निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज
In reply to अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती by पुंबा
भाजपात उत्तर प्रदेश जिंकू शकेल असा एकही नेता नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे.हो. नव्यांपैकी उत्तर प्रदेशात नेता म्हणून पुढे करता येईल असा एकही चेहरा भाजपकडे नाही. केशवप्रसाद मौर्य त्यांच्या नावावर निवडणुक जिंकून देऊ शकतील अशी स्थिती नाही. माजी प्रदेशाध्यक्षांपैकी लक्ष्मीकांत वाजपेयी, कलराज मिश्रा हे वृध्द झाले आहेत. कल्याणसिंगही वृध्द झाले आहेत आणि सध्या राजस्थानात राजभवनात त्या मानाने आरामाचे पद भूषवत आहेत. प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजप मोदींवर अवलंबून राहू शकत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावावर मते मागणे समजू शकतो पण महापालिका निवडणुकांपासून सगळ्या निवडणुकांमध्ये मोदींचे नाव कसे चालेल? जर पक्षातला कोणताच नेता तेवढ्या ताकदीचा नसेल तर निदान दुसर्या पक्षातला चांगला नेता तरी आयात करायचा-- जसा आसामात सरबानंद सोनोवालांना आयात केले. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात आयात तरी कोणाला करायचे हा पण प्रश्नच आहे :(
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to ++११ by पुंबा
In reply to या सर्व चर्चा by arunjoshi123
In reply to उत्तर प्रदेशच्या १९९१ पासूनच्या राजकारणाचा आढावा by गॅरी ट्रुमन
त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड चळवळीचे नेते पेरीयार रामस्वामी नायकर यांची जयंती मायावतींच्या उत्तर प्रदेश सरकारने साजरी केली. या नायकरांनी राम म्हणजे उत्तरेतील आर्य संस्कृतीचे प्रतिक आणि रावण म्हणजे दक्षिणेतील द्रविड संस्कृतीचे प्रतिक इत्यादी म्हणून रामावर जोरदार टिका केली होती.पेरियार, EV Ramaswamy यांची दोन वाक्यात बोळवण थोडी अन्फेअर आहे. पण धाग्याचा तो विषय नाही सो बरोबर आहे. इछ्छुकांसाठी ही अजून माहिती. पेरियार हे द्रविड चळवळीचे अध्वर्यु म्हणता येतील. टोकाचे हिंदी विरोधी, ब्राह्मण्य विरोधी व्यक्तिमत्व. जाती विरोधी काम खूप. सामाजिक न्याय, जातिविरोध(पण त्याच वेळेला एका जातिचा पराकोटीचा द्वेष करणारे), स्त्री मुक्ती, बुद्धीप्रामाण्यवाद आणि नास्तिकता यांच्या आधारावर द्रविड चळवळ उभी केली. आंबेडकरांइतके मोठे. सेल्फ रिस्पेक्ट चळ्वळ सुरू करणारे. द्रमुक सुरू करणारे अण्णादुराई यांचे शिष्य. (निवडणुक राजकारणात शिरायचं का नाही यावरून मतभेद होऊन अण्णादुराईंनी द्रमुक स्थापन केला. त्यातून पुढे करुणानिधी, एम्जीआर वगैरे मांदियाळी) अधिक माहिती. https://en.wikipedia.org/wiki/Periyar_E._V._Ramasamy सो मुद्दा हा की केवळ राम हा परका मांडणारे पेरियार ही ओळख अपुरी आहे. बसपाला ते जवळचे (आणि वरील केसमध्ये सोयिस्कर) वाटण्याचे कारण त्यांचा राम विरोध अधिक जातिव्यवस्थेविरोधात लढ्यात पेरियार या नावाला असलेलं वजन असं दुहेरी आहे.
