दगड!
काव्यरस
चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार
ब्लॉग दुवा
रागाची ती उचल काय, दगड!
विचारांची मजल काय, दगड!
जात पात वजा भाग गणित
गणिताची उकल काय, दगड!
अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं
पुतळे तोडून तुटंल काय, दगड!
देऊळ म्हणून आत गेलो बघत
गर्दीपुढे अचल काय, दगड!
बळावलेला ज्वर आहे, जबर
औषधानं निघंल काय, दगड!
तोड-फोड टीका निषेध कहर
सरतेशेवटी सफल काय, दगड!
नीट बघा, कळणार नाही फरक
हात, बाण, कमळ काय, दगड!
उद्या पुन्हा देतीलच ते वचन
निर्लज्जांचं नवल काय, दगड!
आमंत्रणं, आरक्षणं सकल
उरलेल्यांची दखल काय, दगड!
पोखरतील विकून खातील असंच
देशामध्ये उरंल काय, दगड!
चिडचिडच व्हायची लिहून अखेर,
कविता काय, गझल काय, दगड!
- अपूर्व ओक
वाचने
5763
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
जबरदस्त भावना मांडल्यात. सलाम ची आठवण आली..
जबरदस्त!
याचं मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं असं सुचवतो.
In reply to जबरदस्त! by आदूबाळ
मिपाच्या यूट्यूब चॅनलसाठी वाचन करावं - प्रचंड अनुमोदन
In reply to जबरदस्त! by आदूबाळ
नक्की विचार करतो.
In reply to जबरदस्त! by आदूबाळ
१०००%
अत्यंत सुंदर जमली आहे रे कविता.. कविता वाचन करच..
In reply to १०००% by पिलीयन रायडर
+१ .
एक नंबर जमलीये.
खूप छान!!
""उद्या पुन्हा देतीलच ते वचन
निर्लज्जांचं नवल काय, दगड!""
लाजवाब...!!
आदूबाळ यांच्याशी सहमत...
मन्गल देशा , पवित्र देशा, दगडान्च्या देशा
सगळ्यांना _/\_
हे कुठे जाऊन संपणार आहे, संपणार आहे की नाही याचा विचार करून त्रास होतो
खूप छान!
दगडाला घेऊन अशी सुंदर रचना वेल्लाभटाचं करू जाणे! :)
Sandy
In reply to जबरदस्त! by चांदणे संदीप
लिहिणारे वाऱ्यावर सुगंध लिहितात
ही दाद माझी दरवळंल काय, दगड!
Sandy
In reply to :) by चांदणे संदीप
दरवळंल ना भौ! वाह
मस्त कविता
समयोचित कविता. आवडली.
सत्य आणि स्पष्ट भाषा.
कविता आवडली.
अप्रतिम!
अप्रतिम कविता.
उगाच असल्या कविता लिहून कशाला डोकेफोड करुन घ्यायची? दगडांवर त्याचा काही परीणाम होणार आहे का?
दादोजी झाले, गडकरी झाले, शनिवारवाड्याचा नंबर काही फार दूर नाही.
आपण तालिबानला उगाच नावे ठेवतो.
पैजारबुवा,
माझ्या मना बन दगड म्हणायची वेळ आलीय.
जळजळीत कविता आणि भेदक चित्र.
जबरदस्त
आवडली कविता
अस्खलित !!
.
चाणक्य, कवीमानव, मित्रहो, पैसाताई, पैजारबुवा, अजया, रातराणी, रेवती, पाटीलभाऊ, शार्दुल, सगळ्यांचे अनेक आभार.__/\_
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukreyसत्यवचन! एकदम रोखठोक भाषा!
वेल्लाने अत्यंत सुंदर अभिवाचन केले आहे. नक्की ऐका!
In reply to वेल्लाने अत्यंत सुंदर अभिवाचन by पिलीयन रायडर
फारच छान अभिवाचन.
अभिनंदन वेल्ला!
आणि इथे लिंकवल्याबद्दल धन्यवाद पिरा!
वा , वा. आपल्या यु ट्युब चॅनल वर एक सुंदर भर पडली, धन्यवाद वेल्ला.
_/\_ धन्यवाद पिरा इथे डकवल्याबद्दल
आणि चतुरंग, स्रुजा; धन्स !
सुंदर वाचन !
कविता तर फारच भेदक - क्या बात है !
सुरेख अभिवाचन.
जबरदस्त भावना मांडल्यात. सलाम