निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज
प्रतिक्रिया
In reply to पार्टी सिम्बॉल सायकल by अनुप ढेरे
In reply to मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार by गॅरी ट्रुमन
In reply to बरोबर! पण बहुधा अंतर्गत by अनुप ढेरे
मायावती-अखिलेशच्या तोडीचा, जो निर्विवाद नेता असेल पार्टीचा असा कोणीही भाजपाकडे नाही. सो एकाला केला उमेदवार तर दुसरा फॅक्षन जाईल/विरोधी कारवाया करेल ही भीती असावी.या प्रकारात भाजपचे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. १९९८-९९ मध्ये कल्याणसिंग त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पात्रता नसली तरी पुढे आणत होते आणि त्यांच्या इतर प्रकारांमुळे पक्षाचे नुकसान होत होते हे केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आले नव्हते असे नाही. तरीही कल्याणसिंगांना मुख्यमंत्रीपदावरून काढले तर पुढे कोणाला करायचे हा प्रश्न होताच. त्याचे उत्तर न मिळाल्यामुळे १९९९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीही कल्याणसिंगच मुख्यमंत्रीपदी होते. त्यातून झाले असे की १९९९ मध्ये वाजपेयींच्या नावाने पक्षाला चांगली मते इतर राज्यांमध्ये मिळाली असली तरी उत्तर प्रदेशात मात्र ८५ पैकी २९ जागा अशी निराशाजनक कामगिरी पक्षाची झाली. (१९९८ मध्ये पक्षाने ८५ पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या). लोकसभा निवडणुकांनंतर कल्याणसिंगांना पदावरून हटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही तेव्हा दिवाळीच्या वेळी त्यांना हटविले खरे. पण त्यावेळीही राज्यात राजनाथसिंग, लालजी टंडन, कलराज मिश्रा इत्यादी नेत्यांचे गट होते आणि कुणालाही मुख्यमंत्री केले असते तरी इतर सगळे नाराज झाले असते. अशावेळी विजनवासात गेलेल्या रामप्रकाश गुप्तांना वाजपेयींनी मुख्यमंत्रीपदी आणून बसविले. रामप्रकाश गुप्ता १९६७ मध्ये चरणसिंगांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ३० वर्षात त्यांचे नाव कोणीही ऐकलेले नव्हते आणि अचानक त्यांना वाजपेयींनी मुख्यमंत्रीपदावर आणून बसविले. १९९९-२००० मध्ये रामप्रकाश गुप्ता मुख्यमंत्री असताना भाजपची अवस्था खरोखरच वाईट होती. स्वतः गुप्ता लोकांसाठी काहीतरी करावे ही चांगली भावना असलेले होते. पण राजकारणात, विशेषतः उत्तर प्रदेशच्या राजकारणात लागणारा बेरकीपणा त्यांच्याकडे अजिबात नव्हता. प्रशासनावर त्यांची पकड नव्हती की विविध समाजघटकांना एकत्र न्यायची क्षमता नव्हती. वास्तविकपणे मुख्यमंत्री विधानसभेचे सदस्य नसतील तर ते ६ महिन्यात विधानसभेची पोटनिवडणुक लढवून विधानसभेत जातात. पण रामप्रकाश गुप्ता निवडून येऊ शकतील असा एकही विधानसभा मतदारसंघ भाजपला सापडला नाही. त्यांनी पोटनिवडणुक लढवली असती आणि त्यांचा पराभव झाला असता (त्याहूनही वाईट ते तिसर्या नंबरला फेकले गेले असते) तर ती मोठी नामुष्कीची गोष्ट झाली असती. तेव्हा पक्षाने त्यांना विधानपरिषदेत पाठवायचा सुरक्षित खेळ खेळला. रामप्रकाश गुप्ता १९६७ मध्ये उपमुख्यमंत्री असताना केंद्रात मोहन कुमारमंगलम हे इंदिरा गांधींच्या मर्जीतले नेते मंत्री होते. तर १९९९-२००० मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मोहन कुमारमंगलम यांचे पुत्र पी.रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. या रंगराजन कुमारमंगलम यांना रामप्रकाश गुप्ता यांनी---"मै १९६७ मै उपमुख्यमंत्री था तब आपही मंत्री थे ना?" असा प्रश्न एकदा नाही तर दोन-चार वेळा विचारला होता अशाही कहाण्या त्यावेळी पेपरात वाचल्याचे आठवते. तर हे रामप्रकाश गुप्ता असे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशची निवडणुक लढवली तर पक्ष चौथ्या क्रमांकावर जाईल अशी भिती पक्षाला वाटली. अशावेळी राजनाथ सिंगांना काहीसे अनिच्छेनेच केंद्रातून राज्यात मुख्यमंत्री म्हणून ऑक्टोबर २००० मध्ये पाठवले गेले. पक्षाची राज्यातील अवस्था बघून इतर गटही त्यावेळी शांत राहिले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तसेच कल्याणसिंगही पक्षाबाहेर गेल्यामुळे पक्षाचे आणखी नुकसान झाले होते. फेब्रुवारी २००२ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ८८ जागा जिंकून तिसरा क्रमांक मिळवला. राजनाथ नसते तर तितक्या जागा मिळणेही कठिण गेले असते. जर कल्याणसिंगांनंतर लगेच राजनाथसिंगांनाच मुख्यमंत्री केले असते तर इतकी घसरगुंडी टळली असती हे नक्कीच. या घसरगुंडीनंतर राज्यात पक्ष सावरला तो थेट २०१४ मधील मोदीलाटेत. अन्यथा या राज्यात भाजपचा आलेख खालीखालीच जात होता. मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही उमेदवार यावेळी जाहिर केलेला नाही त्यामागे हे एक कारण आहेच--इतर सगळे विरोध करतील. पण राजनाथसिंग सोडले तर मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचा चेहरा पुढे करायचा हा प्रश्न आहेच.