In reply to त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड by अनुप ढेरे
In reply to त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड by अनुप ढेरे
In reply to पेरियार वैगेरे मंडळी by arunjoshi123
In reply to आर्यन इन्व्हेजन थेअरी आत्ता by फेदरवेट साहेब
In reply to आर्यन इन्वेजन थेरी हा by arunjoshi123
In reply to अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी by पुंबा
In reply to ती थेरी खोटी असल्याचा कोणताही by arunjoshi123
In reply to अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी by पुंबा
In reply to आर्यन इन्वेजन थेरी हा by arunjoshi123
In reply to ती मांडली तेव्हा मांडणार्या by फेदरवेट साहेब
नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन केले होते, असे साद्यांत पुरावे द्या कसे,खंडन जरी लगेच केलेले असले तरी पुरावे लगेच मिळणार नाहीत. मूळात ती थेरी मांडली देखिल "झटक्यात" नव्हती. एक झाड मांडलेले होते. त्यातली एक फांदी भारतात. त्यात (साला) आक्रमण अँगल हळूहळू टाकला गेला. मग तोच (फकस्त सोईचा म्हणून) फोफावला गेला. तुम्हाला पुरावे द्यायचे म्हणजे काय करायचं? मॅक्समूलरचे सगळे तत्त्वज्ञान आणि त्याला झालेला एतद्देशीय विरोध वाचा. मोप झालं. ================
ब्राह्मण जात "सर्वात प्रखर देशभक्त" होती हे कसे ठरले ?हे झालं की तिकडे चर्चून =========================
लेखक आपले लाडके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, अन ते पुस्तक आर्य बाहेरचे ह्या आधारावरच बेतलेले आहे, त्यात मूळ आर्यस्थान, सोमवल्ली म्हणजे नेमके कुठले झाड वगैरेवर उहापोह आहे, तेव्हा आता १. लोकमान्य टिळक देशभक्त नव्हते का?जगातली सगळी शाळेत जाणारी मुले आपल्या सौ. ल्यूसीबाई इथिओपिआवाले या आपल्या आद्यमाता आहेत असे मानतात. टिळकांनी जसा कायनू बायनू अभ्यास केला तसा मानववंशशास्त्रज्ञांनी देखिल केला आणि दोघे ही आपापल्या निश्कर्षाप्रत आले आहेत. आता आद्यमाता इथिओपिआवासिनी आहेत असे मानणारी मुले जर देशभक्त असतील तर टिळक आहेत, नैतर नाही. (माझा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय नाही, नैतर मी विचारून सांगीतलं असतं.) ========================
२. लोकमान्य टिळक सर्वात प्रखर देशभक्त जातीचे नव्हते का?(बाहेरून आलेले देशभक्त नसतात असं मी कुठं टाइप करून बसलोय की काय?) अहो बाहेरून या नैतर अजून कुठून या, काय फरक पडत नाही. पारशी, ज्यू, मुस्लिम बाहेरून आलेत आणि कट्टर देशप्रेमी आहेत हे मी पाहतच आहे. प्रश्न आक्रमण थेरीचा आहे. आक्रमण करणे, अर्धा उपखंड विस्थापित करणे, अर्धा गुलामच नव्हे तर कायमचा (४००० वर्षे, इ) बुद्धिभ्रष्ट करणे, बाटवणे (न म्हणावे अतिशूद्र सोडून देणे, बाटवणे म्हणावे तर स्वतःला अल्पसंख्यच ठेवणे), इ इ वर बोलणे चालले आहे. ============== टिळक आणि तत्सम बरेच लोक इंग्रजी काव्याचे शिकार मात्र होते. भारतातली फांदी कापायला जगातले झाड कापणे टिळकांच्या सामर्थ्यापलिकडचे होते. म्हणून त्यांनी काळाचा महिमा म्हणून थेरी स्वीकारली असावी.
In reply to नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन by arunjoshi123
In reply to म्हणून त्यांनी काळाचा महिमा by फेदरवेट साहेब
In reply to पेरियार वैगेरे मंडळी by arunjoshi123
पेरियार वैगेरे मंडळी देशद्रोही होती. त्यांना दक्षिण भारत हा वेगळा देश पाहिजे होता.भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्याच चळवळी होत्या. पेरीयार रामस्वामी नायकर हे द्रविड चळवळीचे पितामह होते. त्यातूनच जन्माला आलेल्या डीएमके पक्षाचीही मागणी (सुरवातीच्या काळात) त्याच स्वरूपाची होती.पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. उत्तरपूर्व भारतातील फुटिरतावादी चळवळीच्या नेत्यांनीही आपली फुटून निघायची मागणी सोडून दिल्यावर ते मुख्य प्रवाहात आले. लालडेंगासारखे मिझोरामचे मुख्यमंत्रीही झाले. तेव्हा पूर्वीच्या काळी कधीतरी फुटून निघायची मागणी केली होती हे आयुष्यभर देशद्रोही असल्याचा शिक्का कपाळावर वागवावा लागण्यासाठी पुरेसे आहे का? जर का काही दहशतवादी कृत्ये केली असतील तर जरूर कारवाई करावी. पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?
