Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन

Published on सोमवार, 30/01/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
a "चवचाल आहे झालं" श्यामल काकू करवादल्या "खरेच सासरच्यांनी बळजबरी केली की हीच गेली होती मागे राम जाणे" शांता मावशी उद्गारली "देहाची भूक चुकत नाही श्यामल. तरुण आहे आपली कुसुम अजुन" दुर्गा आज्जी मुलीला समजावु लागल्या. "भोळी आहे गं कुसुम" वसंतराव कळवळुन म्हणाले. "भोळी कसली? प्रत्येक वेळेस् नोटा बर्या सापडतात तिच्या हातात?" इति श्यामल काकू. इकडे लग्नाच्या रात्रीच विधवा झालेली कुसुम मात्र हातातल्या बाहुलीशी बोलत होती "बाटलीचा आकार कसा वाढत जातो ना ठमे? मला तर बाई गंमतच वाटते. आपल्याकडे नाहित नाही असल्या बाटल्या? रमेश भाऊजी, मामंजी आणि सुरेश काका दुष्ट जादूगार असतील का गं? म्हणूनच सगळे जण इतके चिडले असतील का?"
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4425
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

देहाची भूक भागत नाही वगैरे वाक्यांवरुन कुसुम मोठी आहे असं सूचित होतंय. तरीपण ती बाहुलीशी खेळते आणि तिला ते ज्ञान नाही?! हा बालविवाह होता असं स्पष्ट झालं असतं तर ही नक्कीच चांगली कथा बनली असती.

In reply to by आंबट गोड

बाटलीचा आकार कसा वाढत जातो ना ठमे?
सासं, हे वाक्य आप्य निय्मवलीत ( Rule no.9) madhye बसते वाटतं.

बाटलीचा अर्थ ज्यांना कळला नसेल ते मराठी शाळेत शिकलेले नसावेत.

खुपच शंका आहेत.. ती मुलगी लहान आहे की नाहीये? बरं धक्का बसुन डोक्यावर परिणाम झालाय म्हणावं तर बाकीच्यांच्या बोलण्यातुन तर तसं वाटत नाही. बाटलीचा अर्थ मला वाटतोय तोच असेल तर मग ती मुलगी ज्या परिस्थितीतुन गेली आहे, ते पहाता ती इतकं बालीश बोलणार नाही हे नक्की. शिवाय पैशाचं काय नक्की? कुठुन आलेल्या नोटा? सॉरी.. पण नाही जमली कथा..

कथेत दुवे नीट पेरले असते तर भारी अंगावर येणारी झाली असती

कृपया लेखकाने या कथेचा अर्थ उलगडून सांगावा. मला वाटतोय तोच अर्थ असेल तर, ही कथा माझ्या मते एक मास्टरपीस आहे.