In reply to नुकसान by गॅरी ट्रुमन
In reply to इतके जुने संदर्भ तुमच्या by चिनार
समजा भाजप ला बहुमत मिळाले आणि राजनाथसिंग यांना परत मुख्यमंत्री करण्यात आले. तर हे त्यांचे डिमोशन समजावे का ?असे डिमोशन होणे बघणार्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. टॉप ४ मधील एखाद्या मंत्र्याने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून परत गेले तरी माझ्या मते ते डिमोशन नाही. कारण मोठ्या राज्याचा कारभार तसाच मोठा असतो.पण उद्या मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परत गेले तर त्यांचे ते डिमोशन असेल असे मला वाटते. गोवा राज्य सरकारच्या कारभारापेक्षा मुंबई महापालिकेचा कारभार जास्त मोठा आहे. तेव्हा अशा राज्यात टॉप ४ मधील मंत्री परत जाणे हे डिमोशन म्हणायला हरकत नसावी. पण काहींचे मन राज्याच्या राजकारणातच रमते. काहींना दिल्ली मानवत नाही. पर्रीकर अशांपैकी असतील तर तो त्यांचा निर्णय असेही म्हणायला हरकत नसावी.
खुद्द पवार साहेबसुद्धा केंद्रातून राज्यात परत आले आहेत.केंद्रीय मंत्री राज्यात मुख्यमंत्री म्हणून जाणे हे प्रकार पूर्वीही झाले होते. पण राजीव गांधींनी कधी केंद्रीय मंत्री तर कधी राज्यांचे मुख्यमंत्री हा प्रकार प्रचंड प्रमाणात केला. शंकरराव चव्हाण पहिल्यांदा राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री होते. नंतर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत आले आणि जून १९८८ मध्ये केंद्रात अर्थमंत्री म्हणून परत गेले. भजनलाल, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी, बन्सीलाल इत्यादी नेतेही असे तळ्यात मळ्यात बर्याचदा जाऊन आले-गेले होते. नरसिंह रावांनी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले त्याचप्रमाणे के.विजयभास्कर रेड्डींना आंध्र प्रदेशात तर ए.के.अॅन्टनींना केरळमध्ये मुख्यमंत्री म्हणून परत पाठवले होते. नवीन पटनाईकही ओरिसाचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
In reply to डिमोशन by गॅरी ट्रुमन
In reply to डिमोशन by गॅरी ट्रुमन
असे डिमोशन होणे बघणार्याच्या दृष्टीवर अवलंबून असते.सहमत ! पण माझ्या मते तरी उत्तर प्रदेश किंवा इतर कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री पदापेक्षा देशाचा गृहमंत्री हे पद नक्कीच मोठं आहे. अर्थात मोदींमुळे राजनाथ सिंग थोडे झाकोळले जातात हे खरे आहे. अश्या परिस्थितीत उत्तर प्रदेशच मुख्यमंत्री पद स्वीकारणं त्यांना जास्त योग्य वाटत असावं. पर्रीकरांचं किंवा इतर कोणाचं मन दिल्लीत रमत नाही म्हणून दुसरीकडे जाणं योग्य वाटत नाही. कारण पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री आहे. हा एकप्रकारे देशाच्या संरक्षणचा मांडलेला खेळचं म्हणावा लागेल. अश्या व्यक्तीला एवढं महत्वाचं पद देणं ही पक्ष नेतृत्वाची चूक म्हणावी का ? अर्थात या सगळ्या गोष्टी अजून घडलेल्या नाही. आणि घडतीलच असेही नाही.