या कर्मठ नास्तिकाचे सारे तत्त्वज्ञान आता कचर्यात निघालेल्या आर्यन इन्व्हेजन थेरीवर आधारित होते.आपल्या परंपरेप्रमाणे कर्मठ अस्तिक असणे आणि कर्मठ नास्तिक असणे या दोन्ही गोष्टी तितक्याच मान्य करता येण्याजोग्या आहेत. त्यामुळे ते कर्मठ नास्तिक होते हे आक्षेप घेण्यायोग्य कारण असू नये. शेवटी नास्तिकांनाही आपल्या परंपरेत स्थान आहेच. दुसरे म्हणजे त्यावेळी जरी आर्यन इन्व्हेजन थिअरी खोटी आहे हे सिध्द झाले असले तरी कोणाला ती खरी आहेच असे म्हणून आपली मते मांडायची असतील तर त्याकडे 'तो वेडा आहे' असे म्हणून दुर्लक्ष करणेच सर्वात श्रेयस्कर नाही का? समजा आज कोणी सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो असे गृहित धरून अशी कोणती मांडणी केली तर त्याला 'ठार वेडा' सोडून दुसरे काय म्हणणार?
In reply to दोन मुद्दे by गॅरी ट्रुमन
भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्याच चळवळी होत्या.संस्थाने म्हणजे वैचारिक लोकांच्या चळवळी नव्हे हो! आणि मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.
की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते.जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.
पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?मूळ प्रवाहात येऊन फार कै उपकार नै केले. एकतर तर दाक्षिणात्य राज्ये कधीच भारत बाह्य संस्कृतीची नव्हती. या लोकांनी शुद्ध ब्राह्मणद्वेषापोटी तसा हंगामा उभा केला. शंभरदा खोटं बोलायचं!! यांच्यामुळे हिंदी भारताची राष्ट्रभाषा झाली नाही आणि स्थानिक लोकांना ज्ञान आणि सत्त्तेतून बाहेर ठेवले गेले. आजही ब्रह्मद्वेषाचे वीष तामिळनाडूत संहत आहे. यात वैचारिक देखिल काही नाही. चार दक्षिणेतल्या राक्यातले ब्राह्मण उत्तरेचे एजंट! काहीही? खाज थांबल्यावर ती होत होती तेव्हाची स्थिती वाइट ती वाइटच.
In reply to भारतातून फुटून निघावे अशी by arunjoshi123
मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.मिझोरामची केस जेन्युईन होती आणि तामिळनाडूची केस जेन्युईन नव्हती हे तुमच्या दृष्टीने विचार केला तर. अशा चळवळी करणार्या प्रत्येकाला आपली केस जेन्युईन आहे असेच वाटत असते.
जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.स्वतंत्र द्रविड राष्ट्र व्हावे अशी पेरियार रामस्वामी नायकरांची मागणी होती. एका अर्थी जीनांच्या स्वतंत्र पाकिस्तान व्हावी या समकक्ष मागणीमुळे पेरियारांनी जीनांबरोबर हातमिळवणी केली होती. पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही. दुसरे म्हणजे जीनांचे समर्थन म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन हा अर्थ मी घेतो. स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारे सगळेच देशद्रोही का? अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का? बरं त्रावणकोरचे दिवाण सी.पी.रामस्वामी अय्यर यांचे काय? त्रावणकोर संस्थानच्या राजाने १९४७ मध्ये संस्थान स्वतंत्र देश होईल असे जाहिर केले होते त्यावेळी सी.पी.रामस्वामी अय्यर यांनी जिन्नांशीही बोलणी केलीच होती. लोकमान्य टिळकांच्या वेळी पाकिस्तानची संकल्पना अर्थातच लोकप्रिय झाली नव्हती.पण त्यांनी लखनौ करार करून मुस्लीम लीगच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे सर्वमान्य आहे. त्यांचे काय? लाला लजपत रायांचे काय? ते सगळेही देशद्रोहीच का?
