शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद
लेखनप्रकार
फोन वाजला.
अरे, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद.
पण तुला का एवढा आनंद होतोय ?
वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही.
बरं, बरं, बघू या.
भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद!
डिसेंबरचा शेवटचा आठवडा.
काय, मग जाळल्या का नोटा ?
मी मजेत आहे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास ?
आम्ही मोजत नाही. हे राष्ट्रकार्य आहे.
आम्ही मोजतो बुवा, हे भ्रष्टकार्य आहे.
पण आता आलात ना रस्त्यावर
कधी कॅश लागली तर सांग.
गिरे तो भी टांग उपर.
अगदी कोर्या करकरीत! पाहिजे तेवढ्या!!!
वाचने
2173
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
कोण कोणास म्हणाले?
In reply to कोण कोणास म्हणाले? by ज्योति अळवणी
+१
मामला गडबडला.
छान आहे
काही नाही समजलं.
हे ठीक वाटतंय का?... :)
(ही माझी शशक नाही!)
.
.
.
''हॅलो!..
बबन्या, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद!''
''पण तुला का एवढा आनंद होतोय ?''
''वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही.''
''बरं, बरं, बघू या.''
''भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद!''
+++
३० डिसेंबर
''काय, बबनराव, जाळल्या का नोटा'' ?
''नाय ब्वा! ते जाउदे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास'' ?
''मोजतो कोण? हे राष्ट्रकार्य आहे''.
''आम्ही मोजतो बुवा, हे भ्रष्टकार्य आहे''.
''पण आलात ना रस्त्यावर..''
''आमीच रस्त्यावर आलो तर देश कसा चालणार..? तुलाच कॅश लागली तर सांग.
कोर्या करकरीत देतो! पाहिजे तेवढ्या...''
कोऱ्या करकरीत ,गांधींचा फोटो नसलेल्या :)
सत्यकथा :)
कोण कोणास म्हणाले?