In reply to असे डिमोशन होणे बघणार्याच्या by चिनार
पर्रीकरांचं किंवा इतर कोणाचं मन दिल्लीत रमत नाही म्हणून दुसरीकडे जाणं योग्य वाटत नाही. कारण पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री आहे. हा एकप्रकारे देशाच्या संरक्षणचा मांडलेला खेळचं म्हणावा लागेल. अश्या व्यक्तीला एवढं महत्वाचं पद देणं ही पक्ष नेतृत्वाची चूक म्हणावी का ?राज्यात आणि केंद्रात जबाबदारीचे पद भूषविणे हे नक्कीच वेगळे आहे. अनेकदा एखाद्याने राज्यात चांगले काम केले म्हणून केंद्रातही चांगले काम करतील म्हणून दिल्लीला बोलावून घेतले जाते पण हे स्थित्यंतर समजा व्यवस्थित निभावता आले नाही तर अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः ल्युटिन्स दिल्लीमधील बाबू लोक, मिडिया इत्यादी सगळे वातावरण राज्यांपेक्षा नक्कीच वेगळे असते. त्याचा अंदाज राज्यात बसून येईलच असे नाही. तेव्हा हे स्थित्यंतर व्यवस्थित झाले नाही तर तो माणूस वाईट आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ इतकाच की तो माणूस दिल्लीपेक्षा राज्यात जास्त सूट होईल. त्या अर्थाने "दिल्लीत मन न रमणे" असे म्हटले. दिल्लीत मन न रमणे म्हणजे दिल्लीतील हवापाणी सूट न होणे किंवा घरच्यांची आठवण येणे असा नक्कीच नाही :) कॉर्पोरेट जगतातही एका विभागातील चांगली कामगिरी बघून दुसरीकडे बोलावून घेतले पण दुसरीकडे तो माणूस क्लिक न होणे हे प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतील. पर्रीकरांविषयी असे झालेच आहे किंवा झालेच नाही असे मला म्हणायचे नाही कारण त्याविषयी मला माहिती नाही. पण असे "दिल्लीत मन रमले नाही" आणि ते राज्यात परत गेले तर तो त्यांचा निर्णय असेल असे म्हणायला हरकत नसावी. सॅम ब्राऊनबॅक म्हणून अमेरिकेत कॅन्सस राज्याचे सिनेटर होते. अमेरिकेत सिनेटर हे बरेच महत्वाचे पद असते.काही वर्षे सिनेटर राहिल्यावर २०११ मध्ये ते कॅन्सस राज्यात गव्हर्नर म्हणून परत गेले. आता यासाठी त्यांचे वॉशिंग्टनमध्ये मन रमले नाही का नाही हे मला माहित नाही. पण त्यांना राज्य जास्त अपिलिंग वाटत असेल तर त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही.
In reply to मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार by गॅरी ट्रुमन
In reply to बरोबर आहे, आसाम निवडणुकांत एक by फेदरवेट साहेब
In reply to नाय नाय. .असं बेअरिंग सोडायचं by गणामास्तर
In reply to हल्लीच मराठी भाषा पेपर पास by फेदरवेट साहेब
In reply to पंजाब आणि आआप by गॅरी ट्रुमन
In reply to हे जागा-वाटप, युती करा, by संदीप डांगे
In reply to पंजाब मध्ये खूपच रंगतदार by अमितदादा
In reply to पंजाब मध्ये खूपच रंगतदार by अमितदादा
काही महिन्यापूर्वी जोरदार हवा असलेला आप आता हळूहळू जमिनीवर येवू लागलाय. लोकसभेच्या निवडणुकीत ३० टक्के मते मिळवणाऱ्या आप ला पंजाब कडून खूप अपेक्षा होत्या, परंतु अंतर्गत बंडाळी, बाहेरेचे असेलेल्याचा शिक्का यामुळे आप पिछाडी वर गेलाय.२०१४ मध्ये आआपला पंजाबमध्ये २४.५% मते होती आणि १३ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये केजरीवालांनी सुचासिंग छोटेपूर यांना पंजाबमध्ये पक्षसंघटनेसाठी नेमले होते. या छोटेपूर यांची पार्श्वभूमी इंटरेस्टींग आहे. छोटेपूर आणि अमरिंदरसिंग हे दोघेही १९८५ मध्ये सुरजितसिंग बर्नाला यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. १९८६ मध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरात परत दहशतवादी घुसल्यावर राजीव गांधींनी ऑपरेशन ब्लॅक थंडर नावाने कारवाई करून त्या दहशतवाद्यांना हुसकावून