मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोलंबीचे हुमण

प्रभाकर पेठकर · · पाककृती
साहित्यः सोललेली कोलंबी : १ वाटी खवलेला नारळ : १ वाटी काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग हळद : १/२ चमचा चिंच : लिंबाएवढी तिरफळं :१०-१२ मीठ : चवीनुसार खोबरेल तेल : ३ टेबलस्पून कृती: कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे. काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात. खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा. पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे. त्यातच कोलंबी घालून पातेले गॅसवर ठेवावे आणि उकळी आणावी. कोलंबी शिजली की वरून ३ टेबलस्पून खोबरेल तेल घालावे.पुन्हा एक दणदणीत उकळी काढून गॅस बंद करावा. किंचित मुरल्यावर भातावर वाढावे. शुभेच्छा..! टीपः कोलंबी लवकर शिजतात. जास्त शिजल्यास रबरासारख्या होतात. कमी शिजल्यास पचत नाहीत. त्यामुळे फक्त व्यवस्थित शिजवाव्यात. थोडा वेगळेपणा आणण्यासाठी, (वरील प्रमाणास), २ टेबलस्पून खोबरेल तेलावर ८-१० काळे मिरे परतावेत. त्यावर २ बारीक चिरलेले कांदे लालसर रंगावर परतून घ्यावेत. कांदे परतले की ओला नारळ लालसर परतून घ्यावा. ह्याचे वाटण बनवावे बाकी कृती वरील प्रमाणेच करावी. अशा पद्धतीनेही 'हुमण' बनवितात. कोलबी प्रमाणेच सुरमई, बांगडे, तारली ह्याचे 'हुमण'ही असेच करतात.

वाचने 11596 वाचनखूण प्रतिक्रिया 48

In reply to by स्मिता श्रीपाद

धन्यवाद. काश्मीरी मिरच्या जेवढ्या बारीक दळाव्यात तेवढा पदार्थाला रंग 'चढतो'. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by विंजिनेर

नाही. ह्यात कुठलाही गरम मसाला नाही. पण 'वेगळेपणासाठी' दिलेल्या पद्धतीत काळीमिरी आहे ती सुद्धा वाटणात वाटली जाते. आख्खी राहात नाही. खोबरेल तेलाने चव चांगली येते. खोबरेल तेल घेताना 'एडीबल' तेल शोधावे. दुसरे तेल वापरल्यास चालेल पण चव बदलेल. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसोबा खेचर 16/02/2009 - 17:06
हारलो, मातीस मिळालो, गर्दीस मिळालो, वारलो, संपलो, निवर्तलो, खुदाला प्यारा झालो, देवाघरी गेलो...! जबरा पाकृ, जबरा फोटू....! अरे प्रभाकरा, का असा सूड घेतलास? का असा पाठीत खंजीर खुपसलास?? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुण्यात येता आणि फोनही करत नाही नं? भोगा आपल्या कर्माची फळं. पुढच्या वेळी यायच्या आधी कळवा. मस्त पार्टी करू. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुनील 16/02/2009 - 17:28
पण लईच लाल दिस्तय हो हे हा लालपणा काश्मिरी मिरच्यांचा. नुसत्याच लालभडक पण तिखटपणा फारसा नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by प्रकाश घाटपांडे

इतर गरम मसाला नसल्यामुळे काश्मीरी मिरच्या जरा जास्त आहेत. पण 'त्रास' होत नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 16/02/2009 - 17:26
पोळी चुरुन खाईन रश्श्यात ! आणि पीस नंतर...!!! अत्यंत रसिकतेने दिलेला बोलका प्रतिसाद! जियो..! :) आपला, तात्याभैय्या देवासकर, इंदौर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विंजिनेर 16/02/2009 - 17:27
माझ्या मते हा प्रकार भाता-बरोबर ("गुरगुट्या" !) खाण्यालायक आहे. पोळी बरोबर चालेल पण "मझा" येणार नाही. :)

In reply to by विंजिनेर

हा रस्सा भातावर आणि डोळे बंद करून तल्लीनतेने 'ओरपण्यासाठी' मस्तच आहे. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

लवंगी 17/02/2009 - 20:28
फार छान लागेल हा रस्सा.. काका तोंडाला पाणी सुटलय.. अहो अश्या पाकक्रुती दिल्या तर वजन कमी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिल की हो!!