In reply to जेन्युईन केस by गॅरी ट्रुमन
हे तुमच्या दृष्टीने विचार केला तरअहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते? काय तरीच काय?
पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही.१. कास्मिरात एक नेता आहे. तो त्याच्यामते हिंसाचारवादी नाही पण भारतविरोधी आहे. असले गांधी जास्त डेंजर नाही का? तो विषय नाही. २. दक्षिणेत दक्षिण पाकिस्तान नव्हता. आणि लीगची ज्या निजामाला सहानुभूती होती तो आंध्रच द्रविडस्तान मधे हवा होता या लोकांना. शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता. प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.
अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का?हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे. अविभाजित भारताकडे पाहू. भारतात राहिलेल्या आणि पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांत काय फरक आहे? म्हणजे १९४७ मधे होता? बलोच, पंजाब, सिंध, पूर्ब बंगाल इथे राहणारे मुस्लिम कमी भारत प्रेमी आणि उत्तर प्रदेश आणि आंध्रचे जास्त देशप्रेमी असा हिशेब होता कि काय? जे लोक पाकिस्तानात गेलेल्या घाणीपासून आपण बचावलो असे विचार करतात ते आज देशात असलेल्या मुस्लिमांशी देखिल गद्दार आहेत असा सरळ अर्थ निघतो. उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही. काँग्रेसने देश तोडला नि उपकार झाले म्हणणारे बरेच आहेत. पण लोक विसरतात कि "पाकिस्तानी तालिबान्यांचे (ही जगातली सर्वात हाय टर्बिडीटीची घाण)"आजोबा पणजोबा "पूर्व पाकिस्तान असू शकतो तर पश्चिम भारत का नाही?" असे म्हणत. बाय द वे , घाण गेली नाही, ती उराशीच आहे आणि सुसज्ज आणि सशस्त्र आहे. तेच जे मुसलमान भारतात आहेत ते कूल आहेत. त्यांना कोनतेही वाईट डोहाळे लागलेले नाहीत. ही पाकी घाण (?) गेली नसती तर भारतात चार पंतप्रधान मुसलमान झाले असते, आणि विश्वशांती राहिली असती. असो. ============ रामस्वामी अय्यर नक्कीच देशद्रोही आहेत. ============== लखनौ करारात काय राष्ट्रद्रोही मला आढळ्ललं नाही.
In reply to हे तुमच्या दृष्टीने विचार by arunjoshi123
अहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते?तुम्ही मिझोरामची केस जेन्युईन होती असे म्हटले आहेत. जर द्रविड लोक उत्तर भारतात खूप ब्राह्मण आहेत हे त्यांच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्याचे कारण मानत होते तर मिझोरामचे लोकही भारताच्या इतर भागातील लोक आपल्या वंशाचे नाहीत म्हणून आम्ही भारतीय नाही हे एक कारण मानत होते. जर मिझो लोकांचे बरोबर असेल तर द्रविड लोकांचे काय चुकले?
शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता.नक्की?
प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.का बरं? अयोध्येच्या शुजाच्या पदरी हिंदू सैनिक होते ते पानिपतमध्ये मराठ्यांविरूध्द अब्दालीच्या बाजूने लढले होते. राजा मानसिंग अकबराच्या बाजूने राणा प्रतापविरूध्द लढला होता इत्यादी इत्यादी.... हिंदूंमधील दुही ही शतकानुशतकांपासून चालत आलेली आहे म्हणूनच परकीयांचे राज्य आपल्यावर होऊ शकले.
उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही.अजिबात नाही. पाकिस्तान होऊन घाण गेली असे म्हणायचे कारण हे की त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे काहीही करण्यासाठी १९४७ म्हणजे खूप उशीर झाला होता. जर रामपूर, अमरोहा, देवबंद येथील पाकिस्तानशी सहानुभूती बाळगणारे लोक जर पाकिस्तानात चालते झाले तर नक्कीच घाण गेली असे म्हणू पण जर त्यांना वेगळा उत्तर पाकिस्तान हवा असेल तर मात्र ते नक्कीच चालायचे नाही. त्यांना अगदी दयामाया न दाखवता निर्दयपणे ठोकून काढले पाहिजे. पश्चिम उत्तर प्रदेशात (आणि कदाचित बंगालमध्ये) अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे परिस्थिती अजूनही सांभाळता येऊ शकेल.पण पश्चिम पंजाब इत्यादी भागात १९४७ मध्ये तसे नव्हते. इट वॉज टू लेट. जे पश्चिम पंजाबमध्ये झाले तेच बंगाल, आसाम आणि इतर ठिकाणी होऊ द्यायचे की नाही हे आपल्याच हातात आहे.
हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे.उठल्यासुटल्या सगळ्यांना देशद्रोही म्हटल्यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर देशद्रोही हा शब्द अगदीच बुळबुळीत बनून जातो.आणि दुसरे म्हणजे या कारणामुळे राष्ट्रवादाचे समर्थक स्वतःला हास्यास्पद बनवितात. जर का आता म्हणजे २०१७ मध्ये जर कोणी वेगळा देश वगैरे मागत असेल तर तो नक्कीच देशद्रोह झाला.पण आजच्या काळाचे परिमाण आपण १९४७ च्या परिस्थितीशी लावू शकत नाही. सी.पी.रामस्वामी अय्यरटाईप लोकांना स्वतंत्र देश हवा होता म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतील हे पूर्णपणे उलगडले होते का?की ब्रिटिश राजवटीत संस्थानिकांना त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत स्वातंत्र्य होते तशाटाईपचे स्वातंत्र्य १९४७ नंतरही आपल्याला उपभोगायला मिळेल अशी त्यांची कल्पना होती?तसे असेल, त्यांना या मागणीचे नक्की परिणाम काय होतील हे त्यावेळी जाणवले नसेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या या मागण्यांमुळे हिंसा झाली नसेल आणि सरदार पटेलांनी दांडुका हातात घेतल्यानंतर का होईना त्यांना आपली चूक उमगली असेल आणि ते मेनस्ट्रीममध्ये आले असतील तर अशांना देशद्रोही मानणे अयोग्य आहे असे मला वाटते. हैद्राबादचा निजाम मात्र याला अपवाद आहे. एकतर त्याच्या रझाकारांनी हिंदूंवर अत्याचार केले होते आणि १९४७-४८ मध्येच हैद्राबादचा प्रश्न यु.एन मध्येही नेला गेला होता. असे काही इतर संस्थानिकांनी केले होते का? मग सगळ्यांना एकजात देशद्रोही असे लेबल चिकटवले तर त्या लेबलची किंमत कमी होईल.
In reply to का? by गॅरी ट्रुमन
In reply to पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
In reply to अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता by पुंबा
In reply to आआप आणि पंजाब by गामा पैलवान
In reply to आआप आणि पंजाब by गामा पैलवान
In reply to अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता by पुंबा
In reply to पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार by गॅरी ट्रुमन
In reply to पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी? by arunjoshi123
In reply to लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक by पुंबा
In reply to +१ by फेदरवेट साहेब
In reply to पुरवणी प्रतिसाद by फेदरवेट साहेब
In reply to पुरवणी प्रतिसाद by फेदरवेट साहेब
In reply to लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक by पुंबा
In reply to अकाली दलाचे कित्येक आमदार? आम by arunjoshi123
In reply to बरं.. ईडी चौकशी करतच आहे, by पुंबा
K S Makhan and Jagsir Sidhu are not the only leaders who have been summoned by the ED. Earlier the cabinet minister and brother-in-law of deputy chief minister Sukhbir Badal was also summoned.संदर्भः इंडीया टुडे
In reply to मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू by पुंबा
In reply to आगा बयो, म्हणून पंजाबात by arunjoshi123
In reply to अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय. by पुंबा
अनेक पाहण्यांनुसार, सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये ड्रगची समस्या अतिशय उग्र आहे.नाही हो. आकडे कळत नाहीत का तुम्हाला?
सारा भारत काँग्रेसमुक्त व्हावा आणि सगळीकडे भाजपच सत्तेवर यावा असले काही मत नसल्याने मी प्रत्येक केसचा स्वतंत्र विचार करू शकतो.हे चांगलं आहे.
In reply to जो पक्ष आपल्या एका राज्याला by arunjoshi123
In reply to ब्वार्र...जगातलं सग्गळ्ळं by पुंबा
अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती