Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं

लेखक भृशुंडी यांनी सोमवार, 30/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
a "आम्हाला ईश्वराचं सत्यस्वरूप शोधायचेय" एका शिष्याने नम्रतेने प्रस्तावना केली. "ह्म्म्म."- घोसातले एक द्राक्ष गुरूदेवमुखी विलीन झाले. "आपले मार्गदर्शन-" काही क्षण विमर्शात लोप पावले. "हे काय आहे?", एका ललनेचे अनावृतावस्थेतले उन्मादक चित्र पुढे ठेवून गुरूदेवांनी विचारणा केली. "काम", पट्टशिष्याचा उत्स्फूर्त सूर आला. "पाप", दुसर्‍या शिष्याने डोळे मिटले. "मोह", तिसर्‍याने नेत्र विस्फारले. "ज्ञान", पुटपुटत चौथ्याने काही मापे टिपून घेतली. "सौंदर्य" पाचवा चित्राकडे सरकला. "पत्ता?" म्हणून सहाव्याने वहीपेन्सिल पुढे ओढली. "स्त्रीचा अपमान!" सातवा खवळून ओरडला. "मोक्षsss" आठव्याची 'हस्तसाधना' भंग पावली. "एका चित्रातले सत्य तुम्हाला उमगेना, आणि ईश्वराचे सत्यस्वरूप शोधताय भोसडीच्यांनो?" म्हणत गुरूदेवांनी पुढले द्राक्ष तोंडात टाकले आणि ते चित्राकडे टक लावून पहात राहिले!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4956
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति. हेही त्या गुरूमहाराजांस विदित नाही! :-( -गा.पै.

__/\__ येक नंबर!! मजा आ गया!!!! tt

त्यावेळी पण असली चित्र मिळायची काय?

गुरुजींच्या शेवटच्या वाक्याने , कथा एका उंचीवरुन खाली आपटली.

पण शेवटलं वाक्य एडिट केलं ते लैच मस्त!!