In reply to by लवंगी

रंगावर जाऊ नका. पावाबरोबर मजा येईल असे वाटत नाही. त्या साठी मिसळीचा झणझणीत कटच पाहिजे. हा रस्सा चविष्ट होतो पण तितका झणझणीत होत नाही. असो. अश्या पाकक्रुती दिल्या तर वजन कमी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिल की हो!! तेवढे बाकी खरे. माझ्या फसलेल्या अनेक संकल्पांपैकी 'ह्या वर्षी वजन कमी करायचेच' हा मुख्य संकल्प, ह्या अशा रेशिप्यांनीच, पार ढेपाळला आहे. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन 16/02/2009 - 17:33
पाककृती सोपी आहे... व मी नक्की करुन बघेन. * तळटिप : जर वाचलो तर सांगेन नक्की ... कशी तयार झाली होती ती :D

In reply to by दशानन

नाही वाचलात तरी मृत्यूपत्रात माझ्यासाठी चाबूकाचे ४ फटके लिहून ठेवण्याइतका अवधी नक्कीच लाभेल. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

रेवती 16/02/2009 - 17:53
आपण जर अश्या प्रकारच्या पाकृ देत राहिलात तर शाकाहारींना (माझ्यासारख्या) मत्स्याहारी व्हावच लागेल. फोटू फारच छान आलाय. पाकृबद्दल धन्यवाद! रेवती

In reply to by रेवती

झालात तर उत्तम. माझे तरी पहिले प्रेम 'मासे' हेच आहे. पण काळजी नसावी. काही शाकाहारी पाकृही देईनच. जन्माने मीही शाकाहारीच आहे. पण 'कर्माने' त्या व्रतापासून दूर नेले. असो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

सहज 16/02/2009 - 17:50
त्या रश्श्यासाठी केला पाहीजे. अफलातुन दिसतो आहे रस्सा!

In reply to by सहज

त्याचे गुपित आहे, वस्त्रगाळ काश्मीरी तिखट. काही जास्त कौशल्य लागत नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

शाल्मली 16/02/2009 - 18:26
पेठकर काका, हे काही बरोबर नाही.. आमच्या सारख्या शाकाहारींनी काय करायचं? आता लवकरात लवकर एखादी शाकाहारी पाकृ. टाका. :) फोटो एकदम मस्त आलाय. --शाल्मली.

प्राजु 16/02/2009 - 19:54
आता दिवसभर नुस्ती या हुमणाचीच आठवण येणार. मस्त रंग.. खत्तरनाक! कोलंबी च्या ऐवजी चिकन घालता येते का? (सध्या मी तेवढेच करू शकते .... बर्‍या पैकी) :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कोलंबी च्या ऐवजी चिकन घालता येते का? अजिबात नाही. चिकनला जरा चरचरीत मसाले लागतात. ह्या पाकृत कोंबडी बसत नाही. कोंबडीसाठी एखादी वेगळी पाकृ देईन यथावकाश. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

विसुनाना 17/02/2009 - 12:36
तुमच्या हातचे कोळमीचे नायतर सुरमईचे हुमण खायला नक्की येईन. :) मालवणी सुरमईची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. तिथेच असतो तर कायमची संध्याकाळची मेस लावली असती.

In reply to by विसुनाना

धन्यवाद विसूनाना. एक दिवस आधी फोन करून या. इच्छा भोजनाने तुमची फुल्ल सरबराई करू. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नाटक्या 17/02/2009 - 12:48
आज करून पाहीली. झकासच झाली. क्या बात है काका. आता पुण्याला येवू तेव्हा आणखी काही काही शिकून जावू.. जाणिजे 'यज्ञकर्म'... - नाटक्या

In reply to by नाटक्या

धन्यवाद श्री. नाटक्या. अशी खवय्ये मंडळी भेटली की नवनविन पाकृंसाठी हुरूप येतो. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by नाटक्या

पण त्या साल्या डॉक्टरांना बघवत नाही नं!!! जे आवडतं तेच खाऊ नका सांगताहेत ..... दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

नाटक्या 18/02/2009 - 23:20
माझी आजी ९४ वर्षांची आहे. अगदी ठणठणीत आहे (३२ दातांसकट). नियमित योगासनं/फिरणे हे चालू असते. खाण्यापिण्या बाबत कसलीही पथ्य पाळत नाही. तिला जर कधी काही कारणाने डॉक्टरकडे जावे लागले तर बर्‍याचदा डॉक्टर सांगायचे की हे खावू नका, अमकेच खा, अमुक गोळ्या घ्या, तमुक व्हिट्यामिन्स घ्या म्हणून. एकदा तिने एका डॉक्टरला न राहवून सुनावले 'हे पहा डॉक्टर मला आता पर्यंत जितक्या डॉ़क्टरांनी ह्या गोळ्या-फिळ्या घ्यायला सांगीतल्यात आणि ही पथ्य पाळायला सांगीतलीत ना त्या सगंळ्यांच्या अंत्यदर्शनाला मी गेले आहे'. तो डॉक्टर आडवा व्हायचा बाकी होता.

In reply to by नाटक्या

लिखाळ 20/02/2009 - 20:54
>>'हे पहा डॉक्टर मला आता पर्यंत जितक्या डॉ़क्टरांनी ह्या गोळ्या-फिळ्या घ्यायला सांगीतल्यात आणि ही पथ्य पाळायला सांगीतलीत ना त्या सगंळ्यांच्या अंत्यदर्शनाला मी गेले आहे'. टाळ्या टाळ्या .. फार मस्त उत्तर ! :) पेठकरकाकांनी सुचवलेले उत्तमोत्तम पदार्थ खाउन आपण सुद्धा सगळे असेच आरोग्य संपन्न होवुया :) -- लिखाळ.

वल्लरी 17/02/2009 - 13:06
तो रस्सा बघुनच तोंडाला पाणि सुट्ले आहे काका... :) नक्की करुन बघेन नी कळवेन तुम्हाला... ---वल्लरी

In reply to by वल्लरी

येस्स वल्लरी. तो रंग, ती चव आणि ते मासे. तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे.... दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

चतुरंग 17/02/2009 - 18:21
काय रंग, काय दिमाख!! खल्लास!!! (मला तर स्क्रीनमधून सुद्धा रश्याचा वास आला! ;) ) हे मांसाहारी आहे म्हणून मी तुम्हाला अजिबात सोडाणार नाहीये पेठकर काका!! पुण्याच्या पुढच्या ट्रिपचे दिवस नक्की झाले की तुमच्या कॅलेंडरमधे आमच्यासाठी दिवस राखून ठेवायला लावणार आहे. तुमच्या शाकाहारी पदार्थांनी भारतवारी संस्मरणीय करणार आहे!! :) =P~ =P~ चतुरंग

In reply to by चतुरंग

काळजी नको चतुरंग राव. मजा करू. अदमासे कधी आहे पुण्याचीवारी? दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

चित्रा 18/02/2009 - 18:29
फोटो पाहूनच आज जेवणात काय करायचे, हा प्रश्न सुटला. मस्त.

शिवापा 20/02/2009 - 19:11
शुक्रवार आहे. लवकर निघतो. जाता जाता कोलंबी उचलतो. सोबतीला बीअर (त्याला मराठित काय म्हणतात?) छोटिशि वॅकेशनच होइल म्हणा ना.

पेठकरकाका, गेले कित्येक दिवस हा फोटू बघतोय पण प्रतिक्रिया द्यायची राहून जातीय. कळेना हे पाप कसे घडले ? !!! पाकृ वापरून पाहिली की कळवीनच. (मागच्या वर्षीच्या पुणे दौर्‍यात 'यज्ञकर्म'ला भेट न दिल्याची टोचणी जास्तच तीव्र झालीय आता !!) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com