लावले. १९८४ मधील ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला होता पण या ब्लॅक थंडरमध्ये त्या मानाने बराच कमी रक्तपात झाला. या कारवाईला मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांनीही सहमती दिली होती. सुवर्णमंदिरात परत सशस्त्र सैनिकांना कसे जाऊ दिले या मुद्द्यावरून छोटेपूर आणि अमरिंदरसिंग या दोघांनीही सुरजितसिंग बर्नाला यांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता. छोटेपूर हे स्वच्छ चारित्र्याचे म्हणून समजले जातात. विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर केजरीवालांनी दिल्लीतून संजयसिंग यांना पंजाबात धाडले आणि उमेदवारांच्या निवडीमध्ये या संजयसिंगांचा मोठा भाग होता. आआपने अगदी जुलै-ऑगस्टपासूनच उमेदवारांच्या याद्या जाहिर करायला सुरवात केली होती. त्यातील पहिल्या दोन याद्या जाहिर केल्या त्यावेळी छोटेपूर पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. कारण यातील काही उमेदवारांविषयी छोटेपूर यांना आक्षेप होता आणि त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये असे त्यांचे मत होते. ऑगस्ट महिन्यात "मला पैसे द्या आणि त्या बदल्यात उमेदवारी घ्या" अशा स्वरूपाचा प्रकार छोटेपूर यांनी केला असे स्टींग ऑपरेशन झाले. त्यामुळे आआपने छोटेपूरना पक्षातून काढून टाकले. त्यावर छोटेपूर यांचे म्हणणे होते की त्यांना मुद्दामून फसविण्यात आले. ते ऑफिसमध्ये जायच्या आधी काही लोक त्यांच्या ऑफिसात पोहोचले होते आणि "साहेब तुमच्यासाठी भेट आणली आहे" असे म्हणत एक पुडके त्या लोकांनी छोटेपूर यांच्या हातात कोंबले आणि त्यात पैसे होते असे छोटेपूर यांचे म्हणणे होते. खरेखोटे माहित नाही. पण मग "स्वतंत्र बाण्याचे लोक केजरीवालांना सहन होत नाहीत म्हणून केजरीवालांनीच हे नाटक घडवून छोटेपूरना काढले" अशा स्वरूपाचे आरोपही झाले. "छोटेपूर असे काही करणे अशक्य आहे. मी त्यांना पूर्वीपासून ओळखतो" असे अमरिंदरसिंगांनी जाहिरपणे म्हटले. छोटेपूर यांनी दोन वर्षापासून संघटना बांधण्यासाठी बरेच कष्ट घेतले होते. त्यांना काढल्यानंतर त्या संघटनेतल्या अनेक कार्यकर्त्यांनी/पदाधिकार्यांनीही पक्षाला रामराम ठोकला. या छोटेपूर यांनी AAP ला उत्तर म्हणून स्वतःचा APP (अपना पंजाब पार्टी) म्हणून पक्ष स्थापन केला. स्वतः छोटेपूर गुरदासपूरमधून निवडणुक लढविणार आहेत. अमरिंदरसिंग प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द लांबी मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. या मतदारसंघात आआपने दिल्लीतील राजौरी गार्डनचे आमदार जरनेलसिंग यांना उमेदवारी दिली आहे. या जरनेलसिंगांनी दिल्ली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे आणि पूर्ण ताकद ते लांबीमध्ये लावत आहेत. याच मतदारसंघात अमरिंदरसिंगही काँग्रेसतर्फे निवडणुक लढवणार आहेत. अमरिंदरसिंग त्यांच्या पतियाळामधील पारंपारिक मतदारसंघातूनही निवडणुक लढविणार आहेतच. केजरीवालांना सगळ्या जगातील गोष्टींविषयी टिवटिवाट करणे हा आपला जन्मसिध्द अधिकार वाटत असल्यामुळे अमरिंदरसिंग पतियाळामधून आणि लांबीमधूनही प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवित आहेत (दोन मतदारसंघातून) म्हणजे ते आणि बादल "मिले हुए" आहेत अशा स्वरूपाचा टिवटिवाट त्यांनी केला. वास्तविकपणे बादल यांच्याविरूध्द निवडणुक कोणी लढवत असेल तर त्यातून ते बादल यांना मिळालेले आहेत हे कसे काय सिध्द होते कुणास ठाऊक. मग त्याच न्यायाने केजरीवालांनी २०१४ मध्ये मोदींविरूध्द वाराणसीत निवडणुक लढवली म्हणजे ते पण मोदींना मिळालेले