमान्यानंतर सदर लोककलाकारांना हा व्यवसाय तगवण्यासाठी केव्हढी धडपड करावी लागत असेल? आम्हा त्रयस्थ जनांना कौतुक करून पुढे जाणे सहज शक्य आहे, पण ह्यांनी त्यासाठी इतकी तोशिश का सोसावी? प्रेक्षकांच्या आश्रयाने आता ही कला जगण्याची शक्यता शून्य आहे. तेव्हा सरकारने ह्या (व अशाच इतर अनेक) पारंपारीक लोककलांना जगवण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.