होते असे म्हणायला हवे. दुसरे म्हणजे अमरिंदरसिंगांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या छोटेपूर यांना केजरीवालांनी पक्षात महत्वाचे स्थान दिले मग आआप आणि काँग्रेस "मिले हुए" आहेत असे का म्हणू नये? २०१४ मध्ये आआपचे पंजाबमध्ये ४ खासदार निवडून आले होते. त्यातील दोन खासदार--- पतियाळाचे डॉ. धरमवीर गांधी आणि फतेहगड साहिबचे हरिंदरसिंग खालसा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. धरमवीर गांधी हे पतियाळातील नामांकित डॉक्टर आहेत आणि त्यांचे पतियाळामध्ये नाव चांगले आहे असे आंतरजालावर वाचले.हे दोन खासदार, आआपमधून हकालपट्टी झाल्यावर योगेन्द्र यादव यांनी स्थापन केलेले स्वराज अभियान आणि सिध्दू, परगटसिंग आणि बेन्स बंधू यांनी घोषणा केलेला (पण जन्माला न आलेला) आवाज-ए-पंजाब हा पक्ष आणि आआपमधून विविध वेळी बाहेर पडलेले/हकालपट्टी झालेले स्थानिक नेते यांची आघाडी होऊन "पंजाब फ्रंट" ही चौथी आघाडी होणार होती. या आघाडीत सध्या नक्की कोण आहेत याची कल्पना नाही पण मध्यंतरी या आघाडीचा मजिठा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराने आआपमध्ये प्रवेश केला अशी बातमी आली होती. आआपला नुकसान पोहोचवू शकतील इतकी ताकद छोटेपूर यांच्या पक्षात आणि पंजाब फ्रंटमध्ये आहे असे वाटत नाही. पण छोटेपूर यांनी काही जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर नेले त्यामुळे आआपच्या संघटनेला नक्कीच नुकसान झाले आहे.
जर निवडणुकी नंतर कॉंग्रेस ला बहुमत नाही मिळाल तर कॉंग्रेस आणि आप सरकार बनवेल.माझी अशी फार इच्छा आहे की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष व्हावा आणि बहुमतापासून १०-१२ जागा दूर असावा, अकाली-भाजप दुसर्या क्रमांकाला आणि आआप तिसर्या क्रमांकाला असावा आणि मग आआपला काँग्रेसला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय राहू नये. कारण परत निवडणुका झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल आणि काँग्रेस आरामात बहुमत मिळवेल. माझ्यासारख्या आआपच्या कट्टर विरोधकाच्या दृष्टीतून असे होणे खूप चांगले असेल.कारण मग "आपण भ्रष्टाचाराविरोधात आहोत" या आआपच्या मुख्य अजेंड्याला धक्का लागेल. अर्थातच तसे काही होईल असे वाटत नाही पण माझे ते विशफुल थिंकिंग नक्कीच आहे :)
In reply to गंगेत घोडं न्हालं by गॅरी ट्रुमन
In reply to अश्या चर्चा करायला पक्ष by फेदरवेट साहेब
In reply to पक्ष सदस्यच गेला तर.. अधिक चांगला संदेश गेला असता! by नया है वह
In reply to गोवा आणि श्रीपाद नाईक by गॅरी ट्रुमन
In reply to साहेब आपण माझ्या वरती by फेदरवेट साहेब
साहेब आपण माझ्या वरती विचारलेल्या प्रश्नाला सोईस्कर बगल दिली आहेत का?हो बगल दिली आहे कारण तो प्रश्न दखल घेण्याच्याही योग्यतेचा नाही.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to कसा काय? उत्तर नसले तर तसे by फेदरवेट साहेब
In reply to एका राजकीय पक्षाच्या अंतर्गत निर्णयाविषयी कॉमेंट केली आहे. by नया है वह
उत्तर मिळालेलं नाही
In reply to उत्तर मिळालेलं नाही by फेदरवेट साहेब
In reply to युती कशाला म्हंतेत हां? by गामा पैलवान
In reply to युती कशाला म्हंतेत हां? by गामा पैलवान
In reply to ते भाजपच्या बाबुल सुप्रियो ने by संदीप डांगे
In reply to ते भाजपच्या बाबुल सुप्रियो ने by संदीप डांगे
In reply to मी ट्रुमन यांचा प्रतिसाद by हतोळकरांचा प्रसाद
In reply to बरं हातोळकर साहेब by फेदरवेट साहेब
In reply to फेदरवेट साहेब धागा भरकट्वु नये by नया है वह
खरं म्हटलं तर मुस्लिम व दलित